अध्यात्म व विज्ञान – श्री. निमिष पानखेडकर

अध्यात्मातील विज्ञान सांगण्याएवढे आधुनिक विज्ञान प्रगल्भ नाही ! – श्री. निमिष पानखेडकर.

श्री. पानखेडकर पुढे म्हणाले, “आपल्याकडील विज्ञानाचा ‘मोक्ष’ हा पाया होता. दुर्दैवाने पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपण आपल्या संस्कृतीचा त्याग करून पाश्‍चात्त्य संस्कृतीची कास धरू लागलो. लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीमुळे आपले धर्मज्ञान लोप पावत आहे. जिथे विज्ञान संपते, तेथे वेदांग चालू होते. त्यामुळे आपण वैदिक पद्धतीचा अभ्यास करायला हवा.”

श्री. पानखेडकर यांनी पूर्वीच्या काळचे वैदिक विज्ञान प्रगत असल्याचे दिलेले दाखले

१. देहली येथे १६०० वर्षांपूर्वींचा एक लोहस्तंभ आहे; मात्र अजूनही त्यावर कणभर गंज चढलेला नाही. यातून त्याकाळचे आपले धातूशास्त्र किती प्रगत होते, हेच स्पष्ट होते.

२. पूर्वीच्या काळी आपण मिठाने दात घासायचो. त्या वेळी पाश्‍चात्त्य आपल्याला हिणवायचे; पण तेच लोक आज ‘आमच्या टूथपेस्टमध्ये मीठ (नमक) आहे’, अशी विज्ञापन करून त्यांच्या पेस्टची विक्री करतात.

३. प्रत्येक जलशुद्धीकरण यंत्रामध्ये (वॉटर प्युरिफायरमध्ये) कार्बनचा गोळा असतो. आपले पूर्वजही राख टाकून पाण्याची शुद्धी करायचे.

४. क्वांटम टेलिपोर्टिंगद्वारे व्यक्तीच्या सप्तकुंडल्या जागृत झाल्या, तर ती व्यक्ती एकाच वेळी दोन ठिकाणी असू शकते, असे आता सिद्ध होत आहे. द्वापरयुगात श्रीकृष्णाचे एकच रूप अनेक ठिकाणी असल्याचे आपल्या कथांमध्ये दाखले आहेत.

५. स्टीव्ह जॉब्ज हे आध्यात्मिक शांतीसाठी भारतात आले. ७ मास आध्यात्मिक जीवन व्यतित केल्यानंतर त्यांनी ‘अ‍ॅपल’ची निर्मिती केली.

६. पायथागोरसचे प्रमेय भास्कराचार्यांनी त्यांच्या ‘लीलावती’ या ग्रंथात पुष्कळ पूर्वीच लिहून ठेवले आहे.

७. तळहातामधून आपल्या शरिरातील अधिकाधिक लहरी उत्सर्जित होत असल्याने आशीर्वाद देण्यासाठी तळहात वापरला जातो.

८. मस्तकाच्या माध्यमातून अधिकाधिक लहरी ग्रहण केल्या जात असल्याने डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला जातो.

९. जर पृथ्वीभोवती फिरणार्‍या छोट्याशा चंद्रामुळे पृथ्वीवरील पाण्यावर परिणाम होऊ शकतो (चंद्रामुळे पाण्याला भरती अथवा ओहोटी येते.), तर कैकपटीने मोठ्या असणार्‍या शनि ग्रहामुळे मनुष्याच्या जीवनावर का नाही परिणाम होऊ शकणार ?

१०. पाण्याला स्मरणशक्ती असते, हे आता समोर येऊ लागले आहे. आपल्याकडेही विविध मंत्र म्हणून तीर्थ प्राशन करण्याची पद्धत होती.

____________________ साभार _______________

mrMarathi