नवनाथ पंथातले आद्यगुरू योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराज

सद्गुरु व्यंकटनाथ महाराज माझे सद्गुरू नाथपंथांमध्ये अखंड गुरुशिष्य परंपरेने त्यांनी नाथपंथाचे जीवनभर कार्य केलं .त्यांचा व्यक्तिमत्व त्यांचं सामर्थ्य त्यांचा महात्म्य त्यांची शिकवण त्यांचे विचार त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जीभक्ती गीत तयार केली आहेत ती स्वानंद सुधा या नावाने प्रकाशित झाली आहे सद्गुरु व्यंकटनाथ महाराज असताना आम्ही सर्व त्यांचे शिष्य आणि गुरुबंधू भगिनी हे त्यांच्या उपस्थितीमध्ये हे भजन करत असत ही सर्व सिद्ध भजन आहेत या भजनांना प्रत्येकाला आपला इतिहास आहे प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये कसं वागावं कसं करावं काय करावे स्वतःला कसं घडवावं अध्यात्मिक ज्ञान काय आहे ते कसा प्राप्त करावा आपले व्यवहार कसे असावेत एकंदरीत आपल्याला घडवण्याचा जो अनेक तरेचा मार्ग आहे त्यात या प्रत्येक गीतातून त्यांनी आपल्याला काही शिकवण दिली आहे काकडा हा त्याचा पहिला भाग आहे सूर्योदयापूर्वी म्हंटला जातो या काकडा मध्ये पहाटेच्या निसर्गाचे वर्णन केलेला आहे पहाटे निसर्ग कसा असतो त्याचा परिणाम कसा असतो त्या वेळेला आपण उपासना केली साधना केली तर त्याचा परिणाम आपल्यावर कसा होतो ती उपासना साधना कशी करावी आपले गुरु कोण त्यांचे सामर्थ्य काय निसर्ग गुरूंना कशी मदत करतो या सर्वांचा वर्णन या आकड्यांमध्ये
उत्तम रीतीने प्रत्येक गीतामध्ये केला आहे ते रोज म्हटल्याने किंवा श्रवण केल्याने आपल्याला हळूहळू त्याचं ज्ञान होऊ लागतं त्याच प्रमाणे संध्याकाळी भजनासाठी व्यवस्था केली आहे प्रत्येक वाराच भजन हे वेगळा आहे प्रत्येक बाराच्या प्रत्येक पदातून काहीना काही शिकवल गेला आहे अध्यात्म हा कळत नकळत आपल्याला समजायला लागतो मला हे ज्ञान केव्हा प्राप्त झालं हे कळतच नाही अशा पद्धतीने या प्रत्येक भजनांचा प्रत्येकावर परिणाम होतो जे ज्ञान अनेकांनी सांगून अनेक ग्रंथ वाचून अनेक ठिकाणी जाऊन आपल्याला मिळू शकत नाही हे ज्ञान अत्यंत सहजतेने ही भजन केल्यावर प्राप्त होतं भजन हे रोज संध्याकाळी म्हणाला हवं. या भजनांचा परिणाम हा आपल्या आत्म्यावर आपल्या पिंडावर होतो एवढेच नाही तर आपले दैनंदिन व्यवहार आहे आपली जी विचारसरणी आहे आपली कार्यक्षमता आहे आपली निर्णय क्षमता आहे आपलं भवितव्य आहे या सर्वांवर होतो सर्वांगिन त्याचा परिणाम होऊन आपोआप आपण घडू लागतो आणि गुरूंची कृपा हळू हळू आपल्याला प्राप्त होऊ लागते या गुरूंच्या भजनामध्ये एका ठिकाणी म्हंटले आहे इच्छा मात्रे हार्दि तुझ्या रोग व्याधी समस्त होते प्राप्ती भजन करता तेज ये नित्य नित्य हा केवळ भजन केल्याने आपलं दुःख दारिद्र्य संकट चिंता दूर होतात गोष्टीसाठी आपल्याला जीवनात पाहिजे त्या गोष्टीसाठी योग्य तो मार्ग मिळू शकतो पुढे हे भजन करता करता रोज निरनिराळी पद्धत म्हणता म्हणतात आपल्यात हळूहळू परिवर्तन घडते आपल्यामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या योगामध्ये हे परिवर्तन घडत घडत आपण आपल जीवन सुखी करू लागतो
