आत्मोन्नती साधना – ३

लेख- ३
या साधनेच्या स्वरूपात प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी आत्मोन्नतीसाठी स्वयंसिध्द साधन आम्हाला दिल आहे.
सिध्दतेच्या बाबतीत या उपासनेची फलश्रुती पाहणे महत्त्वाचे ठरते. पामराचा नर अन् नराचा नारायण होणे. ‘ब्रह्मांडनायक ‘ या देवदुर्लभ पदवीची प्राप्ती होणे या साधनेच्या फलश्रुती म्हणून सांगता येतील. समर्थ रामदास स्वामी म्हणतात तस या देहाचियेनी आधारे । सच्चिदानंद पदवी घेणे। आपल्याला प्राप्त झालेल साधन ‘देह’ आहे. संचित कर्मानुसार प्रत्येक आत्म्याला देहाची एक खोळ प्राप्त होत असते. मनुष्य देह ही सजीव सृष्टीमध्ये आत्मोन्नतीला साजेशी अशी एकच खोळ आहे. ती सहजासहजी प्राप्त होत नाही. म्हणूनच प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज वारंवार आपल लक्ष पशुदेही नाही गती । ऐसे सर्वत्र बोलती या सूत्राकडे वेधतात.
या साधनेन आपल लक्ष आणखी एका गोष्टीकडे वेधल आहे. प.पू. श्री महाराज म्हणतात की , केवळ मनुष्य देहाचीच प्राप्ती झाल्यामुळे जीव हा शिवस्वरूप होऊ शकतो. मात्र हा जीव श्री सद्गुरूंचा अनुग्रहित असेल तरच ! कारण घडविणे व घडणे ही आंतर प्रक्रिया गुरू-शिष्य या नात्यातील आहे. या संदर्भातील एक मननीय उदाहरण प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज देत असतात. नाथपंथीय सद्गुरू श्री ज्ञाननाथ माऊली ! त्यांनी रेड्याचे मुखातून वेद वदविले. याचाच अर्थ त्यांनी रेड्याचे पूर्व आत्मज्ञान जागविले. त्याच्या पूर्व संस्काराच व स्मृृतींच जागरण केल. ही अद्भूत शक्ती केवळ श्री सद्गुरू या तत्त्वातच आहे.
सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज की जय.
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanankulkarni 19@gmail.com

mrMarathi