गुरु शिष्य संबंध

*** एका शिष्याने पाठवलेला संदेश व त्या अनुषंगाने सद्गुरुंचे मार्गदर्शन ***

साधारणतः जनसमुदायाचे अनुकरण करत चालणारा माणूस, त्या जनसमुदायाच्या पुढे जाऊन स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करू शकत नाही. असा माणूस तो जनसमुदाय जिथे पोहचेल तीथ पर्यंतच पोहोचु शकतो.

मात्र जे लोक जनसमुदायाने घेतलेला मार्ग सोडुन, वेगळा मार्ग अनुसरतात ते अशा ठिकाणी पोहोचु शकतात, जेथे आजपर्यंत कोणीच पोहोचल नसेल; व मग जनसमुदाय अशा द्रष्ट्या माणसाच्या पदचिंन्हांनवर चालू लागतो.

धेया पर्यंत पोहोचण्या साठी घातलेल्या वहाणा नव्हे, तर टाकलेल्या पावलांची, केलेल्या प्रयत्नांची दिशा महत्वाची असते.

प पू नरेंद्रनाथ महाराजांचा संदेश

कोणत्याही स्थितीत गुरु आपल्या कार्याला, कर्तव्याला विसरू शकत नाही. गुरु कधीही आपल्या अनुयायांना दुर्लक्षित करू शकत नाही; सद्गुरूंना, त्यांचे अनुयायी तसेच त्यांचा मार्ग अनुसरणारे सदोदीत ध्यानी असतात.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

mrMarathi