आत्मोन्नती साधना लेख -४१.

"या तनाच्या यातना चूकवायच्या आहेत का , मग संत संग धरा. संत हेच सद्गुरू. त्यांना शरण जाव. ते आपल्या पदरात सुखाच माप भरभरून ओततात. आपल्या वासनेचा विषय नारायण करतात".

“माणूस श्रम करी बैलापरीशरीर मन झिजवि नानापरि ।न लाभे सुख तीळभरी , अहर्निश जीवनभर ।।”

एखादी व्यक्ति , घटना-प्रसंग आपल्या दुःखाचे वा सुखाचे कारण आहे हा आपला भ्रम असतो. मुळात आपली कर्म हिच आपल्या सुख-दुःखाच कारण असतात , हे खर आहे.

लक्ष्मणाचा या बाबतचा एक संस्कृत श्लोक सुप्रसिध्द आहे.

“सुखस्य दुखस्य न कोSपि दाता । परो ददातीति कुबुध्दि रेखा । अहं करोमीति वृथाभिमानः । स्वकर्मसूत्र ग्रथितो हि लोकाः।
सर्व जगच कर्म फलानी बांधलय.

सुख मिळविण्यासाठी निवडलेल्या साधनांमध्ये आपण चूक करित असतो.भौतिक साधनं , पैसा आपली दुःख नाहीशी करतील हा आपला विश्वास असतो. अनुभव मात्र विपरित येतो. भौतिक साधन , पैसा आमच दुःख हलक करितच नाही पण चिंता मात्र वाढवितात. समाधान मिळत नाही पण हव्यास मात्र वाढवितात.

भौतिक साधन आनंद देतात. पण त्यांच्या आनंद सौख्य देण्याचा आरंभ बिंदू हाच मुळी सौख्याचा अंत असते.
म्हणून सौख्य , आनंद तात्कालिक स्वरूपाचे ठरतात.

आपल्या सुख दुःखाच कारण आपले वासना विषय असतात. यापासून सुटायचा एक उपाय आहे. तो म्हणजे आपल्या वासनेचा , विषयाचा विषयच ‘नारायण’ करणे.
तुकोबाराय असोत की समर्थ , दोघेही यासाठी संतसंग सांगतात. तुकोबाराय म्हणतात , ” संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनि जाय “. मगच ईश्वराचे नामात मन रंगत. समर्थ म्हणतात , ” संतसंगे जन्म चूकति यातना “. या तनाच्या यातना चूकवायच्या आहेत का , मग संत संग धरा. संत हेच सद्गुरू. त्यांना शरण जाव. ते आपल्या पदरात सुखाच माप भरभरून ओततात.
आपल्या वासनेचा विषय नारायण करतात.

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय ।
लेखक -प्रा. गजानन कुळकर्णी.अकोला.
gajanankulkarni@gmail.com

mrMarathi