आत्मोन्नती साधना – ६

लेख- ६.
ईश्वरानी हे जन्म-मरणाच रहाट गाडग का फिरवत ठेवलय ? या प्रश्नाच आपण जरूर चिंतन केले पाहिजे. मानवी जन्म हा जीवाला मुक्त होण्यासाठी मिळालेली संधी आहे जन्म हा मौज मजेसाठी नाही. विषयांमध्ये गुंतविण्यासाठी तर नाहीच नाही. आत्मा उन्नत करण्यासाठी मिळालेल हे वरदान आहे. “आत्मा उन्नत कर आणि जीव मुक्त कर” हेच परमेश्वर सांगत असतो. हाच तर त्याचा खेळ आहे. ईश्वराने सर्वांनाच कोणताही भेदभाव न करता हे अभयदान दिले आहे. “जगी पाहता देव हा अन्नदाता ।तया लागली तत्त्वता सार चिंता । तयाचे मुखी नाम घेता फुकाचे । मना सांग पा रे तुझे काय जाते ।। प.पू. श्री नरेंद्र नाथ महाराज आत्मोन्नती साधनेतून आम्हाला हेच सांगत आहेत. साधनेतुन त्यांनी आपल्याला समर्थांच्या मनोबोधाचा
दाखला दिला आहे. पण वास्तव हेच आहे की , जे स्वल्प , सोप , फुकाच असत त्याची आपल्याला किंमत नसते. ज्यान आपल्याला मुक्तीच अभयदान दिल त्या परमेश्वराची साधी आठवण देखील आपण काढत नाही.
श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi