आत्मोन्नती साधना – १६


विवेकप्रिय व विचारी लोकांचे अशी द्वापार युगाची ओळख होती. शास्त्रानुसार युगाचा काळ ८ लक्ष ६४ हजार वर्षांच होत. माणसाचा आकार सरासरी ८ हातांचा झाला होता. चौथे वर्तमान कलियुग. हे ४ लक्ष ३२ हजार वर्षांचे आहे. युगातील माणूस सरासरी ४ हातांचा आहे. कलीच्या प्रभावे बहुतांश लोक स्वंच्छंदी – स्वैराचारी वृत्तीचे असतील. या युगात खोटेपणा , कपट , आळस , झोप , हिंसा , शोक , मोह , भय , आणि दीनता भरपूर प्रमाणात पहावयास मिळेल. ब्रह्मदेवांची युग रचना ही अशी आहे. ती अपरिर्वतनीय आहे. तीन युगांच्या तुलनेत कलियुगाची जडण-घडण विचित्रच झाली अस ब्रह्मदेवांच्याही लक्षात आल. यावरील उपाय म्हणून प्रखर सामर्थ्यशाली असणार्‍या नाथ पंथाची निर्मिती झाली.
तारणहार नाथपंथ
“कलियुगातील जीवन नियंत्रित असावे , जन जीवनावरील कलिचा प्रभाव सौम्य व कमी करावा , या दृष्टीने स्वतः श्री विष्णूंनी नाथपंथाची योजना केली. नाथपंथाची ही योजना झाली नसती तर कलियुगाचे भयानक गंभीर परिणाम सामान्य माणूस सहन करू शकला नसता.
ब्रह्मांड व्यवस्थेत उत्पत्ती , स्थिती , लय या अवस्थांच्या नायकांनीच या पंथाची योजना केली आहे. ही ईश्वरी योजना आहे.नाथ पंथाने सूर्यमंडल , नक्षत्र , तारांगण , पृथ्वी , आप , तेज , वायू , आकाश , या ब्रह्मांडातील घटकांचा विचार केला आहे. पृथ्वीवरील व आकाशाखाली असणारा जीव व त्याची उन्नती हाच नाथ पंथाचा विषय आहे. लोककल्याण हा उद्देश्य आहे. पंथाचा संबध सृष्टीशी , युगाशी , युगातील प्रजेशी , त्यांच्या दैनंदिन जीवनाशी आहे. कलिच्या दुष्परिणांमा पासून स्वतःला दूर ठेवत , सत्प्रवृत्त , सत्शील व सज्जन होऊन आत्मोन्नती कशी साधावी हाच पंथ मार्गदर्शनाचा विषय आहे. याच तळमळीपोटी नाथगुरू श्रीनरेंद्रनाथांनी आत्मोन्नती साधनेचा प्रपंच केला आहे.
श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi