आत्मोन्नती साधना – ११

लेख – ११.
वाढवी मोहमाया निरंतरी । स्वर्गोपभोग सुख न देई कधी । जमविली मोहमाया जरी । नसे अंत वांछेला।। (आत्मोन्नती साधना-रवि.-८ ) सुखांनी हात जोडून उभ रहाव. दुःखांनी जीवनातून निघून जाव . ही आपल्या सर्वांची स्वाभाविक अपेक्षा असते. आम्ही सुखासाठी भौतिक साधनांची निवड करतो. माया जमवून सुख मिळवणे व सुख मिळविण्यासाठी माया जमविणे या दुष्टचक्रात आमच अवघ आयुष्य सरत. आमच्या इच्छेला अंतच नसतो. भौतिक साधन आम्हाला सुख देतात. पण त्या सुखाला एक नियम लागु आहे. “एकदाच अनुभव त्याचा आरंभ अंत सौख्याचा “! ही साधन ज्या क्षणी आम्हाला सुख देतात तोच सौख्याचा अंतिम क्षण असतो. जीवाची तृष्णा वाढत जाते. पण मोह काही सुटत नाही. मोह विकाराला माऊली ज्ञानेश्वरांनी ‘ काळसर्प ‘ म्हटले आहे. विवेक हे मोहाच्या विषबाधेवरील रामबाण औषध आहे. सद्गुरू योगेश्वरांनी अर्जुनातील विवेक जागविला. विवेक जागा झाला , तसे नष्टो मोहः अस अर्जुन बोलला. आत्मोन्नती साधना श्रीगुरूमुखातून आलेली आहे. प.पू. श्री नरेंद्रनाथांनी विरचित केली आहे. ही साधना आमचा विवेक जागवेल. आम्हाला मोह-मायेच्या दुष्टचक्रातून सुखरूप बाहेर काढेल.
श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi