वैदिक उपचार केंद्र

नाथ शक्तिपीठाच्या कार्याचा एक भाग म्हणून नाथ शक्ति पीठात नरेंद्रनाथ महाराजांनी अनेक विधानांची ( procedure ) निर्मिति केली आहे .

ठराविक विधानांचे आचरण त्यांच्या नियमांनुसार केल्यास अविश्वसनीय गोष्टी घड़तांना येथे नेहमीच पहायला मिळतात व त्यांची तेथे सांख्यिकी पद्धतीने नोंद ही ठेवण्यात येते. या विधानांचा उपयोग धर्म, जात-पात यासारख्या कोणत्याहि मानवनिर्मित बंधनांचा विचार न करता करण्यात येतो.

या विधानांच्या आचरणा मुळे आज रोजी कित्येक जणांना आपले मन: स्वास्थ परत लाभले आहे. नैराश्येमुळे जीवाचा  अंत करु पाहणारे अनेक लोक आज स्वत: च्या  पायावर समर्थपणे उभे राहून इतरांनाही मार्गदर्शन करत असताना दिसतात.

जीवनात येणाऱ्या अडचणी, होणारे आघात, अपयश, दुर्धर रोग, यातना यांच्यावर मात कशी करावयाची या संबंधिचे मार्गदर्शन येथे मिळते.

नाथशक्तिपीठा द्वारे पुरस्कृत विधानांचे आचरण करणाऱ्यांमधे साधारणत: आत्मविश्वास वाढणे, नैराश्य जाणे, क्रूरता जाणे, कर्तव्यतत्पर व जवाबदार होणे, इत्यादि फरक झाल्याचे लगेचच जाणउ लागते.

सृष्टीचा नियम आहे की आपण जसे कर्म करतो तसेच फळ मिळते. नाथ शक्तिपीठातुन होणाऱ्या कार्याला या सत्याचेही पाठबळ लाभले आहे व म्हणूनच येथून होणाऱ्या प्रयोगांमधे यशोप्राप्ति गुणोत्तर हे नव्वद टक्के पेक्षा अधिक दिसून येते.

mrMarathi