आत्मोन्नती साधना- लेख ३९ .

"आपले शरीरच पंचमहाभुतांची देण आहे. या तत्त्वांना कसे आनंदित करावे. यांची नेमकी पुजा कशी करावी. या पाच तत्त्वांची कृपा कशी संपादन करावी. कोणते उचित कर्म करावे. या बाबत प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज मार्गदर्शन करतात."

” पंचमहाभुतांवर गुरूंची सत्ता , परि ओळख न देती कदा । गुरूंचे सामर्थ्य न उमगे शिष्या , भ्रमीत होई मानव म्हणूनी ।।

सद्गुरूंनी करवूृन घेतलेल कर्म आणि साधना ही तारक असते.
या कर्म साधनेमुळे पंचमहाभुत आपल्यावर कृपावंत होतात.

पृथ्वी , आप , तेज , वायु , आकाश ही पाच तत्त्व आहेत.

आपल्या शरीरामध्ये पायाच्या अंगठ्या पासून मस्तका पर्यंत ही पाच तत्त्व आढळतात. या प्रत्येक तत्त्वाचा एक गुण विशेष आहे. एक दैवत आहे. एक युग आहे. एक स्थायीभाव आहे.

सत्य युगामध्ये पृथ्वी म्हणजे भूमि या तत्त्व प्रबळ होते. अंगठ्या पासून गुढघ्या पर्यंत शरीरा मध्ये हे भूमि तत्त्व असत. चतुर्भुज ब्रह्मा हे या युगाच दैवत आहेत.

द्वापार युगात जल या तत्त्वाचे प्राबल्य असत. गुढघ्या पासून बेंबी पर्यंत शरीराचा भाग हा आप तत्त्वाचा आहे. पितांबरधारी नारायण हे या युगाचे दैवत आहेत.

त्रेता युगात अग्निचे प्राबल्य होते.बेंबीपासुन ह्रदया पर्यंतचा शरीर भाग तेज तत्त्वाचा आहे. त्रिलोचन महारूद्र या युगाच दैवत आहेत.

वर्तमान कलियुगात वायु हे तत्त्व प्रबळ आहे. सर्वशक्तिमान ईश्वर हे या युगाच दैवत आहेत.
ह्रदयापासून भृकुटी पर्यंतचा शरीर भाग वायुन व्यापला आहे.

पाचव आकाश तत्त्व आहे. आकाश हे पोकळ असत. शिवाय आकाशाच नियंत्रण सर्व त्त्वांवर असत. गौरवर्ण महादेव हे या युगाच दैवत.परंतु कोणताही मानव आकाश तत्त्वाचा नसतो.

प.पू. श्री नरेंद्रनाथांनी ब्रह्मांडातील मानवी जीवनाची सप्त वर्गीय नियंत्रण योजना सांगितली आहे.

पंचमहाभुत , वर्ण , युग , निजतत्त्व , गुण , जन्मपत्रिका , राशी अशी ही सप्तवर्गीय नियंत्रण योजना आहे. ब्रह्मांडातील संपूर्ण मानव या योजने बाहेर जाऊच शकत नाही.

आपले संबध शरीरच या पंचमहाभुतांची देण आहे. या तत्त्वांना कसे आनंदित करावे. यांची नेमकी पुजा कशी करावी. या पाच तत्त्वांची पुजा कशी संपादन करावी. कोणते उचित कर्म करावे. या बाबत प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज मार्गदर्शन करतात.

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय ।
लेखक -प्रा. गजानन कुळकर्णी.अकोला.
gajanankulkarni@gmail.com

mrMarathi