या भजना मध्ये एका ठिकाणी म्हटले आहे नित्यनियमाने भजन करे जो उणे न त्या भासे श्रीनाथांचे वचनची ऐसे खोटे हो कैसे
महाराज प्रत्यक्ष असताना देखील अनेकांनी या अनुभूती घेतल्या आहेत नित्यनियमाने जर भजन करत राहिलं तर आपले असंख्य प्रश्न आहेत ते आपोआप मार्गी लागतात आपोआप मनशांती लाभते आणि आपली निर्णयक्षमता आणि कार्यक्षमता वाढू लागते अनेक गोष्टी ज्या आपल्याला आपल्या अन्यथा सिद्ध होऊ शकत नाही साध्य होऊ शकत नाही त्या मिळू लागतात विद्यार्थ्यास विद्या अन्न भुकेल्यासी ही या भजनांची फलश्रुती आहे
ही सर्व पद या सिद्ध पुरुषाची आहे की जे अखंड गुरुपरंपरेनी हे कार्य करत आलेल्या व्यंकटनाथ महाराजांचे आहेत मच्छिंद्रनाथ पासून जी परंपरा सुरु झाली ती थेट व्यंकटनाथांच पंथ 1993 पर्यंत आलेली आहे
या परंपरेमध्ये अघटित सर्व गोष्टी सहजतेने घडत आलेल्या आहेत निसर्गावर म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांवर त्यांचे प्रभुत्व आहे
व्यंकटनाथ महाराजांची रहाणी अत्यंत साधी बोलना अत्यंत साध सरळ आणि प्रत्येक गोष्टीवर आपला प्रभुत्व आहे हा त्यांचा विश्वास हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत होता
ज्ञानेश्वर महाराज विष्णूचे अवतार होते पण ते किती सहजतेने जीवन जगले कुणाला कधीही अशी कल्पना आली नाही की हा विष्णूचा अवतार आहे देवाचा अवतार म्हंटला की आपल्या कल्पना आपल्या कल्पना वेगवेगळ्या होतात सुखासाठी देव पृथ्वीवर आलेला नसतो तो त्याचं कार्य करतो आणि निघून जातो व्यंकटनाथ महाराज हे देखील विष्णूचे अवतार होते सामान्य लोक राहतात त्याप्रमाणेच ते राहत होते तसेच ते दिसायचे परंतु परंतु सामर्थ्य त्यांचं अघटित जे मनाला येईल जे त्यांच्या मनाला वाटेल ते केवळ मनाच्या संकल्पनेने घडत असे केवळ त्यांच्या संकल्पनेने गोष्टी साध्य होत असे हे त्यांचं व्यक्तिमत्व या सद्गुरु व्यंकटनाथ महाराजांच्या चरित्रावर सामर्थ्यावर शिकवणुकीवर आधारित असलेलं स्वानंद सुद्धा आपण सुरू करत आहोत हे नित्यनियमाने म्हणत रहा ऐकत रहा आपोआपच तुमचं जीवन घडेल
श्री गुरुदेव दत्त
ही सर्व भजन युट्युब वर प्रकाशित झाली आहेत त्याची लिंक खालील प्रमाणे आहे
Kakada – https://youtu.be/JnwRa8kv7Dk
Friday – शुक्रवार चे भजन https://youtu.be/sJHRK_xxoEw
Saturday -शनिवारची भजन https://youtu.be/n1JH2UKMStk
Sunday -रविवारची भजन https://youtu.be/UoUQAjKkUY4
Monday -सोमवारी म्हणायचे भजने https://youtu.be/gx0R425M-_E
Tuesday -मंगळवार चे भजन https://youtu.be/YZ2_ipHVYtA
Wednesday -बुधवारची भजनं व फलश्रुती https://youtu.be/G63a43S4k5k
ह्या व्यतिरिक्त नुसते nathshaktipeeth akola youtube वर टाकल्यावरही वरील भजने व काकडा पाहता येईल.

mrMarathi