आत्मोन्नती साधना लेख-४२.

"अखिल ब्रह्नांडा मध्ये ज्ञान देण्याचा सर्वाधिकार श्री सद्गुरूंचाच आहे. ईश्वरान ब्रह्मांडाची निर्मिती केली. मात्र त्यानींही हा अधिकार आपल्याकडे ठेवला नाही."

” मिरवी यशस्वंत लक्ष्मिवंत म्हणोनी , परि मन खाई एकांती । काही केल्या मन स्थिर न होई , हिंडतसे सुखशांतीते ।।”

अखिल ब्रह्नांडा मध्ये ज्ञान देण्याचा सर्वाधिकार श्री सद्गुरूंचाच आहे. ईश्वरान ब्रह्मांडाची निर्मिती केली. मात्र त्यानींही हा अधिकार आपल्याकडे ठेवला नाही.

ज्ञानामुळे परम शांतीचा लाभ होतो. श्री सद्गुरू अनुग्रहित शिष्यात ज्ञानाचे दृढीकरण करत असतात.

ज्ञानाचे दृढीकरण जस जसे होते तसतसे अज्ञानाची लक्षण आपल्यामधून पसार व्हायला लागतात.

मोह , ममता , अहंता ही अज्ञानाची त्रिवेणी आहे. जीव या त्रिवेणीत मनसोक्त बुडतो. मग त्याची भाषा मी पासून सुरू होते आणि माझेवर संपते.

पंचसमासी मध्ये समर्थांनी बध्द जीवाच्या या भाषेचा उल्लेख केला आहे.

माझी माता , माझा पिता । माझे पुत्र , माझी कांता । माझे बंधु , माझी सुता । जामात माझे ।। माझे घर , माझा संसार । माझी जन्मभूमी सार , माझे सोयरे अपार । शेत वाडे पशु ।। माझे शरीर माझी संपत्ती । माझे वैभव , माझी संतती । सर्वांचा अभिमान चित्ती , दृढ जाला ।। ऐसे माझें माझें म्हणता । अभिमानें वोझें वाहतां । आयुष्य वेचिले अवचितां । मरोन गेला ।। या मी व माझे च सार काय निघाल. समर्थ म्हणतात संसारातील वासनेत स्वतःला गुंतवून स्वतःचा अभिमान धरणारा प्राणी अनंत यातना भोगतो.

प्रपंचाचे अस ओझ वाहणार्‍यास समर्थ ‘कुटुंबकाबाडी ‘ म्हणतात.

आत्मोन्नती साधनेत प.पू. नरेंद्रनाथांनी कुटुंबकाबाड्याच असच वर्णन केल आहे. अथक प्रयत्नानी अपार संपत्ती मिळविली. त्यातून स्वर्गोपभोग निर्माण केले. लोकांमध्ये यशस्वंत , लक्ष्मीवंत म्हणून स्वतःला मिरविले. पण शांती समाधान काही मिळेना. दशदिशेला हिंडतो आहे.
सार असून काहीच नाही अशी ही स्थिती. हेच अज्ञान. सद्गुरू हे अज्ञान घालवितात.

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय ।
लेखक -प्रा. गजानन कुळकर्णी.अकोला.
gajanankulkarni@gmail.com

mrMarathi