आत्मोन्नती साधना- लेख – ४७.

"अनुग्रहितानी निरपराध नामधारक झाल पाहिजे. यासाठी पहिले नामाच माहात्म्य जाणल पाहिजे.महत्त्वाच म्हणजे नामाचे अपराध समजुन घेतले पाहिजे. ते कसोशिन टाळले म्हणजे नाम साधना फलद्रुप होते. "

” करिता ऐसे तपःश्चरण , वाढो लागे गुरूप्रति प्रेम । वाढता वाटे स्वजन त्यजुनी , गुरू सन्निधची रहावे ” ।।

आत्मोन्नती साधनेच्या या ओवीमध्ये “करिता ऐसे तपःश्चरण ” अस म्हटल आहे.

या ओवीमधील ऐसे या शब्दाला विशेष महत्त्व आहे. ऐसे म्हणजे अनुग्रहित शिष्याने श्री सद्गुरूंनी दिलेल नाम कस जपल पाहिजे , या विषयी श्री नरेंद्रनाथ महाराजांना आपल्या सर्वांच लक्ष वेधायच आहे.

अनुग्रहितानी निरपराध नामधारक झाल पाहिजे. यासाठी पहिले नामाच माहात्म्य जाणल पाहिजे.महत्त्वाच म्हणजे नामाचे अपराध समजुन घेतले पाहिजे. ते कसोशिन टाळले म्हणजे नाम साधना फलद्रुप होते.

पद्मपुराणामध्ये या विषयीचा श्लोक आला आहे. “

सन्निंदाSसति नामवैभव कथा श्रीशेषयोर्भेदधीः ।अश्रध्दा श्रुतिशास्त्रदेशिकगिरां नाम्न्यर्थवादभ्रमः ।नामास्तीति निषद्धवृत्ति विहितत्यागो हि धर्मान्तरैः ।साम्यं नाम्नि जपे शिवस्य च हरर्नामापराधा दश ।।

सन्निंदा अर्थात संताची निंदा , असति नामवैभव कथा अर्थात दुष्ट पुरूषाला नामाचा महिमा सांगणे , श्री शेषयोर्भेदधीः अर्थात श्री शिव श्री विष्णू यांच्यात भेद पाहणे , अश्रध्दाश्रुतिगीराम म्हणजे वेद वचनांवर अविश्वास , अश्रध्दाशास्त्रगिराम , अर्थात स्मृति , गीता , भागवत , पुराणं यांचेवर अविश्वास , अश्रध्दादेशिकगिराम , अर्थात श्रीगुरूवचनांवर अविश्वास , नाम्न्यर्थवादभ्रम , नाममाहात्म्य हे केवळ स्तुतीरूप आहे ते खर नाही असा भ्रम होणे , नामास्तौति निशिध्दवृत्ती अर्थात स्वतःवासनातृप्तीसाठी केलेल गैरवर्तन , विहितत्यागो धर्मान्तरैः , म्हणजे आपल्या विहित धर्माचा त्याग करून अन्य धर्माचा आश्रय घेणे , साम्यं नाम्नि शिवस्य च हरे म्हणजे शिव-विष्णूंच्या नामासोबत अन्य इंद्रादि देवांमध्ये साम्य पाहणे.
असे हे दहा अपराध आहेत.

या दहा अपराधांना टाकुन घेतलेल्या नामामुळे अंतःकरणात श्री गुरूंविषयीच प्रेम दाटून येत. श्री गुरूंचे सेवा-सान्निध्य वाढु लागते.

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय ।
लेखक -प्रा. गजानन कुळकर्णी.अकोला.
gajanankulkarni@gmail.com

mrMarathi