नाथशक्तिपीठात माणूस घडतो

थोड्याच दिवसांपूर्वी मी अकोला, येथील श्री नाथ शक्तिपीठाचे पीठाधीश प.पू. श्री  नरेंद्रनाथ महाराज यांच्या निकट सांनिध्यात आलो.

चैतन्य श्रीमच्छिंद्रनाथांच्या  गुरु परंपरेतील १५ वे नाथ हे  त्यांचे गुरु व त्यांच्याच आज्ञेने त्यांनी हे कार्य चालू केले आहे.

ते स्वत: एम.काॅम, एफ.सी.ए,  चार्टड अकाउंटंट आहेत.

श्री नाथशक्तिपीठातून माणूस घडविला जातो. तो सत्शील, सत्प्रवृत्त व सज्जन बनतो हे  पाहून  व त्यांची कार्य  परंपरा प्रत्यक्ष  पाहून मी भारावून गेलो आहे.

दुःखी आणि पीडितांच्या सर्वच समस्यांचे निवारण  करून त्यांना आनंदी, सुखी, समृध्द, निर्भय बनवून आध्यात्मिक  मार्गाला लावणे हे त्यांचे  उद्दिष्ट आहे आणि ते गेल्या २२ वर्षांपासून हे कार्य अविरतपणे करीत आहेत.

मनुष्याची कार्यक्षमता वाढविणे, त्याला  सकारात्मक बनविणे व त्याच्या मधील नकारात्मकता नाहीशी करणे यात त्यांचा हातखंडा आहे.

एकाच वेळी मनुष्याला जीवनात भौतिक सुख समृध्दी प्रदान करणे व त्याच वेळी त्याच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा करणे हे त्यांचे विशेष आहेत.

ते हे  सर्व कार्य  ‘वेदांच्या’  व नाथपंथाच्या  पारंपरिक  कृपा प्रसादाच्या  आधारे करीत  आहेत. हा त्यांचा उपक्रम एकमेवाद्वितीय असा आहे.

आपण सर्व  मिळुन त्यांच्या या समाजोपयोगी उपक्रमास तन, मन, धनाने, साह्य करुया.

आपला स्नेही

पंडीत वसंत अनंत गाडगीळ, पुणे.

mrMarathi