आत्मोन्नती साधना – १७

ब्रह्मा करी उत्पत्ती , विष्णू नियोजि ब्रह्मांड स्थिती । विलयाची कार्य व्याप्ती , महेशाची असे हो ।
(आत्मो. साधना -३७.)
वेदमंत्राच्या आधारे श्री ब्रह्मदेवांनी जीवसृष्टी साकारली. या अलौकिक ब्रह्मांडाचे नियंत्रण त्रैयमूर्तीकडे आहे. ब्रह्मा-विष्णू- महेश हेच अवघ्या निसर्ग आणि जीवसृष्टीचे मालक , चालक व पालकही आहेत. आत्मोन्नती साधना या ब्रह्मांड व्यवस्थेची घडी आपल्याला समजवून सांगते. अशा रितीने ब्रह्मांडाचे अस्तित्व पूर्णतः ईश्वरी इच्छेवर निर्भर झाले. ब्रह्मांड योजनेत मानवाला आपले जीवन सुखी कराचे असेल तर आत्मोन्नती साधनेतून श्री नरेंद्रनाथांनी युक्तिच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ” सूर्योपासना जो करील , जीवन त्याचे सुखी होईल । दीर्घायुरारोग्य विविध गुण , लाभे सूर्या प्रार्थिता “। सूर्य हा ब्रह्मांडाचा प्राण आहे. आत्मा आहे. “आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने । जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायेते ।। सूर्य नारायणाला केवळ नमस्कार जरी केला तरी हजारो जन्म दारिद्र्य येत नाही. शिवाय “आरोग्यम् भास्करादिच्छेत ” सूर्याकडून आरोग्याची कामना करावी असे शास्त्र सांगते. ऐका श्रोते सकळ जन , ग्रह नक्षत्र तारांगण । तैसेच पंचमहाभूते जाण , अंस्तंगत सूर्याच्या।(आत्मो. साधना ४७.) म्हणून हे मानवा सूर्योपासना महत्त्वाची ! ती कर. जन्मोजन्मीच्या हाल-अपेष्टा , दुःख-कष्ट नाहीशी होतील. हाच श्री नरेंद्रनाथांचा संदेश आहे.
सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज की जय !
लेखक- प्रा. गजानन कुळकर्णी. अकोला.
gajanankulkarni19@gmail.com

mrMarathi