आत्मोन्नती साधना-लेख ३१.

" कधीकधी विचार केला तर पशुंचा व्यवहार हा मनुष्या पेक्षा सुंदर आणि उदात्त असल्याचे जाणवते."

मानव ईश्वराची कलाकृती , कोणिही न निर्मूशके जी । निर्मित असे बहू गोष्टि , परी मानव न निर्मू शके शरीर ।

मनुष्याच शरीर कस बनत व कार्य करत याची सखोल ज्ञान चर्चा आपल्या प्राचीन वाङमयात केली आहे.

पृथ्वीला अन्न म्हटल्या गेल आहे. पृथ्वीतून धान्य , रसभरित फळ निर्माण होतात. आपण खाल्लेल्या अन्नाच्या स्थूलाचा मळ , मध्यम भागातून मांस , आणि सूक्ष्म भागातून मन तयार होते. आपल्या आहारावर आपल मन तयार होणार आहे.

जलाचेही असेच. स्थुलातून मुत्र , मध्यम भागातून रक्त , आणि सूक्ष्म भागातून प्राण तयार होतो.

तेजाच्या स्थुलभागातून अस्थि , मध्यम भागातून मज्जा , आणि सूक्ष्मतम भागातून वाक् तयार होतो.

परमेश्वर हा विश्वनियंता आहे. म्हणूनच त्याने विचारपूर्वक प्रत्येकाचा आहार विहार नेमून दिला आहे. आपापले धर्म नेमून दिले आहे.

आज मी विपरित कर्म करतो. स्वधर्म सोडून वागतो. कधीकधी विचार केला तर मन आणि बुध्दी नसलेल्या पशुंचा व्यवहार हा मनुष्या पेक्षा सुंदर आणि उदात्त असल्याचे जाणवते. मांजर कितीही तहानलेली असू देत ती कोल्ड ड्रिंक पित नाही. तिच ते पेय नाही. वाघ गवत नाही. तो त्याचा आहारच नाही. पण मनुष्य आहार -विहारापासून भरकटला. त्याच्या तेजस्वीतेवर परिणाम झाला. तो मलुल झाला. कोमेजला. त्याचे मन , प्राण आणि वाक् शक्ति क्षीण झाल्या आहेत.

म्हणून परमात्मा श्रीकृष्णानी गीतेतून युक्ताहार विहारावर विशेष भर दिला आहे

प.पू. नरेंद्रनाथ महाराजांनी आत्मोन्नती साधनेतून आम्हाला परोपरिन हाच विचार करायला लावला आहे.

मनुष्य ही परमेश्वराची सर्वश्रेष्ठ रचना आहे. तिला नासविणे हा त्या विधात्याचा अपमान आहे. आपल शरीर शुध्द करणे आत्मा उन्नत करणे हाच आपल्याला प्राप्त झालेला स्वधर्म आहे. स्वधर्म शोधावा लागत तो प्राप्त होतच असतो.

स्वधर्माचे पालन करा. ही श्री नरेंद्रनाथांची सूचना आहे. या सूचनेत आपल्या उध्दाराची तळमळ आहे.

आपल्याला प्राप्त झालेल हे साधन ईश्वराची कृपा आहे. त्यानी दिलेल्या बुध्दीने त्याला कसे पहायचे ? याच श्री सद्गुरू मार्गदर्शन करतात

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय ।
लेखक -प्रा. गजानन कुळकर्णी.अकोला.
gajanankulkarni@gmail.com

mrMarathi