आत्मोन्नती साधना – ७

लेख- ७.
सात लेखांमध्ये आपण आत्मोन्नती साधनेची पृष्ठभूमी पाहिली. नाथशक्तिपीठाधीश
प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी ही साधना सप्तवारांमध्ये दिली आहे. रविवारच्या साधनेपासून पुरश्चरण अथवा पारायण सुरू करावे. रविवारच्या साधनेत ब्रह्मांड निर्मिती , सोमवारी -चाले हे शरीर कोणाचिये सत्ते , मंगळवारी- आत्मोन्नती , बुधवारी -मी दैवाधीन अशांत का आहे , गुरूवारी -संत चरण रज लागता सहज , शुक्रवारी -कोणी नसे रे तारक गुरूविण , शनिवारच्या साधनेमध्ये जीवनाचे प्रयोजन काय ? या विषयांचे सखोल चिंतन केले आहे. ईश्वरावर योगक्षेमाचा अवघा भार टाकावा आणि निःशंक व निश्चिंतपणे त्याच्या भक्तीमध्ये रममाण व्हाव. तोच ब्रह्मा-विष्णू-महेश्वर श्री सद्गुरूंच्या स्वरूपात या पृथ्वीवर अवतरला आहे. साधकासी श्री महाराज ही सूचना देतात.
सारांशाने ही आत्मोन्नती उपासना आपल्याला सांगते की ,
१) ब्रह्मा-विष्णू-महशाने हा ब्रह्मांड व्यवस्थेचा खेळ मांडला असून हीच त्रयमूर्ती सद्गुरू स्वरूपात आपला उध्दार करण्या करीता अवतीर्ण झाली आहे.
२)जीवनाचे प्रयोजन आत्मा उन्नत करून जीवास मुक्ती देणे हे आहे.
३) मुक्तीसाठी विवेक जागा व्हावा लागतो. श्री सद्गुरूंनी सांगितलेल्या कर्म उपासनेद्वारा विवेक जागा होतो.
४)विवेक जागा झाला की चित्त , वृत्ती, सतेज होऊ लागतात.
५) या साधनेन श्री सद्गुरू अनुग्रहितां आत्मोन्नतीची गती वाढेल
६) तसेच साधनेन जे अनुग्रहित नाहीत त्यांना श्री सद्गुरूंची प्राप्ती होईल. ७) ब्रह्मांड तत्त्व , जीवा-शिवाशी नाते समजुन घेण्यासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता असते. ८) आत्मज्ञान देण्याचा अधिकार केवळ श्री सद्गुरूंनाच आहे.
९) ब्रह्मांडतत्त्वानुसार सर्वच जीवांच्या उध्दाराचे अभय दान ईश्वराने दिले आहे. १०) जीव त्याच्या संचित कर्मानुसार जन्माला येतो. ११) जीवाला कर्माचे माध्यमातूनच आत्मा उन्नत करून मुक्त करावा लागतो. १२) ईश्वर संचित , प्रारब्ध व भोगात बदल करित नाही. १३) संचित , प्रारब्ध भोगास बदलविण्याची क्षमता श्री सद्गुरूंमध्येच आहे. श्री सद्गुरू ही ब्रह्मांड व्यवस्थेतील सर्वोच्च , सार्वभौम अशी शक्ती आहे. श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi