आत्मोन्नती साधना – १

लेख १.

ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभावीण प्रीती।
प.पू. नाथशक्तिपीठाधीश श्री नरेंद्रनाथ महाराज विरचित आत्मोन्नती साधनाचे लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर प्रकाशन झाले. आत्मोन्नती साधनेचा हा प्रकाशन सोहळा आम्हा सर्व जीवांसाठी
अविवेकाची काजळी फेडून ज्ञानाची दिवाळी साजरी करणारा ठरला. आत्मोन्नती साधनेच्या पुरश्चरणाने साधकाचे जीवन नऊ दीपांचा लख्ख प्रकाशाने उजळेल.
पहिला दीप- श्री सद्गुरूंच्या कृपाप्रसादाचा असेल.
दुसरा दीप- ब्रह्मा-विष्णू-महेशाची कृपा म्हणून तेवत राहिल. तीसरा दीप- विवेकाच्या ज्योतीचा ,
चौथा दीप पंच महाभूतांच्या अनुकूलतेचा ,
पाचवा दीप- ग्रहयोगांच्या साह्याचा ,
सहावा दीप परमार्थ उन्नतीचा , सातवा दीप सुख समाधानाचे आयुष्याचा
आठवा दीप जीवनाचा अर्थ समजविणारा , तर नववा दीप – हा देहशुध्दी द्वारा आत्मोन्नती कशी साधायची याची वाट मोकळी करणारा असेल. ही आत्मोन्नती साधनेची फलश्रुती आहे. सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज की जय ( क्रमशः)
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com
विशेष सूचनाः- लक्ष्मी पूजनाचे मुहूर्तावर शनिवार दि. १४ नोव्हेंबर २० रोजी प.पू.श्री नरेंद्रनाथ विरचित ‘आत्मोन्नती साधनेचे’ प्रकाशन झाले. त्यानिमित्ताने ही लेखमाला. आत्मोन्नती साधनेचे पठण रविवारच्या साधने पासून सुरू करावे.

mrMarathi