पदी लागता धन्य होऊनी गेलो भाग १२

व्यंकटनाथ महाराज फोटों

WhatsApp Image 2021 11 15 at 12.03.51 पदी लागता धन्य होऊनी गेलो भाग १२

भाग १२. १२-०१-२२
व्यंकटनाथ महाराजांची पंचमहाभूतांवर सत्ता


पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांवर कोणाची सत्ता असू शकते का? फक्त भगवान दत्तात्रेयांची आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या सद्गुरूंची अन्य कुणाची नाही. इतर कोणत्याही देवाला हा अधिकार नाही.
शरीर हे पंचमहाभूतांनी भरलेल आहे पाच तत्व मिळून शरीराची हाडामासाची इंद्रियांची योजना होते व गर्भधारणेपासून शरीर वाढत राहते शरीराबरोबर शरीरात असणाऱ्या सर्व इंद्रियांची वाढ ही वाढत्या वयाबरोबर होते जर एखादा इंद्रिय जन्मत:च नसेल तर तो कालांतराने शरीरात आणणे शक्य आहे का? आणि तोही ज्या वयाचे शरीर असेल त्या वयाची त्याची धारणाशक्ती झालेली आणणे शक्य आहे का ?
सद्गुरूंची सत्ता ही स्वतःच्याच नाही तर कोणाच्याही शरीरावर असते कारण सर्वांचे शरीर हे मुळामध्ये पंचतत्वाचे आहे
व्यंकटनाथ महाराज एकदा एका व्यास नावाच्या भक्ताकडे पाद्यपुजे साठी गेले होते तिथे काही ओळखीचे वकील डॉक्टर व इतर काही प्रतिष्ठित मंडळी बसली होती
यजमान व्यास आणि त्यांच्या पत्नी यांनि महाराजांची पाद्यपूजा केली हे पती-पत्नी अत्यंत पीडित होते दुःखात होते अनेक प्रयत्न करून त्यांना मूलबाळ होत नव्हतं बरेच डॉक्टरी प्रयत्न केले डॉक्टर कडे जाऊन ते सांगतील ते सर्व प्रयत्न केले बऱ्याच इन्वेस्टीगेशनस केल्या पण निष्पन्न काहीही निघाले नाही
जो जे सांगेल ते सर्व प्रयत्न ते दाम्पत्य करीत होते शेवटी त्यांना कोणीतरी सांगितलं जालन्याच्या मिशन हॉस्पिटलला जा . तेथे हमखास इलाज करून देतील म्हणून ते जालन्याला हॉस्पिटल मध्ये गेले तिथे त्यांच्या सर्व तपासण्या पुन्हा झाल्या आणि सरतेशेवटी मिशन हॉस्पिटलनी त्यांच्या लेटरपॅडवर लिहून दिले की या बाईच्या शरीरात गर्भाशय नसल्यामुळे या जन्मात या स्त्रीला मूल होणार नाही
निरनिराळ्या प्रकारचे व्रत उपास-तापास देवाला साकडे घालणे वगैरे सर्व प्रकार होऊन गेले होते बाहेरची कुणाची नजर लागली का अशा कल्पना, अशा नानाविध कल्पनांनी खूप मानसिक त्रास झाला परंतु त्यांचा प्रश्न सुटला नाही आता ह्या जन्मात आपल्याला मूल होणारच नाही या कल्पनेने ते दांपत्य जगत होते
पारकर नावाच्या एका शिष्याच्या आग्रहावरून महाराज व्यासांकडे पाद्यपूजेला गेले होते वास्तविक पाहता व्यासांचा आणि महाराजांचा कधीच कोणत्याही प्रकारचा संबंध आला नव्हता. त्यांना महाराजांबद्दल विशेष माहिती देखील नव्हती परंतु पारकरांचे अत्यंत जवळचे संबंध असल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून महाराजांना पाद्यपूजना साठी बोलावले होते
व्यंकटनाथ महाराज हे स्वामी मच्छिंद्रनाथांच्या परंपरेतले पंधरावे नाथ म्हणून कार्य करीत होते
