आत्मोन्नती साधना-शरीर माहात्म्य – लेख- ३0 .

" परमेश्वरास , मनुष्याला आपल्यासारख बनवायच होत. त्यान मनुष्याच शरीर देवतांच निवास स्थान बनवल ".

बी पेरता रोप जन्म घेते , हळू हळू पूर्ण वाढते । वाढविती पंचमहाभूते देती पुष्पादि फळे ।।

कोण वाढवी भूवरी रे ? हा एक साधा प्रश्न. पण याच नेमक उत्तर देतांना गोंधळ उडतो. याच खर उत्तर आहे. ‘पंचमहाभूत’ !

नाथ शक्तिपीठाधीश प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज मंगळवाराच्या आत्मोन्नती साधनेतून पंचमहाभूते मनुष्याला कस पोसतात , याची जाणीव करून देतात. या ओव्या वाचल्यावर माझ अस लक्षात आल की , आजवर मी या पंचमहाभूतां प्रति कधीच कृतज्ञता बाळगली नाही. उलट माझ्या विपरित वागण्याने प्रदुषितच केले आहे. या ओव्या पंचमहाभूतांकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी बहाल करतात. मुण्डकोपनिषद म्हणते , ” परमात्मा विराट आहे. द्यु लोक हे त्याच मस्तक. चंद्र-सूर्य हे त्याचे नेत्र. दिशा या श्रोत्र. अवघ विश्व त्याच ह्रदय आहे. धरिणी त्याचे पाय आहेत”. हे त्याच ‘समष्टी’ रूप आहे. मनुष्य हा त्या विराटाचे ‘व्यष्टी’ रूप आहे. सजीव प्रजा निर्माण करण्यापूर्वी त्यान जाणीव पूर्वक पंचमहाभूत निर्माण केली. पंचमहाभूत तसे अवघ्या सजीवांनाच सांभाळतात. अवघ्यांमध्ये मनुष्य आलाच.

              आत्मोन्नती  साधना म्हणते की , ऐसेचि येता जन्मासी । सांभाळ करी पंमहाभूते । पंचतत्वे देती आकार , रंग रूप गुण अंगी बाणी ।।

ही पंमहाभूत मनुष्याला कशी पोषक ठरतात याचा आता विचार करू या.

शरीरात आकाश , वायु , अग्नि , जल , आणि पृथ्वी ही पंमहाभूत विद्यमान असतात. आपल्या शरीरात ही पंमहाभूत त्यांच्या त्यांच्या गुणांचा धर्म प्रकट करित असतात. आकाश या महाभूताचा गुण शब्द आहे. मनुष्य कानाने ऐकतो. स्पर्श हा वायूचा गुण , मनुष्य हा त्वचेने स्पर्श अनुभवतो. रूप तेजाचा गुण आपण नेत्रांनी रूप न्हाहाळतो. रस जलाचा गुण. आपण जीभेने रसास्वाद घेतो. गंध पृथ्वीचा गुण. नाक आपल्याला गंधाची जाणीव करून देते.

परमेश्वरास , मनुष्याला आपल्यासारख बनवायच होत. त्यान मनुष्याच शरीर देवतांच निवास स्थान बनवल. आणखी सुंदर , उदात्त व उन्मन कराव म्हणून मन आणि बुध्दीही दिली. आणि स्वतः परमेश्वर ह्रदयामध्ये विराजमान झाला. म्हणून मनुष्य सजीव रचनेत सर्व श्रेष्ठ ठरला.

श्री सद्गुरूनाथ महाराज की जय ।
लेखक- प्रा. गजानन कुळकर्णी. अकोला.
gajanankulkarni19@gmail.com

mrMarathi