पदी लागता धन्य होऊनी गेलो भाग १४

१५-०१-२२

नाथपंथ हा सर्व पंथांना गुरुस्थानी आहे

व्यंकटनाथ महाराजांची चराचरावर असलेली सत्ता आपण पाहिली व्यंकटनाथ महाराजांचे गुरु म्हणजे माझे परम गुरु माधवनाथ महाराज चित्रकूट चे. यांना चित्रकूटचे संबोधले जाते कारण ते प्रथम चित्रकूटच्या गादीवर बसले होते.नंतर कलीयुगाच्या प्रभावाने संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांचा विश्वस्थांचा, विचार, भाव व नियत बदलत गेली आणि संस्थांनला मिळणाऱ्या पैशांचा व्यक्तिगत उपयोग कसा करावा याकडे सर्वांचे लक्ष गेले. आपला स्वार्थ हेतू साधण्याच्या उद्देशाने त्यांनी माधवनाथांना चित्रकूटला अस्वस्थ करून सोडले आणि सरतेशेवटी माधवनाथांनी आपलं कार्य स्थळ, केंद्र स्थळ बदलण्याचा निर्णय घेतला. ईश्वरी संकेताप्रमाणे त्यांनी त्यांचं कार्यक्षेत्र कार्यस्थळ हे औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथे आणल.
ते कार्य करीत असतानाचा एक प्रसंग आहे. सर्व शिष्य मंडळी महाराजांना विनवीत होते की महाराज उद्या सकाळी आमच्या घरी पाद्य पूजेला या. सर्व शिष्य आपापल्यापरीने महाराजांना आग्रह करीत होते. ही चर्चा चालू असताना एक नवीनच दांपत्य माधवनाथांच्या दर्शनासाठी आले होते. ते अनुग्रहित नव्हते किंवा त्यांना काहीही माहिती नाही केवळ त्यांना एवढंच कळलं होते की गावात कोणी नाथ महाराज आले आहेत. त्यांच्या दर्शनाला आपण जाऊ आणि म्हणून ते पहिल्यांदाच माधवनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. नवीन होते अपरिचित होते सर्वांनाच त्यामुळे सहाजिकच ते सर्वांच्या मागे जाऊन बसले आणि पाहू लागले.
महाराजांची व त्यांची दृष्टादृष्ट झाली आणि महाराजांनी खूणेनी त्यांना आपल्याकडे बोलावले. त्यांना महाराजांनी बोलवले याचाच अतीव आनंद झाला आणि त्यांनी महाराजांचे पहिल्यांदाच दर्शन घेतले. महाराज त्यांना एवढंच म्हणाले की उद्या सकाळी आठ वाजता आम्ही तुझ्या घरी येतो. आता तू घरी जा.
महाराज आपल्या घरी येणार याचा त्यांना अतीव आनंद झाला आणि त्या आनंदातच ते घरी जाऊन पोहोचले. घरी गेल्यावर त्यांना प्रश्न पडला की आपण महाराजांना तुम्हाला घ्यायला येतो असे म्हटले नाही किंवा त्यांना आपले नाव पत्ता देखील सांगितले नाही आणि विशेष म्हणजे त्यांनी देखील विचारलं नाही या विचाराने अस्वस्थ झाले बेचैन झाले आता काय करावं या विचारात रात्र निघून गेली.
खरं पाहिलं तर गजानन महाराजांचे ते शिष्य होते. गजानन महाराजांकडे ते नेहमीच जात असत.
आपल्या पत्नीला दिवस राहायचे आणि आणि तीन-चार महिन्यने झाले की अबॉर्शन व्हायचं. असं बराच वेळ झाल्यावर एकदा त्यांनी गजानन महाराजांना आपली व्यथा सांगितली. गजानन महाराजांनी त्या बाईच्या ओटीमध्ये नारळ टाकलं आणी म्हणाले काही चिंता करू नको आता तुला मुलगा होईल. तू निश्चिंत रहा आणि गजानन महाराजांच्या आशीर्वादा प्रमाणे तसे घडूही लागले होते. त्या बाईंना सातवा महिना लागला होता. आतापर्यंत तिसऱ्या-चौथ्या महिन्यातच आपोआप ॲबार्शन व्हायचं. आता तो सात महिन्यांच्या गर्भ झाला होता.
याच वेळेला त्यांना कळल की गावात कोणी नाथपंथी सिद्ध महाराज आले आहेत आणि म्हणून ते माधवनाथ महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते.
माधवनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बरोबर आठ वाजता त्यांच्या घरी आले ते यजमान महाराजांची वाटच पाहत होते. नाव गाव पत्ता काहीही माहीत नसताना महाराज दिलेल्या वेळेला त्याच्या घरी आले होते आल्या आल्या त्यांनी माधवनाथांचे पाय धुतले आणि गादीवर बसण्यासाठी विनंती केली. महाराज त्याच्यावर म्हणाले की चल मला वरच्या खोलीत जायचं आहे. तो म्हणाला की ती अडगळीच्या सामानाची खोली आहे. ती नेहमी बंदच असते. त्याला कुलूप लावलेल आहे आणि अनेक वर्षात ती उघडली नाही त्यामुळे ती स्वच्छ नाही तिथे जाण्यासारखी नाही . त्यावर महाराज म्हणाले ती उघड आम्हाला तिथेच जायचं आहे आहे. त्यांना काही पर्यायच नव्हता. त्यांनी ती खोली उघडली आणि महाराज जणू आपलं नित्याचाच जाणयेण आहे अशा आत्मविश्वासाने त्या खोलीच्या एका टोकाला गेले आपल्या बरोबर कुणी येतं किंवा नाही खोलीत घाण आहे जाता येत नाही जाळी आहेत याचा विचार न करता ते तिथे पोहोचले होते. पूर्वीच्या काळी लाकडी खुंट्या भिंतीत वस्तू टाकण्यासाठी घालून ठेवायच्या. त्यातली एक खुंटी महाराजांनी हातात धरली आणि ती गदागदा हलवली आणी म्हणाले चला आमचं काम झालं. नंतर महाराज खाली आले महाराजांची त्यांनी पूजा केली आणि नंतर महाराज निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना जबरदस्त धक्का बसला. पत्नीचं ॲबार्शन झालं होतं. त्यांना अतिशय वाईट वाटले आणि माधवनाथ महाराजांकडे गेलो याचा त्यांना पश्चात्ताप झाला वाईट वाटलं आणि गजानन महाराज कडे आता कोणत्या तोंडाने जावे हा प्रश्न त्यांना पडला
मनाचा हिय्या करून ते गजानन महाराजांकडे गेले क्षमायाचना केली आणि घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला आणि म्हणू लागले महाराज आमच्या नशिबातच मूल नाही आपण देण्याचा प्रयत्न केला आमच्या नशिबातच नाही त्याला कोण काय करणार मला क्षमा करा त्यावर गजानन महाराज म्हणाले
माधवनाथ महाराज हमारे बडे भाई है ! वो जैसा चाहते वैसा ही होगा हम कुछ नही कर सकते उनके दर्शन के लिये जाइए और उनके कृपा की मांग करे
गजानन महाराजांच्या सांगण्यावरून हे गृहस्थ माधव नाथांकडे गेले आणि गजानन महाराजांनी सांगितलेला निरोप त्यांना सांगितल्यावर माधवनाथ महाराज म्हणाले गजानन महाराजांनी तुला आशीर्वाद दिला प्रसाद दिला आणि तुला मुलगा होईल असे सांगितले परंतु ही घटना आमच्या लक्षात आली त्यावेळेस आम्ही पाहिलं तर असं झालं होतं की मुलगा जन्माला आला असता आल्यावर तो केवळ बारा दिवस राहिला असता आणि त्याचं आयुष्य संपल असत. गुरुंनी आशीर्वाद दिला आणि तो प्रसाद दीर्घकाळापर्यंत टिकणार नाही म्हणून आम्ही तो गर्भ ठेवला नाही. आता आम्ही योजना केली आहे आता तुम्हाला मुलगा होईल आणि तो दीर्घायुषी राहील तुम्हाला तो दीर्घ काळ पर्यंत आनंद देईल या उद्देशाने आम्ही ती घटना बदलून टाकली आणि हा जीव नको म्हणून हा प्रकार झाला.
झ़्ज्या दुष्ट शक्तीमुळे या दुर्घटना घडत होत्या ती वाईट शक्ती काढून टाकण्याच्या उद्देशाने आम्ही तुझ्या घरी वरच्या खोलीत गेलो आणि जिथे या प्रश्नाचं मूळ होतं ते आम्ही काढून टाकल.याचा परिणाम म्हणून अबॉर्शन झालं
गजानन महाराज हमारा भाई है उसने आपको आशीर्वाद दिया वही ठीक करने के लिए हमने ऐसा किया अभी आप कुछ करो या ना करो भगवान का या गुरु का दर्शन करो ना करो, आपको कोई भी तकलीफ नही होगी. अपको एक लडका मिलेगा .
या घटनेनंतर त्या बाईंना पुन्हा दिवस राहिले आणि कोणतीही बाधा न येता सुखरूप डिलिव्हरी झाली मुलगा झाला आणि बाळ बाळंतीणीची तब्येत चांगली राहिली
मागच्या एका लेखामध्ये आपण पाहिले होते की देवदेवतांना देखील कार्याच्या आणि त्या अनुषंगाने सामर्थ्याच्या मर्यादा असतात तोच प्रकार सद्गुरूंच्या बाबतीत दिसून येतो सर्व सद्गुरु समान असले तरीही त्यांच्या कार्यक्षेत्रात आणि त्यांच्या योजनांना मर्यादा आहेत. म्हणूनच हा प्रकार घडला
नाथपंथाची जी जडणघडण झाली ती स्वतः ब्रम्हा-विष्णू-महेश भगवान दत्तात्रेय आणि स्वामी मच्छिंद्रनाथ यांनी मिळून केली योजना झाली ती एवढी प्रभावी आणि एकमेवाद्वितीय झाली की स्वतः शंकराने आणि विष्णूने या पंथामध्ये शिष्याच्या शिष्याचे दास्यत्व पत्करून अवतार धारण करून ,गुरूंची सेवा करून आत्मिक आनंद मिळवू असे सांगितले
हा पंथ सर्व पंथांना गुरुस्थानी आहे याचा अर्थ सृष्टी मध्ये जे काही सद्गुरु असतील, त्यांचे शिष्य असतील त्यांची जी काही परंपरा असेल त्या सर्वांना हे नाथ पंथीय महाराज गुरुस्थानी असतील.
ते त्यांना वाटेल तो बदल करू शकतील शिष्य कुणाचाही असो गुरु कोणीही असो कार्य केवळ अध्यात्मिक कसावरच होणार. हा एकमेव अधिकार नाथपंथाला पंथांच्या स्वामींनी आणि ब्रम्हांड निर्माण करणाऱ्यांनी दिला आहे तो अधिकार इतर कोणाच्या मान्यतेवर नाही केवळ अध्यात्मिक गुरु या भूमिकेतून जे कार्य करायला पाहिजे तेच कार्य हे करणार आणि त्याच्यात लहान-मोठा असा भाग राहणार नाही आपला मोठेपणा मिरवण्यासाठी दाखवण्यासाठी हे गुरु कार्य करीत नसतात अशा गुरूंच्या कार्यावर देखील सतत पंथ स्वामींचे लक्ष असते
अमक्या पंथाचे गुरू चांगले किंवा अमक्या पंथाचे गुरू हे कमी दर्जाचे असा कोणताही विचार नाही परंतु ज्याप्रमाणे देवांच्या कार्याला मर्यादा आहे त्याच प्रमाणे अध्यात्मिक सामर्थ्याला देखील मर्यादा आहेत
साधकाने आपल्या योगानुसार आपल्या धारणेनुसार आपल्या शक्तीनुसार अध्यात्माच्या मार्गात गुरुंचा पाठपुरावा करावा व जेवढी प्रगती ते करून देतील तेवढी झाल्यावर पुढील प्रगती साठी विचार दत्तात्रेय करतील या विश्वासाने आपली उन्नती करीत राहावे
मंजिलपे पहुंचा तो मंजिल बढा दि
आपली प्रगती आपल्यात स्थित्यंतर सतत करण्याचा अहोरात्र प्रयत्न करावा जन्माला आल्यावर जसे आपण एक एक वर्ग करत पुढे पुढे शिकत जातो आणि शिक्षणाच्या उच्चतम पदावर जाऊन पोहोचतो त्याचप्रमाणे अध्यात्मिक उन्नती हे सातत्याने प्रांजळपणे शुद्ध अंत:करणा ने करीत रहावी. गुरुसंस्था याची दखल घेत असते हे या उदाहरणावरून लक्षात येईल.
माधवनाथ महाराज नाव-गाव काहीही माहीत नसताना त्याच्या घरी पोहोचले कसे त्याच्या पत्नीला होणारे ॲबार्शन चे कारण त्यांनी कसे ओळखले आणि ती अडचण दूर कशी केली, एका गुरूंनी दिलेला आशीर्वाद हा बरोबर नसेल तर तो स्वतःच्याच निर्णयाने बदलायचा, हे सर्व विचार करण्यासारखे आणि अभ्यासाचे मुद्दे आहेत. याचे मनन चिंतन करायला हवे.

Leave a Reply