आत्मोन्नती साधना – २

लेख -२
प.पू. सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज विरचित आत्मोन्नती साधना वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधना म्हटली की , एखादे उपास्य दैवत आले. त्याची पूजा पध्दती आली. मंत्र , जप आला. पण इथे असे काहीच नाही. कोणत्याही दैवताला , ईश्वराला , कोणत्याही मंत्र -तंत्राला भजण्यास किंवा जपण्यास यात सांगितले नाही. केवळ अनंत अशा ब्रह्नांडतत्त्वाचाच साधनेत विचार केला आहे. ही साधना व्यापक , सिध्द , व उपयुक्त आहे.
साधनेचे व्यापकत्व
ही साधना व्यापक आहे. याचा परिघ सिमित नाही. कोणतेही दैवत , मंत्र -तंत्र या साधनेचा केंद्रबिंदू नाही. साधनेतुन ब्रह्नांडतत्त्वाचाच प्रामुख्यान विचार केला आहे. या साधनेतून विश्वात्मकतेला साद घातलेली आहे. त्याची आळवणी आहे. निसर्ग , पंचमहाभूत यांचा मानवी जीवनावर क्षणोक्षणी परिणाम होत असतो. या अपरिहार्य परिणामांची संगती आणि उकल साधनेतून करण्यात आली आहे. ब्रह्मांडात जे काही होत आहे किंवा जे काही होत नाही ती सर्व केवळ त्या ईश्वराचीच इच्छा असते. मानव काय किंवा अन्य कोणताही जीव असो त्याच्या इच्छेला ब्रह्मांडतत्त्वाच्या व्यवस्थापनात शून्य महत्त्व आहे. इथे मनुष्य पूर्णपणे हतबल , अगतिक असाच आहे. तेव्हा प्रत्येकाने व्यापक अस ब्रह्मांडतत्त्व अगोदर समजून घेतल पाहिजे. मग या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या व्यापक पसार्‍यात स्वतःचे अस्तित्व तपासुन बघितले पाहिजे. म्हणजे आपण किती क्षुल्लक आहोत याची त्याला जाणीव होईल. मग अहंकार राहणारच नाही. अहंकाराचे निर्मूलन ही साधकाच्या दृष्टीन साधनेसाठी जमेची बाजु असते. सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज की जय !
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi