आत्मोन्नती साधना – १३

लेख -१३.
कोण मी कुठून आलो ,काय म्हणूनी मी जन्मलो । काय उद्देशाने जन्मा आलो , का मी आलो भूमीवरी ।।(आत्मो.साधना-१४)
रविवारच्या साधनेतील ही प्रश्नावली म्हटल तर सोपी. पण विचार करता लक्षात येत की , आपल्या मनातील उत्तर ही काही योग्य नाहीत.ब्रह्मांड निर्मितीच रहस्य व त्यातील जीवाशी संबधित हे सारे प्रश्न आहेत.अशीच प्रश्नावली कालडीच्या बालसंन्याशालाही पडली होती. आत्मज्ञानाच्या शोधात तो निघाला होता. नर्मदा तटावरील एका गुहेत तो उभा आहे. समोर ज्योतिर्मय झालेले श्री सद्गुरू गोविंदपाद ध्यानमग्न आहेत. बाल संन्याशाचे आगमनान त्यांची समाधी उतरते. सद्गुरूं समोर तो जिज्ञासा आपली प्रकट करतो.
स्वामिन्नहं पृथिवी न जलं न तेजो । न स्पर्शनो न गगनं न च तद्गुणा वा ।।नापिन्र्दियाण्यपि तु विध्दि ततोSवशिष्ठो । यः केवलोस्ति । परमः स शिवोहमस्मि ।। पुढे हे बालक सनातन हिंदु धर्माला नव संजीवनी देणारे अखिल विश्वामध्ये पूज्यपाद आदि शंकराचार्य या नावान ख्यात झाले. या प्रश्नावलीचा भावपूर्ण अनुवाद संतकवि दासगणू महाराजांनी केला. ना पृथ्वी ना जल तेज मी पवन आकाश वा इंद्रिये । हे शब्दे कळते विचार करतां तें प्रत्ययाला न ये ।। आहे त्याहूनी अन्य मी जगिं कसा याचाच येवो खरा । स्वामी प्रत्यय तो मला जवळिं हो या लेकरासि करा ।।
कळण ही झाली माहिती. प्रत्यय म्हणजे ज्ञान . विवेकामुळे ज्ञान होत. हा विवेक जागा करून आत्मज्ञान देण्याचा अधिकार श्रीसद्गुरू या तत्त्वाचा आहे. आत्मोन्नती साधनेतील ही प्रश्नावली श्री नरेंद्रनाथांच्या कृपेन आपणही समजवून घेऊया.
श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi