आत्मोन्नती साधना – १५

लेख-१५.
विःष्णू सांगती ब्रह्मयासी , आपण सृजन करावे सृष्टीसी । पंचमहाभूते जीव सृष्टी , आणावे स्वरूपासी ।।(आत्मो. साधना-३०)
अपौरूषेय वेदांनंतर चक्रपाणी श्री विष्णूंनी व श्री महेशांनी अवतार घेतला. श्री ब्रह्मा विष्णूंच्या नाभीतील कमलात स्थित होते. श्रीविष्णूंच्या सूचनेवरून
ब्रह्मदेवांनी बारा हजार सहस्र वर्षे ॐकार साधना केली. अवघ्या सृष्टी निर्माणाची अद्भूत क्षमता असूनही त्यांनी तपश्चर्या केली हे विशेष ! श्री विष्णूंचे आज्ञेवरून ब्रह्मयांनी कृत , त्रेता , द्वापार व कलि ही चार युग निर्माण केली. श्री गुरू चरित्रात देखील युगनिर्मितीचे कथाकथन आहे. युगांची काही वैशिष्ट्य आहेत. कालावधी आहे. पहिल युग कृत किंवा सत्य या नावान ओळखल जात. या युगातील लोक सत्यप्रिय , सत्यवचनी , वैराग्यशाली व ज्ञानी होते. ब्रह्मकार्याला व रूद्राक्ष धारणाला विशेष महत्त्व होते.असत्य वचन आणि निंदा केवळ अपवादात्मक होत्या. या युगामध्ये माणूस सरासरी १६ हातांचा होता. शास्त्रा प्रमाणे या युगाचा कालावधी १७ लक्ष २८ हजार वर्षांचा होता.
दुसर त्रेता युग. शास्त्रानुसार त्रेता युग १२ लक्ष ९३ हजार वर्षांच होत. युगातील माणूस १२ हातांचा होता. कालदृष्ट्या हे युग सत्य युगापेक्षा लहान होते. माणसाच्या उंचीतही चार हातांची घट झाली. या युगात यज्ञापेक्षा तपाला जास्त महत्त्व होते. या युगात तपा पेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा कैवल्य प्राप्तीला श्रेष्ठतम मानले जाई. सत्य , जप , तप , ज्ञान यांचा या युगात बोलबाला होता.
श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi