संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू यांची भेट

​गुरूकुल पध्दतीचे शिक्षण म्हणजे सद्गुरूंचे सेवा सान्निध्यात घेतलेले शिक्षण. या गुरूकूल पध्दतीमुळे समाजाची एकात्म व अभंग बांधणी व्हायची. समाज व पर्यायाने राष्ट्र समर्थ व सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न होत असे नाथशक्तिपीठाने प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या कृपा व मार्गदर्शनात गुरूकुल पध्दतीचा ओघ सतत प्रवाहित ठेवला आहे. अशा सिध्द, व्यापक,व उपयुक्त कार्याला मी  विनम्रपणे अभिवादन करतो. असे उद्गार  अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.मुरलीधर चांदेकर  यांनी येथे केले.ते नाथशक्तिपीठाच्या कार्याची द्वि तपःपूर्ती व महाराजांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे उद् घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज, पं. वसंतराव गाडगीळ, उत्सव समितीचे अध्यक्ष श्री भाउसाहेब मारोडकर ,राष्ट्रीय कीर्तनकार प्रा. अपामार्जने विराजमान होते.  ते पुढे म्हणाले की आजच्या काळात सर्वच विद्यापीठे हे केवळ भौतिक मापदंडांनी शिक्षण देत आहेत परंतु या पद्धतिने समाजाचे नुकसानच् झाले आहे.  महाराजांचे हे कार्य हे समाजबांधणीचे असुन त्यांचे समाजावर उपकार आहेत.

प्रारंभी मान्यवारांनी चैतन्यश्री व्यंकटनाथ महाराजांचे प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन केले. वेदमूर्ती डाॅ श्रीकांतशास्त्री गदाधर ,मगेशशास्त्री व सहकार्‍यांनी वेद ऋचांचे पठण केले. कार्यक्रमाचे संचालन ह.भ.प. गजानन कुळकर्णी  यांनी केले.                          

आज सकाळी पं. वसंतराव गाडगीळ यांच्या ‘हसत हसत संस्कृत शिका या वर्गाची सुरूवात झाली.

नरेंद्रनाथ महाराजांच्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याच्या प्रथमदिनी प्रा. नरहरीबुवा अपामार्जने याचे किर्तन चालु असताना. ते म्हणाले की नाथ शक्तिपीठात आल्यावर सर्वांनाच शिकायला मिळ्ते.

mrMarathi