पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 133

375 वर्षा पूर्वीचे योगी व नरेन्द्रनाथांची भेट ही सर्व लोकांच्या आकर्षणाचा विषय होता. दोघांमधे नजरेतून गुप्त चर्चा सुरू असल्याचे इतरांना भासत होते. नरेन्द्रनाथांच्या भेटीचा त्यांना खूप आनंद झाल्याचे दिसत होते. त्यांच्या कडून सुरू असलेल्या कार्याचे त्यांनी त्यांच्या कृतीतून खूप कौतुक केले होते. त्यांनी सांकेतिक रूपाने एक वस्तू आणि ५००० रुपये दिले.
मौनीबाबा ३८० व नरेन्द्रनाथ ८५

17-06-22          ३७५ वर्षे वयाच्या मौनी बाबाची भेट

नरेंद्रनाथांनी कार्याला सुरुवात केल्यानंतर  निरनिराळ्या साधुसंतांच्या, महात्म्यांच्या  भेटी सहज होत असत.

कार्याला सुरुवातच मुळी हिमालयातल्या साधूंच्या आशीर्वादाने झाली होती. ज्यावेळी नरेंद्रनाथ  महाराज हिमालयात गेले होते त्यावेळेला त्यांची अपेक्षा अशी होती की साधुसंतांच्या भेटी होतील आणि त्यांच्या  भेटीमुळे आपल्याला काही विशेष ज्ञान मिळेल. परंतु ज्या वेळेला प्रत्यक्ष ते हिमालयात गेले त्यावेळेला अनेक साधू त्यांना सहजतेने भेटले. काही तर स्वतःहून यांच्या दर्शनाला मुद्दामून आले होते. ते स्वतःहूनच म्हणत होते की हम आपकी बहुत दिनोसे राह देख रहे है, आज आपके दर्शन हुए ।

खरंतर व्यंकटनाथ महाराजांनी नरेंद्रला स्पष्टपणे सांगितले होते की तू कुठेही जाऊ नकोस तुला ज्यांचे दर्शन घ्यायचे असेल ते स्वतःहून तू जिथे असशील इथे येतील.

जे कार्य  नरेंद्र नाथांवर सोपवलं होतं ते सद्गुरूंच्या योजनेप्रमाणे व्यवस्थित सुरू होते . निरनिराळ्या व्यक्तींच्या भेटी या जणू पूर्वनियोजितच होत्या असे त्या भेटल्यावर वाटत असेल.

नाथपंथ हा गुरुस्थानी आहे याची अनुभूती ज्यावेळेस निरनिराळे कार्य करणारे संत-महात्मे भेटत असत त्यावेळेला स्पष्टपणे येत असे असे.

सद्गुरूंनी कार्याला सुरुवात करण्यापूर्वी एवढे जबरदस्त आशीर्वाद दिले होते की निरनिराळ्या देवता व आध्यात्मिक कार्य करणारे संत यांच्या सहजतेने भेटी होऊन कार्य  चांगल्या तऱ्हेने लोकांपर्यंत पोहोचेल.

एकदा नरेंद्रनाथ महाराजांना माहिती मिळाली की मौनिबाबा नावाचे संन्यासी नाशिक जवळ नारायणगावला राहतात ते 375 वर्षांचे आहेत.

नवनाथांचा काळ हा तीनशे वर्षांपूर्वी पर्यंतचा हे लक्षात घेऊन या संन्यासाची आणि नवनाथ यांची भेट झाली असेलच या कल्पनेने नरेंद्र महाराज त्यांच्या भेटीसाठी गेले हे गृहस्थ एका बंद खोली मध्ये राहतात सदैव आपल्या साधनेत असतात व त्यांची इच्छा झाली तर ते दर्शन देण्यासाठी बाहेर येतात दर्शन सर्व लोकांना ते देत नाहीत, तर त्यांना ज्यांना भेटायचे आहे त्यांनाच ते भेटतात. हे लक्षांत घेऊन नरेन्द्रनाथ महाराजांनी त्यांच्याकडे निरोप पाठवला व भेटीची इच्छा प्रगट केली त्यांनी ती तात्काळ मान्य केली व त्याप्रमाणे त्यांच्या भेटीसाठी नरेंद्र महाराज आपल्या शिष्यांसह गेले.

तिथे गेल्यावर मौनी बावांनी नरेंद्रनाथांना पाहताच स्वतःहून वंदन केले व त्यांच्या जवळ येऊन ते त्यांच्याशी बोलू लागले. त्यांची भाषा सामान्यता कोणाला कळत नाव्हती परंतु त्यांचे बोलणे नरेंद्र नाथांशी व्यवस्थित सुरू होते

नरेंद्रनाथांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना अतिशय समाधान वाटले कार्य पुढे जाण्याच्या दृष्टीने त्यांनी नरेंद्रनाथांना आशीर्वाद दिले व सांकेतिक खुण म्हणून अतिप्राचीन काळातील एक वस्तू नरेंद्र नाथांना दिली. ती वस्तू 400 वर्षापर्यंत सहज टिकेल असे ते म्हणाले. याशिवाय त्यांनी नरेंद्रनाथांना त्यांच्या कार्यासाठी 5000 रुपये अनुदान दिले.

