आत्मोन्नती साधना – ५

माझे जीवन माझ्या इच्छेने , मताप्रमाणे , म्हणण्या प्रमाणे , विचाराने , धोरणा प्रमाणे मला जसे हवे तसे सुरळीतपणे ठरविलेल्या लक्ष्या पर्यंत का जात नाही ? माझ्याच जीवनात नेहमीच कमालीची अस्वस्थता , अशांतता का असते? अशा प्रश्नांचा आपल्याला त्रास होत असतो .

कधीकधी आपल सुरळीत नाही यापेक्षा दुसर्‍याच कस व का सुरळीत आहे याचा तर आपल्याला खुपच त्रास होत असतो. पण आपण हे लक्षात घेत नाही की , या ब्रह्मांड व्यवस्थेत मनुष्य हा अत्यंत अगतिक व निर्बल आहे. श्री सद्गुरू त्याची ही दयनीय स्थिती बदलवून अभिनंदनीय करू शकतात. त्यासाठी आत्मोन्नती साधना आहे.

साधनेत श्री सद्गुरूंचे सेवा सान्निध्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपण त्यांचा आश्रय न घेता आपल्या मनाला येईल तसे कर्म करित असतो. इतकच नव्हे तर मनाला येईल त्यांना गुरू मानीत असतो. श्री सद्गुरू चरणांचा आश्रय हा नेहमी अंतःकरणपूर्वकच घेतला पाहिजे. तिथे बुध्दीचे मुळीच काम नाही. अंतर्मनाला भावतील तेच सद्गुरू ! त्यांच्या कृपा मार्गदर्शनात निसर्ग व पंचमहाभूतांशी प्रामाणिक राहणे व उपासना कर्म करित राहण्यालाच अग्रक्रम दिला पाहिजे.

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय

लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi