पदी लागता धन्य होऊनी गेलो भाग १3

चराचरावर सद्गुरूंचीच सत्ता १२-०१-२२

संपूर्ण सृष्टीच ब्रम्हांडाच उगमस्थान हे वेद आहेत. वेदातून संपूर्ण सृष्टी, ब्रम्हांड निर्माण झालं सृष्टीतील जीव, निर्जीव वस्तू ह्या ब्रम्हांडातला एक भाग आहे
सर्व प्रकारची माणस पशुपक्षी प्राणी हे सर्व जीवसृष्टीतील आहेत. त्याच प्रमाणे नद्या पर्वत दऱ्या आदि सर्वच या सृष्टीचा ब्रह्मांडाचाच एक निसर्गदत्त भाग आहे या संपूर्ण ब्रम्हांडात पूर्ण जीवसृष्टी निसर्ग हे आपोआप स्वयंचलिता सारखे कार्य करीत असतात. संपूर्ण कार्य नियमबद्ध शिस्तबद्ध होत असतं
संपूर्ण ब्रह्मांड स्वयंचलित आहे तसेच ते सर्व ,नियमबद्ध आहेत. एखादी कोणतेही वस्तू पाहिजे तर ती तिच्याच स्वतःच्या तत्वात स्वतःहून कोणताही बदल करू शकणार नाही . ती आपल्या निसर्ग दत्त नियमा प्रमाणेच चालणार किंवा तिच्या तत्त्वांमध्ये पूर्व योजनेनुसारच स्थित्यंतर होणार. ती तशीच राहणार उदाहरणार्थ झेंडूचे फूल गुलाबचे होणार नाही किंवा गुलाबाचे फुल मोगऱ्याचे होणार नाही. ते सर्व आपापल्या निसर्गदत्त तत्त्वानुसार योजनेनुसार चालणार.
निसर्गाचा हा नियम कोणालाच बदलता येत नाही. सृष्टी निर्माण करताना जे नियम झाले त्याप्रमाणे निसर्ग चालणार.
ज्याप्रमाणे सृष्टी निर्मितीच्या वेळेला युगांची रचना केली गेली म्हणजे सत्ययुग त्रेतायुग द्वापार युग कलियुग हे ज्या तत्वांचे आणि योजनेचे घडले त्याप्रमाणेच ते कार्य करणार त्यांच्यात कोणताही बदल ब्रह्मदेव स्वतः देखील करू शकणार नाही कलियुग इतर युगांच्या तुलनेत फारच निकृष्ट दर्जाचे घडले त्याच्यामध्ये पुनर्रचना किंवा पूनर्योजना ब्रह्मदेव देखील करू शकत नाही अस हे ब्रम्हांडाच तत्व आहे
सृष्टी निर्मितीनंतर ब्रम्हा विष्णू आणि महेश यांच्याकडे उत्पत्ती स्थिती आणि लय असे कार्याची विभागणी झाली सर्व देवांची मूळ शक्ती सामर्थ्य एक सारखे आहे कमीअधिक कोणाचेच सामर्थ्य नाही परंतु असे असले तरी प्रत्येक देवाला कार्याच्या मर्यादा आहेत त्या मर्यादेत राहूनच त्याला कार्य करावे लागते जरी तो काहीही करू शकत असला असे त्याचे सामर्थ्य असले तरी तसे करण्याचे त्याला निसर्गदत्त अधिकार नाहीत, आपले कार्यक्षेत्र आणि स्थित्यंतराचे जे अधिकार दिलेले आहेत त्या आधीकाराच्या कक्षेतच ते काहीही करू शकतात. याचा अर्थ कोणी देव लहान किंवा कोणी मोठा असा नसून शक्तीने सामर्थ्याने ते सर्व एक सारखे आहेत भिन्नता ही त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिकारात आहे. उदाहरणार्थ गणपती हा शक्ती, बळ,युक्ती,भक्ती, देऊ शकत नाही असे काही नाही किंवा बजरंगबली बुद्धी विद्या देऊ शकत नाही असेही काही नाही परंतु त्यांना त्यांच्या कार्याच्या मर्यादा आहेत त्या मर्यादेतच त्यांना कार्य करावे लागते
ब्रह्मा विष्णू आणि महेश या भिन्न देवता आहेत उत्पत्ती स्थिती आणि लय या त्यांच्या कार्याच्या मर्यादा आहेत परंतु ब्रम्हा विष्णू आणि महेश या तिघांच्या तत्त्वांनी जे भगवान दत्तात्रेय झाले ते सर्व देवांचे ब्रह्मांडाचे अध्यात्मिक गुरु झाले.
धर्मगुरू आणि अध्यात्मिक गुरु यांच्यातला फरक काय त़ो लक्षात घेण्यासारखा आहे.धर्मगुरू हे धर्माप्रमाणे समाज नियमाप्रमाणे किंवा प्रकृती नियमाप्रमाणे कार्यरत होणारे, कार्य करणारे, करवणारे, मार्गदर्शन करणारे गुरु आहेत यांना सदैव नियमानुसारच चालावे लागते परंतु अध्यात्मिक गुरु यांना कोणतेही नियम केंव्हाही आणि कुठेही नाहीत. कोणताही ब्रह्मांडाचा नियम किंवा निसर्गदत्त नियम कोणाच्या बाबतीत, तोडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. सामाजिक भाषेमध्ये ज्याला आपण डिस्क्रिशनरी पाॅवर म्हणतो ती अध्यात्मिक गुरुंना असते तिथे कोणतेही नियम जे जीव शक्तीला लागू होणारे किंवा निसर्गाला लागू होणारे कोणतेही नियम केव्हाही आणि कोणाच्या बाबतीत कोणालाही कारणमीमांसा न देता, कोणालाही न सांगता, स्वतःच्या मनाने पाहिजे तेव्हा तोडण्याचा एकमेव अधिकार अध्यात्मिक गुरूंना आहे. हा अधिकार कोणत्याही देवाला उपलब्ध नाही. केवढे हे विशेष आहे.
सामान्यतः आपण जीवनामध्ये असे समजून चालतो की देव म्हणजे त्याला सर्वस्व अधिकार आहेत तो मनात येईल ते काहीही करू शकतो ही देवाची क्षमता आहे, सिद्धता आहे किंवा सामर्थ्य आहे परंतु त्यांच्यात प्रत्यक्षात असा कोणताही अधिकार त्यांना नाही
भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मांडाचे सर्व देवांचे सर्व जीवांचे संपूर्ण निसर्गाचे अध्यात्मिक गुरु आहेत निसर्ग म्हणजे नद्या पर्वत वनस्पती हे बोलत नाही त्यामुळे आपण फक्त माणसालाच महत्त्व देऊन जीवनात वावरत असतो. परंतु अध्यात्मिक गुरूंशी सर्वच लोक, निसर्ग , जसा भूकंप अतिवृष्टी आदी सर्वच अध्यात्मिक गुरुंशी आपला संवाद साधतात व ते त्यांच्या आधीन राहतात.
एकदा असे झाले की देवगांवला, माझ्या गुरूंच्या ठिकाणी एका वर्षीक कार्यक्रमासाठी बरीच शिष्य भक्त मंडळी जमा झाली होती. उत्सवाच्या आदल्या दिवशी बाजारातून उत्सवासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी, सामान आणले होते. उत्सवाच्या दिवशी बुंदीचे लाडू करायचे ठरले होते. रात्री बुंदी पाडून त्याचे लाडू बांधून सकाळी मोठ्या पंगतीसाठी स्वयंपाकाची तयारी सुरू करायची होती. संध्याकाळी बाजारातून आणलेले सर्व सामान आवरून ठेवले. रात्री आचारी आला आणि आता बुंदी पाडून लाडू तयार करण्याची व्यवस्था सुरू झाली. रात्रीचे नऊ वाजले होते. बुंदी पाडून त्याचे लाडू बांधून कोठिघरात ठेवायला पहाटच होणार होती. बुंदी पाडण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जमा केले त्यावेळेस असे लक्षात आले की सामानात तुपाचे डबे आलेच नाहीत ते दुसऱ्या दिवशी सकाळी औरंगाबादहुन येणार होते. त्यामुळे रात्री बुंदी पाडून लाडू बांधणे शक्य होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आता काय करावे हा प्रश्न पडला म्हणून महाराजांना हे सर्व सांगणे याशिवाय काही गत्यंतर नव्हते महाराजांना कळल्यावर महाराज रागवणार हे उघड होते पण मार्गच नव्हता देवगावरंगारी हे एक लहान खेडे. उत्सवाला लागणारा सर्व बाजार औरंगाबादहुन आणला होता. औरंगाबाद देवगाव रंगारी पासून 30 किलोमीटर दूर होतं रात्री नऊच्या नंतर औरंगाबादचा बाजार दुकाने बंद झाली होती त्यामुळे रात्री जाऊन तूप आणणे शक्य नव्हते.
सर्व विचार विनिमय होता होता रात्रीचे साडे नऊ दहाचा सुमार झाला होता. बाजारातून तूप आलं नाही आता काय करावं असं विचारलं त्यावर महाराज म्हणाले किती डबे उद्या येणार आहेत. त्यांना सांगितले दोन डबे उद्या बाजारातून येतील परंतु आत्ताच बुंदी साठी कढई चुलीवर ठेवली आहे त्यात तूप टाकायच आहे. आम्ही काय करावे ? महाराज म्हणाले विहिरीतले दोन डबे पाणी काढा आणि कढईत टाका. उद्या तूप आल्यावर ते विहिरीत टाकून द्या तुमचं काम होऊन जाईल सांगितल्याप्रमाणे दोन डबे विहिरीतून पाणी काढलं ते कढईत टाकलं पाणी उकळायला लागलं ते तूप झाल. त्याच्यात बुंदी तळली गेली लाडू बांधले गेले सकाळी जेवतांना ते सर्वांनी खाल्ले. विशेष म्हणजे सकाळी कळलं की तूप थिजलेलं होतं. दुसऱ्या दिवशी बाजारातून तुपाचे डबे आले ते फोडले आणि विहिरीत टाकले. त्याच विहिरीतलं पाणी आंघोळीला व वापरायला सतत काढल जात होतं तूप टाकल्यावर लगेचच पाणी काढण सुरच होतं पण विहिरीच्या पाण्यातून तूप आलं नाही की तुपाचे तवंग आले नाहीत काय आश्चर्य
पाण्याचं तूप झाल आणि त्यात बुंदी तळी लाडू तयार केले आणि ते लाडू जेवतांना सर्वांनी खाल्ले. प्रसाद म्हणून ते वितरीत केले
केवढे आश्चर्य पाणी काढताच त्याचे तुप झाले आणि तूप पाण्यात टाकताच तात्काळ त्याचे पाणी झाले
निसर्गाचे सर्व नियम ब्रह्मांडाचे सर्व नियम क्षणार्धात आपल्या संकल्पनेने वाणीने बोलताच सर्व नियम बाजूला सारून पाण्याचे तूप केलं आणि तुपाचं पाणी केल
जे ब्रह्मा-विष्णू-महेश करू शकले नाही ते भगवान दत्तात्रयांचे स्वरूप म्हणजे सद्गुरू केवळ आपल्या संकल्पनेने करू शकले
यावरून हेच लक्षात घेण्यासारखे आहे की देवी-देवतांना जे शक्य नाही ते सद्गुरु सहजतेने करू शकतात. अशक्य ते तुम्हा नाही सद्गुरुराया सद्गुरूच नाराचा नारायण करतील देव नाही. हे लक्षात घ्या.

Leave a Reply