उभयतांचे आपापसातील बोलणे हे नजरेतूनच होत असतांना दिसून येत होते. या प्रसंगाच्या वेळी त्यांच्याबरोबर काढलेला फोटो दिलाच आहे. कार्याचे सफलतेसाठी त्यांनी शुभचिंतन केले व तुम्ही इथून करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या पिठावर जाणार आहात म्हणून पुढे होणार्‍या कार्याबद्दल त्यांनी आशीर्वाद दिले.

विशेष म्हणजे त्यांनी आग्रहाने नरेंद्रनाथांना चहा दिला. नरेंद्रनाथ चहा घेत नसत परंतु बाबांची इच्छा म्हणून त्यांनी चहा आणला त्याच्या मध्ये त्यांनी तेवढेच प्यायचे पाणी टाकले आणि तो चहा नरेन्द्रनाथांना स्वतः देऊन पिण्यास सांगितला. यामुळे नरेन्द्रनाथांचे प्रकृती स्वास्थ्य चांगले राहील असे ते म्हणाले. त्या योग्याची काय योजना होती ती त्यांनाच माहीत. त्यांची प्रकृती चांगली होती. गावांतील लोक संगत होते की 100 वर्षांपूर्वी ते जसे आज दिसतात तसेच दिसत होते. 100 वर्षात त्यांच्या प्रकृतीत कोणताही बदल झाला नाही.जर हे शक्य असेल तर ते 375 वर्षांचे आहेत यात शंका घेण्याचे कारणच उरले नव्हते. नरेन्द्रनाथान बरोबर ते 400 वर्षापूर्वीच्या गोष्टी बोलत होते. नाथांचा आणि त्यांचा आलेल्या संबंधांविषयी देखील ते बोलले.

375 वर्षा पूर्वीचे योगी व नरेन्द्रनाथांची भेट ही सर्व लोकांच्या आकर्षणाचा विषय होता. दोघांमधे नजरेतून गुप्त चर्चा सुरू असल्याचे इतरांना भासत होते. नरेन्द्रनाथांच्या भेटीचा त्यांना खूप आनंद झाल्याचे दिसत होते. त्यांच्या कडून सुरू असलेल्या कार्याचे त्यांनी त्यांच्या कृतीतून खूप कौतुक केले होते.

त्यांनी सांकेतिक रूपाने दिलेल्या वस्तू आणि ५००० रुपये दिले. त्या नंतर नरेंद्रनाथांना कार्य वाढविण्यात कोणताही त्रास झाला नाही व कार्याला पैसा कमी पडलं नाही. त्या घटनेनंतर लोकांमध्ये नाथ पंथाविषयी विशेष आकर्षण वाढले

गेल्या तीस वर्षांच्या अनुभवावरून नरेंद्रनाथांनी काही पुस्तके लिहिली आहेत त्या पुस्तकात कठीण विषय सोपा करून सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे या पुस्तकाची प्रेरणा त्यांच्या आशीर्वादाने मिळाली

  आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी योगेश्वरानंदांच्या  छायेत, या पुस्तकाला संदर्भ ग्रंथाचा दर्जा देऊन नाथपंथाच्या लिखाणाला आपली मान्यता दिली. डॉक्टर विजय भटकर हे नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू  देखील आहेत .

     अशा तऱ्हेने निरनिराळे शास्त्रज्ञ, शंकराचार्य करवीर पीठ, शंकराचार्य शृंगेरी पीठ, शंकराचार्य कांची कामकोटी व शंकराचार्य हम्पी पीठ यांनी नरेंद्रनाथ महाराजांच्या लिखाणाचा व कार्याचा गौरव केला आहे.

      हा खेळ प्राक्तनाचा की पूर्वसंचिताचा, नवनाथ बोधामृत, योगेश्वरानंदांच्या छायेत आणि  आत्मोन्नती साधना हे सर्व पुस्तके सद्य पिढीला व भावी पिढीला मोलाचे मार्गदर्शन करणारी आहेत.

   अशा तऱ्हेने साधुसंतांच्या व महात्म्यांच्या भेटी होऊन नाथपंथा विषयीची माहिती समाजापुढे येत आहे.

    हे सर्व सद्गुरूंच्या आशीर्वादाशिवाय  शक्य नाही

ॐ नमो भगवते व्यंकटनाथाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञान  प्रदाय चिदात्मने ॐ

Leave a Reply