आत्मोन्नती साधना – १०

लेख -१०.
जो कुणी जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहे. जन्मापासून मरणापर्यंत जीवनप्रवास त्याचा त्यालाच करावा लागणार आहे. तेव्हा जन्म , मृत्यू व हा प्रवास सुखावह करून घ्यायला सर्वांनाच आवडेल. अशा सर्वांसाठी प.पू.श्री नरेंद्रनाथ विरचित ‘आत्मोन्नती साधना ‘ आहे. जन्म , मृत्यू व जीवन प्रवास गोड करणे हेच तर अध्यात्म आहे. जन्म माझा , मृत्यू माझा आणि दरम्यानचा जीवन प्रवासही माझाच . तो सुखानुकुलित करण्यासाठी मलाच प्रयत्न केले पाहिजे. यात दुसरा कुणीही बदल करणार नाही. करू शकतही नाही.
‘ सत्कर्म योगे वय घालवावे ‘ ही आत्मोन्नती साधनेची महत्त्वाची शिकवण आहे. एकदा करून , जमेल तस , करतोच की , …. अशी भाषा बोलून चालणारच नाही. ‘वय घालवावे’ यावर आत्मोन्नती साधनेचा भर आहे. सत्कर्म करशील तर आत्मोन्नती होईल. पुढचा जन्म सुधारशील. कुकर्म करशील तर या जन्मी व पुढचे जन्मी अधिक दुःख कष्ट भोगशील. ही साधना आत्मोन्नतीसाठी जीवाला तयार करते. मी ईश्वराला मानतो या भांडवलावर त्याचा कृपाभिलाषी होता येत नाही. मी सर्वांसाठी उपयोगी आहे , माझी सत्कर्मात रूचि आहे , मी सत्शील आहे , चित्त-वृत्ती-प्रवृत्तीन सज्जन आहे. तरच मी ईश्वराला निश्चित प्रिय होईल.
श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi