आत्मोन्नती साधना- लेख ३२.

"आत्मोन्नतीच्या पथावर चालतांना श्री सद्गुरूंची कृपा हिच आमची शिदोरी असते.

साधण्या आत्म्याचा विकास सद्गुरूंची धरावी कास । सद्गुरू वाचोनी आत्म्यास कोणी न घडवी सर्वदा ।।

आत्मोन्नतीच्या पथावर चालतांना श्री सद्गुरूंची कृपा हिच आमची शिदोरी असते.

आत्मोन्नती साधायची असेल तर सद्गुरू वाचोनी अन्य दुसरी सोय नाही.
संताच्या मांदियाळीनही हेच सांगितल आहे. सद्गुरू वाचोनि सापडेना सोय , धरावे ते पाय आधी आधी ।”

माझ्या इच्छेन , माझ्या सोयीन , … अस करून चालणार नाही.
आज करू , मग करू असा अविचार करूनही भागणार नाही
आळस मोडून काढला पाहिजे. तातडी केली पाहिजे.

समर्थ रामदास स्वामींनी आळश्याची ओवीबध्द कथा सांगितली आहे. त्याचा सारांश असा आहे की , एक मनुष्य अतिशय आळशी होता. भुकेला झाला. अनायासे त्यास सर्व प्रकारची उपलब्धताही मिळाली. बसायला चंदनाचा पाट. जेवणासाठी सोन्याच ताट. सुगंधाचा घमघमाट. समोर पंचपक्वानांनी भरभरून असलेल ताट. पण हा काही जेवेना. मुलखाचा आळशी होता. कारे बाबा , जेवत नाहीस ? हा म्हणाला कोण तुकडा मोडेल ? बर , घास भरवू का ? हा म्हणाला घास भरवला तरी कोण चावेल ? बारीक कुस्करून तोंडात भरवतो न , चावायचा त्रासच उरणार नाही. हा म्हणाला , कुस्करून तोंडात टाकले तरी कोण गिळेल ? शेवटी सुकाळ असूनही दुष्काळ असल्या सारखा अन्नान्न करून तडफडून मेला.

तात्पर्य आळस मोडून घाई करायला पाहिजे.आम्ही रेंगाळलो की , आयुष्य नासणार. पुन्हा हाल अपेष्टा नि कष्टाचे पाढे घोकत आयुष्य काढाव लागेल.

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय ।
लेखक – प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला. gajanankulkarni19@gmail.com


mrMarathi