आत्मोन्नती साधना – लेख ४५.

प.पू. नाथशक्तिपीठाधीश श्री नरेंद्रनाथ महाराज विरचित "आत्मोन्नती साधना सांगते की , श्री गुरूंच्या कृपाकटाक्षाने भवरोगाची सारी लक्षण नाहीशी होतात. दुर्मती सुमती होते. जो मुढ आहे तो ज्ञानी म्हणून सर्वांच्या प्रशंसेस पात्र होतो."

” स्पर्श होता गुरूंच्या शरीराशी , पालटू लागे दुर्मती । बुध्दीत होऊनी परिवर्तन , विवेके अज्ञान जाईल.”।।

प.पू. नाथशक्तिपीठाधीश श्री नरेंद्रनाथ महाराज विरचित
आत्मोन्नती साधना सांगते की , श्री गुरूंच्या कृपाकटाक्षाने भवरोगाची सारी लक्षण नाहीशी होतात. दुर्मती सुमती होते. जो मुढ आहे तो ज्ञानी म्हणून सर्वांच्या प्रशंसेस पात्र होतो.

नारद पुराणामध्ये आदिगुरू श्री दत्तात्रेयांचे स्तुतीगान आहे. श्रीनारदांनी आदिगुरू श्री दत्तात्रेयांना “सर्वरोगहरं देव दत्तात्रेयमहं भजे “। अस म्हटल आहे.

भूत भविष्य व वर्तमानातील कुठलाही संप्रदाय , पंथ असोत त्या पंथाचे श्रीसद्गुरू हे श्री दत्तात्रेयांचेच प्रतिनिधी असतात. नव्हे त्या श्रीगुरूंना श्री दत्तात्रेयच मानले पाहिजे. या दृष्टीन श्री सद्गुरूंच कार्य वरील ओवीमध्ये श्री नारदांनी मांडल आहे.

‘भवरोग ‘ हा सर्वात गंभीर आहे. रोग जडल्याची काही लक्षण दिसून येत असतात. अहंकार हे भवरोगाच लक्षण ! पाठोपाठ काम , क्रोध , लोभ , मोह , मद , मत्सर आपल डोक वर काढायला लागतात. माणूस आंधळा होतो. त्याला स्वार्थापलिकडे काहीच दिसत नाही. त्याची बुध्दि अंतःकरणाच काही एक ऐकत नाही. त्याची मती बिघडते. ती माती खाते. संताच्या भाषेत ती अमृत सोडून कांजी प्यायला लागते.

श्रीगुरूंच्या स्पर्शामध्ये कृपाच असत. दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती औंदुबर क्षेत्री चातुर्मास्या करिता आले. कृष्णेच्या पलिकडच्या तीरावर भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे. मंदिरात आपल्याला विद्या येत नाही म्हणून अवघे टोचून बोलतात. यास्तव तू मला विद्या दे. अन्यथा मी माझे प्राण देईन. अस साकड कोल्हापुरच्या ब्राह्मणपुत्रान देवीस घातल. नुसत साकड घातल नाही तर आज जीभ कापून दिली. उद्या मस्तक कापेन असा निर्धार व्यक्त केला. तेव्हा देवीन दृष्टांत दिला. म्हणाली पैलतीरी महाचंद्रमौलीचा अवतार वास्तव्यास आहे. त्याला शरण जा. तो औंदुबरी शरण आला.जीझीभ तोडल्यामुळे त्यास बोलता येईना. श्रीगुरूंना त्याची कणव आली. त्याच्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला. त्या स्पर्शान त्याची जीभ त्याला प्राप्त झाली.इतकेच नव्हे तर तो सहाही शास्त्रात पारंगत झाला.

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi