आत्मोन्नती साधना – १२

लेख – १२.
ज्ञान दिले गुरूवरा तू ब्रह्नांडाचे , अज्ञान घालविण्या भक्तजनांचे (आत्मो. साधना-१३)
रविवारच्या आत्मोन्नती साधनेत प.पू. श्री नरेंद्रनाथांनी ब्रह्मांड निर्मिती व व्यवस्थापन या विषयांवर प्रकाश टाकला आहे. ईश्वरानी ब्रह्मांडाची निर्मिती केली. पण ज्ञान देण्याचा अधिकार स्वतः कडे ठेवला नाही. सार्वभौम अशा श्री सद्गुरू तत्त्वाकडे ज्ञान देण्याचे अधिकार आहेत. आध्यात्मिक साहित्यात ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान असा आहे. स्वतःला स्वतःची ओळख कळणे. समर्थ रामदास स्वामी आत्मज्ञानाला ‘ पहावे आपणासी आपण ‘ अस म्हणतात. श्री गुरूं कडूनच आत्मज्ञान मिळते , अस माऊली ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. आत्मज्ञान जीवनाला कृतार्थ करते.
दुःखरहित करते. सुमन आणि शुध्दमति । जो अनिंदक अनन्यगति । या आत्मज्ञानाच्या चार कसोट्या आहेत. संत-सद्गुरूंच्या वचनांवर दृढ श्रध्दा ठेवल्याने मन सुमन होते. विषय वासनांमुळे बुध्दी मळते. चंचल होते. वैराग्याचे योगाने ती स्वच्छ , शांत- स्थिर केली की शुध्दमति होते. शरीरान , वाचेन , मनान जो कुणाचीही निंदा करित नाही तो खरा अनिंदक. संत-सद्गुरू यांचे चरण व वचनांशिवाय अन्य कोणत्याही साधनाचा जो आश्रय करित नाही. त्यास अनन्यगति म्हणावे. या चार कसोट्यांवर जो खरा उतरतो तोच तरतो. श्री सद्गुरू कृपेन त्यास आत्मज्ञान लाभते. तो समाधानी पावतो. दुःखरहित होतो. यासाठी आत्मोन्नती साधनेच चिंतन आहे.
श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi