उपासनेचे महत्त्व

रामदास स्वामी म्हणतात, ” उपासनेचा मोठा आश्रयों; उपासनेवीन निराश्रयो” अर्थात, उपासना केल्याने मनुष्य तरुन जाऊ शकतो, व उपासनेचा अभाव म्हणजेच पशुत्व.

कीटक पशु पक्षी यांचे जीवन म्हणजे “भोग” भोगणे. परंतु मनुष्य जन्मात मात्र साधनेतुन भोग कमी करणे व मोक्ष प्राप्ति करणे हे शक्य आहे.

सध्याच्या युगात भाक्तिमार्ग हा सहजसाध्य आहे.  जप तप अनुष्ठान ह्या पेक्षा गुरुचे गुणगान, भजन किंवा गुरुंनी दिलेली उपासना ह्यांच्या माध्यमातून मनुष्य आपली उन्नती सहजच साधु शकतो.

ह्या उपासनेला नाथ पंथातील 15 वे गुरु श्री व्यंकटनाथ महाराज ह्यांच्या वचनाने पाठबळ आहे. ते म्हणतात स्वानुभूति शिवाय ज्ञान नाही व स्वानुभूति ही स्वतः केल्याशिवाय मिळत नाही. म्हणुन आधी उपासना करा.

ह्या उपासनेने दुःख, चिंता, पिशाच्च बाधा जातील, विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगति होईल, व आपले मन जे स्वतःच स्वानंदाचे घर आहे ते शुद्ध होऊन सुख, शांती, समाधान लाभेल. ही उपासना नित्य नेमाने प्रसन्न व शुद्ध मनाने केल्यास जीवनात कधीच काहीच कमतरता राहणार नाही.

“गुरुविन ज्ञान नसे हो, ज्ञानमूर्ति  गुरु विश्वात.” ह्या उक्ति प्रमाणे गुरूंनी दिलेल्या उपासनेमुळे  शिष्याचा आध्यात्मिक मार्ग मोकळा होऊन तो गुरुप्रत जाऊ शकतो, व नंतर तो गुरुशी एकरूप होउ शकला तर तो गुरुपदी ही पोचु शकतो. म्हणूनच  उपासनेला पर्याय नाही ती  केलीच पाहिजे.

— नाथ शक्ति पीठ

mrMarathi