महाराज योगी आहेत अंतर्ज्ञानी आहेत वैद्य ज्योतिषी आहे सिद्ध सत्पुरुष आहेत ते त्यांच्या मनाला येईल ते काहीही करू शकतात असे त्यांच्याबद्दल यजमानांना कळले होते आणि म्हणून महाराजांना त्यांनी पाद्यपूजे साठी आमंत्रित केले होते
पाद्यपूजा झाल्यावर महाराजांनी सहजच विचारले बाळ काय करतो त्यावर ते म्हणाले मी नोकरी करतो व नंतर बोलू लागले महाराज आम्हाला अपत्य नसल्यामुळे आम्ही अतिशय दुःखी आहोत विवंचनेत आहोत
महाराज देखील अगदी सहजपणे बोलून गेले बाळ कोणत्या विवंचनेत आहे त्यावर यजमान स्त्रीने आपली सर्व कहाणी त्यांना सांगितली त्यावर ते सहजपणे बोलून गेले डॉक्टर काय सांगतात ते आम्हाला माहिती नाही व कळतही नाही तुझा प्रश्न आम्ही सोडवून देतो
तेवढ्यात तेथे बसलेले वकील महाराजांना म्हणून लागले की डॉक्टर्सनी सर्व तपासण्या केल्या आहेत आणि या जन्मात या स्त्रीला मूलबाळ होऊ शकत नाही असा निर्वाळा त्यांनी लेखी दिला आहे त्यामुळे यांना मूल होणार नाही हे सत्य मानूनच पुढे जावे लागेल त्यावर महाराज म्हणाले तुमचं हे बोलणे आम्हाला समजत नाही परंतु यांची स्थिती पाहता यांचे जीवनातील नैराश्य पाहता आता आपलं कोणीच राहिल नाही असे यांना वाटत असताना त्यांच्या मनातून ईश्वरी धावा सुरू असताना त्यांचं हे दुःख आम्हाला पाहवत नाही यांच्यावर कृपा करायची म्हणून मी तिच्या घोटी हे नारळ टाकतो आणि आज पासून दोन वर्षानंतर हिचा पाळणा हलेल हा तिला आशीर्वाद देतो.
त्यावर उपस्थित असलेले वकील महाशय म्हणाले आपण आजचं मरण उद्यावर टाकलं आणि आम्हाला आशेचा किरण देऊन आपला मोठेपणा घेऊन आपण जात आहात .या जन्मात मुल होणे शक्य नाही आपण केवळ दोन वर्षानंतर होईल असे सांगून आम्हा सर्वांची दिशाभूल करतात हे योग्य नाही
संतांनी महाराज लोकांनी भक्तांच्या भावनेशी खेळू नये असे अम्हाला प्रांजळपणे वाटते आपण आशीर्वाद दिला नाही तरी आमचे काही म्हणणे नाही कारण ते नशिबातच नाही त्यावर महाराज म्हणाले आशीर्वाद दिला तो दिला दोन वर्षानंतर तुम्ही इथेच आहात आणि आम्ही आहोत त्यामुळे कोणतीही चिंता करायचे कारण नाही दोन वर्षानंतर आपल्याला हे सर्व कळेल
त्यावर उपस्थित डॉक्टर म्हणाले महाराज आम्ही आपल्याला काही म्हणू शकत नाही कारण आपण महाराज आहात परंतु वैद्यकीय शास्त्राप्रमाणे गर्भधारणेसाठी अवश्य असणारा भाग हिच्या शरीरात उपलब्ध नाही त्यामुळे गर्भधारणा होणे शक्य नाही आणि म्हणून कोणत्याही तऱ्हेने मूल होणे शक्य नाही असे आम्हाला स्पष्ट पणे वाटते
महाराज म्हणाले ईश्वराची इच्छा .तो भाग आहे किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा नसून ही आमची इच्छा म्हणून हा भाग घडेल आपण दोन वर्षे वाट पहा
उपस्थित सर्व लोकांचा सूर हा महाराजांनी खोटे आश्वासन दिले आहे असाच होता परंतु व्यास दांपत्यांना महाराजांच्या बोलण्यावरून पूर्ण आशा वाटत होती.आणि ते भावीक अंतकरणाने महाराजांकडे पाहू लागले हा सर्व प्रकार होत असताना नरेंद्र महाराजां बरोबरच होता. नरेंद्रच्या घरीच महाराज मुक्कामाला होते.
पाद्यपूजना नंतर नरेंद्रच्याघरी आल्यावर नरेंद्रने महाराजांना विचारले महाराज आपण दोन वर्षांचा अवधी का दिला त्यावर ते लगेच बोलले अरे बाळा जो भाग जन्मत:च नाही, जो भाग जन्माबरोबरच वाढला असता आणि आज तिच्या वयाचा झाला असता तो भाग नव्याने निर्माण करायचा आणि धारणा योग्य करायचा तो देखील केवळ दोन वर्षांच्या अवधीत हे शक्य आहे का दोन वर्षे अवधी या गोष्टीला जास्त वाटतो का त्यातून नऊ महिने हे तर जन्माला कारणीभुत असतात नऊ महिने गेल्यावर आता राहिले सव्वा वर्ष एवढ्या अवधीत तो भाग निर्माण करायचा आणि गर्भधारणा व्यवस्थित पार पाडायचे हे लक्षात घ्या
सर्वांचेच लक्ष या घटनेकडे लागले होते आणि होता होता दोन वर्षांनी खरोखरच त्या बाईचा पाळणा हलला आणि मूल तिच्या नशिबी नव्हतं ते तिच्या हातात आलं त्यानंतर त्याला अजून एक अपत्य झाल हे पाहून सर्व लोक अचंबीत झाले
वैद्यकीय तपासणी प्रमाणे गर्भधारणेचा भाग जन्मापासून त्या शरीरातच नव्हता ही गोष्ट खरी होती तो भाग कसा निर्माण केला निर्माण केल्यावर त्याची वाढ शरीराबरोबर कशी केली आणि तो गर्भधारणेसाठी योग्य कसा केला आणि सांगितल्याप्रमाणे केवळ दोन वर्षाच्या अवधीत झालं यावरून ज्या पंचमहाभूतांचे शरीर आहे म्हणजे पृथ्वी आप तेज वायु आकाश त्या पंचमहाभूतांवर व्यंकटनाथांचा संपूर्ण अधिकार आहे आणि तोही वाढलेल्या शरीरात वाढलेल्या वयाबरोबर वाढलेले इंद्रिय निर्माण झाले , हे कसे झाले हे त्यांचे त्यांनाच माहीत इतरांच्या दृष्टीने जी घटना घडणारच नव्हती ती घडली तेही एकदा नाही तर दोनदा म्हणजे त्या बाईंना एक मुलगा एक मुलगी असे दोन रत्न झाले होते आजही ते आहेत
पंचमहाभूतांची ही सत्ता केवळ सद्गुरू जवळ असते
ज्या सहजतेने ही घटना घडली आणि त्यातून कोणतेही वेगळे सायास प्रयास इतर कोणालाही करावे लागले नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे
केवळ ओटी मध्ये नारळ टाकलं आणि मूल झालं हे विश्वास न बसण्यासारख आहे त्यातून जो भाग शरीरात जन्मत:च नाही तो निर्माण करून ओटीत टाकलेल्या नारळावर त्या स्त्रीला मातृत्व द्यावं हे थोर उपकार ही थोर कृपा व्यंकटनाथांनी अगदी सहजतेने केली हेच सद्गुरूंच गुरु तत्वांच वैशिष्ट्य आहे.
या दोन वर्षाच्या कालावधीत व्यासांना कोणतेही इतर उपचार करावे लागले नाहीत कोणतेही औषध नाही कोणतेही पथ्य नाही दैनंदिन जीवन त्यांच्या इच्छेने त्यांना पाहिजे तसे ते जगत होते. त्यांना पुन्हा दर्शनाला देखील बोलावले नव्हते आणि अशीच जीवनाची कालक्रमणा सुरू असता दोन वर्षांनी त्या बाईंचा पाळणा हलला.
वैद्यकीय तपासणीतून जे स्पष्ट झालं होतं की त्या बाई आईंना शरीरा गर्भाशय अस नाही ते त्या बाईंचे प्रारब्ध नशीब बाजूला ठेवू ब्रह्मांडाच्या योजनेत परिवर्तन करून एक मुलगा आणि एक मुलगी झाली ह्यावरून सद्गुरुंचे सामर्थ्य त्यांची ब्रम्हांडावर ची मानवी जीवनावर ची असलेली सत्ता स्पष्ट होते
असे सद्गुरु लाभले तर जीवनाची आत्मोन्नती सहज होऊ शकते.

Leave a Reply