आत्मोन्नती साधना – ९

लेख – ९.
अहंकार न आवरे मला , घात करी पदोपदीला। आत्मोन्नती साधना अहंकाराला ‘ घातकरी ‘ म्हणते.
अहंकारामुळे आपण स्वतःला कर्ता- धर्ता समजायला लागतो. देहबोली , भाषा बदलते. याला वाढवले. त्याचा सांभाळ केला. पण समाजात अशी अनेक माणसं आपण पाहतो. ती कळकट , मळकट असतात. त्यांना खायला मिळत असेल नसेल माहित नाही. कुठेतरी आडोशाला झाडाखाली राहणारी , अक्षरशः गटारातल पाणी
पिणारी. त्यांना कोण बर वाढवतो.सांभाळतो.
या वृक्ष वेली त्यांची जोपासना कोण करत. ऋतुमाना प्रमाणे किडे मुंग्या ,झाड-झुडुपं उगवतात अन् नाहीशी होतात. पुन्हा उगवतात त्यांच जीवनचक्र कोण फिरवत. उद्भिज , अंडज , स्वेदज , जारज अशा ८४ लक्ष योनी. त्यांच्या जीवनमानाचे संचालन कोण करत. विवेकान हे सार कळू शकत. पण अहंकार आडवा येतो. आत्मोन्नती साधना विवेक बहाल करते. बुध्दीला विवेकाच अधिष्ठान लाभत. ती ईश्वर चरणी स्थिर होते. मन शांत होत. … अहंकार तेवढा दूर सारता आला पाहिजे. समर्थ रामदास स्वामी मदाला खेदाचे कारण मानतात. अहंकारान विवेक , विवेकान विचार , विचारान गुण ग्राहकता नाहीशी होते. सर्वांनाच तुच्छ लेखण्याचा अपराध हातून घडतो. श्री नरेंद्रनाथ महाराज सांगतात अशाचा संग धरलास तर मिळालेल अनमोल आयुष्य कवडीमोल ठरेल. ते ठरू नये यासाठी हा संवाद आहे.
श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi