आत्मोन्नती साधना- लेख-४८

"इंद्रिय भक्तिमार्गाकडे वळली की , मनाच विषयात लोळण बंद होत. ते ईशचरणी धाव घेत.मन स्थिर झाल की बुध्दि स्वतंत्र होते. कामाच वसतीस्थान स्वतंत्र होतात. आपली वाटचाल परब्रह्म प्राप्तीसाठी निर्धोक होते. सद्गुरूंच्या मार्गदर्शनान हे शक्य होते. "

“घडविण्या जीव इंद्रियांना , रहावे गुरूंच्या मार्गदर्शनात । सगुणरूपी सद्गुरू असती , अवतार ब्रह्मा विष्णु महेशाचा ” ।।

सगुण स्वरूपात श्री सद्गुरू हे ब्रह्मा-विष्णू-महेशाचाच अवतार असतात. त्यांच्या मार्गदर्शनात राहून इंद्रियांना वळण लावाव.

काम हा ज्ञानाचा शत्रू आहे. इंद्रिय , मन , बुध्दि ही त्याची वसतीस्थान आहेत. येथे ठाण मांडून तो शरीरावर आपली हुकुमत गाजवितो.

काम हा सर्वनाशाला कारणीभूत ठरतो. विषयाचे ध्यान म्हणजे काम. हे अगदी लहान सहान असल तरी घातकच ! योगेश्वर कृष्णांनी या विघातक , विध्वंसक साखळीच वर्णन केल आहे. काम हा क्रोधाला आमंत्रण देतो. क्रोधामुळे मोह वाढतो. बुध्दि अविवेकी होते. अविवेकी बुध्दि माणसाला भ्रमिष्ट व विषय सुखाच्या भोगाकरिता कासाविस करते. ही अशी बुध्दीभ्रंश अवस्था सर्वनाशाला कारणीभूत ठरते.

माऊली ज्ञाननाथांनी भावार्थदीपिकेत या वर मार्मिक भाष्य केल आहे. माऊली म्हणतात या रजोगुणांनी काम-क्रोधाला जन्माला घातल. तमोगुणांनी याचे लाड पुरविले. याला प्रमाद , विचारशून्यता अर्थात अविवेकाचे पद बहाल केले आहे. यामुळे माऊलींनी काम-क्रोधाला ईश्वराचे भजन करणार्‍या लोकांचे मारेकरी , आत्मज्ञानाच्या अमोल ठेव्यावरील सर्प आणि विषयांच्या दरीमध्ये लपून बसलेले वाघ म्हटल आहे.

काम-क्रोधादि विकार किती दुष्ट व भयानक आहेत हे सांगतांना माऊली म्हणते , ” हे जळेंवीण बुडविती । आगीवीण जाळिती । न बोलता कवळिती । प्राणियांते ।। हे शस्त्रेविण साधिती । दोरेंविण बांधिती । ज्ञानियांसी तरी वधिती । पैज घेऊनी ।। हे चिखलेवीण रोविती । पाशेंवीण गोविती । हे कवणाजोगे न होती । आंतुवटपणे ।

श्री सद्गुरू कर्म उपासनेच्या माध्यमातून आपल्या इंद्रियांना वळण लावतात. इंद्रिय भक्तिमार्गाकडे वळली की , मनाच विषयात लोळण बंद होत. ते ईशचरणी धाव घेत.मन स्थिर झाल की बुध्दि स्वतंत्र होते. कामाच वसतीस्थान स्वतंत्र होतात. आपली वाटचाल परब्रह्म प्राप्तीसाठी निर्धोक होते. सद्गुरूंच्या मार्गदर्शनान हे शक्य होते. म्हणून आत्मोन्नती साधनेतून प.पू. श्री नरेंद्रनाथ म्हणतात की ” घडविण्या जीव इंद्रियांना , रहावे गुरूंच्या मार्गदर्शनात । “

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi