आत्मोन्नती साधना – १९

पशु देही नाही गति , ऐसे सर्वत्र बोलिती । म्हणौनि नरदेहिच प्राप्ति , परलोकीची । (आत्मो. साधना-६१) या सूत्रातील ‘म्हणौनि’ या शब्दाला विशेष महत्त्व आहे. नरदेहाच्या प्राप्तीची महती , वेगळेपण हा शब्द सांगतो. मनुष्य सोडून या सृष्टीवर लक्षावधी जीव आहेत. एक मनुष्य सोडला तर कुठलाही सजीव प्राणी आहार , निद्रा , भय , मैथुना पलिकडे व्यवहार करित नाही. ते सर्व या सामान्य चौकटीत अडकले आहेत. म्हणून परमार्थात त्यांना गती नाही , सद्गती नाही. नरदेहाची प्राप्ती ईश्वरी कृपा आहे. आत्मोन्नतीची संधी आहे. या संधीच सोन केल पाहिजे ही जाणीव विकसित करण्याच काम विवेकाच आहे. विवेक हा दृष्टीचा डोळा आहे. मनुष्यत्वाची ओळख आहे. विवेकामुळेच इतर प्राणी मात्रांपेक्षा तो श्रेष्ठ आहे. विवेके क्रिया आपुली पालटावी अस समर्थ म्हणतात ते उगाच नव्हे. पण माणसातील हा विवेक सहजा सहजी जागा होत नाही. या साठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. ब्रह्मांड व्यवस्थापनाच वैशिष्ठ्य समजुन घ्या. ईश्वर इच्छा बलियसी हे या ब्रह्मांडाच अंतीम सूत्र आहे. पण ईश्वर आपल्या संचित -प्रारब्धात बदल वा हस्तक्षेप करित नाही. ब्रह्मांडाच संचलन , नियंत्रण ईश्वरानी दत्त स्वरूप श्री सद्गुरूं कडे सोपविले आहे. सद्गुरू त्याला सत्प्रवृत्त , सत्शील , सज्जन करतात. त्याच्या चित्त , वृत्ती , प्रवृत्तीचा ओघ भक्तीकडे वळवितात. त्याचे कडून शरीर शुध्दीचे , आत्मा उन्नत करणरे कर्म करवून घेतात. पण हे करवून घेतांना ते स्वतःचा उदोउदो करित नाहीत. भगवंताच्याच नामाची उपासना देतात. त्याचेच नाम वाढवितात. विवेकाने समजून रहावे , आत्मा विकसित रहावे । घ्यावे मार्गदर्शन गुरूंचे , वर्षाव होण्या ईश्वरकृपेचे ।
आत्मोन्नती साधना म्हणते की , सत्कर्म करशील जरी तू ,तरीच जीव सुुटेल भोवर्‍यातूनी । कर्म करणे तुझ्या विवेकावर , तू ठरव तुझी दिशा ।। आपली दशा होऊ द्यायची की सद्गुरूंच्या मार्गदर्शनात जीवन प्रवासाला दिशा द्यायची हे आपल्यालाच ठरवावे लागेल.
सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखक-प्रा. गजानन कुळकर्णी. अकोला.
gajanan kulkarni19@gmail.com

mrMarathi