आत्मोन्नती साधना – ८

लेख-८.
आत्मोन्नती साधना हा ब्रह्मांड निर्मात्याशी असलेला संवाद आहे. ज्या मुळे वाद तुटतो तो संवाद . असा संवाद हितकारी ठरतो. समर्थ म्हणतात , “तुटे वाद तो संवाद हितकरी ।” आज सर्वत्र संवाद संपलाय. अहंकारमुळे माणसं एकमेकांशी साध बोलायलाही तयार नाहीत. ही भयावह वस्तुस्थिती आहे. रविवारच्या साधनेची सुरूवात करतांनाच सावध करण्या साधकासी । रचिली आत्मोन्नती साधना ।। असे म्हटले आहे. अहंकारापासून सावध व्हा ! हाच तो श्री नरेंद्रनाथांचा इशारा आहे. पुढे आत्मोन्नती साधना आम्हाला विचार करायला भाग पाडते . पृथ्वीवरील माणूस मी पणाची शेखी मिरविण्यात फारच पटाईत. पण ईश्वरी सत्तेपुढे शेवटी तो निर्बल व अगतिकच आहे , हेच खर ! काय आहे त्याच्या हातात ? ना जन्म ना मरण. जीवनातील अवघी कमाई , तीही इथेच राहते. त्याचे सोबत येते ते त्याच कर्म. आत्मोन्नती साधना सांगते सत् प्रवृत्त , सत्शिल , सज्जन , विवेकी होण्यासाठी जे केल्या जात ते कर्म. शरीर , मन , बुध्दी , आत्मा यांच्या उन्नतीसाठी केल्या जात ते कर्म. कर्म करा , कर्म करा. शरीर शुध्द करून आत्मा उन्नत करण्यासाठी कर्म करा.
कर्म करण्यासाठीच तर तो जगदीश आम्हाला जन्माला घालतो. श्री सद्गुरूंच्या कृपा मार्गदर्शनात असे अनंत जन्म कर्मरत रहा. मग एखादा जन्म असा येईल की त्यामध्ये शरीर शुध्द होईल. जीव उन्नत होईल.अन् आत्मा मुक्त होईल.
श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi