आत्मोन्नती साधना – १४

लेख -१३.
मानवा न उमगे हे सारे , विस्तारावे काय करावे । काहीच नसे हाती तयाचे , निर्बल असे तो ।। ( आत्मो. साधना- १५ ) ब्रह्मांड निर्मिती व आपला जन्म या विषयीची प्रश्नावली सहजासहजी उमगत नाही. जन्माला आल्यावर आपल पाऊल जमिनीला लागल की स्वतः मध्ये अहंकार निर्माण होतो. भू तत्त्वाच हे वैशिष्ट्यच आहे. अहंकारामुळे तो स्वतःला कर्ता समजतो. वाटे अवनीवरील मानवासी ब्रह्मांडी कर्ता तोचि । संपूर्ण ब्रह्मांडाच अस्त्तित्वच ईश्वरी इच्छेवर आहे. तरीही माणूस सार काही माझ्यामुळे आहे असा डांगोरा पिटत असतो. खरा कर्ता तो ‘ईश्वर’. सर्मर्थांनी माणसाला हेच बजावून सांगितल आहे.” मी कर्ता ऐसे म्हणसि ।तेणे तू कष्टि होसि । राम कर्ता म्हणविसि पावसी येश , कीर्ति प्रताप ।” जीव उन्नत करून आत्मा मुक्त करणे हे आपल्या जन्माचे प्रयोजन आहे. यासाठी ईश्वरान आपल्याला जन्मास घातल आहे. अहंकारामुळे सार मुसळ केरात जाते. तो दुःखी कष्टी होतो. माणसाचा जन्म व्यर्थ जाऊ नये म्हणून आत्मोन्नती साधना आहे. ही साधना अनंतकोटी ब्रह्नांडाच्या पसार्‍यात जीवाचे क्षुल्लक स्थान दाखवून देते.यामुळे त्याचा अहंकार नाहीसा होतो.
श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi