पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 147

जर गुरूंचे मार्गदर्शन लाभले असेल तर गुरु सांगतील त्याप्रमाणे साधना उपासना करावी व जीवनांत पुढील तत्वांचा अंमल करावा. जर गुरु लाभले नसतील तर आपल्या आवडीच्या देवतेचे नामस्मरण करावे व पुढील पथ्य पाळावेत, सद्गुरूंची भेट होईल व जीवन आपोआप सन्मार्गी लागेल

05-08-22                                 साधकाने पाळावयाची पथ्ये :

                                    जर गुरूंचे मार्गदर्शन लाभले असेल तर गुरु सांगतील त्याप्रमाणे साधना उपासना करावी व जीवनांत पुढील तत्वांचा अंमल करावा. जर गुरु लाभले नसतील तर आपल्या आवडीच्या देवतेचे नामस्मरण करावे व पुढील पथ्य पाळावेत, सद्गुरूंची भेट होईल व जीवन आपोआप सन्मार्गी लागेल
 
(१) भूतकाळाची आठवण नको. भविष्यकाळाची चिंता नको. आजचा काल जास्तीत जास्त चांगल्या तन्हेने घालवावा.
(२) परमेश्वर ठेवील त्या स्थितीत आनंदाने रहावे.

(३) परमेश्वराजवळ सुखाची याचना करू नये. कारण यामुळे आपली जीवदशा उगीच वाढते. तीच तर कमी करण्याचा आपला प्रयत्न असतो.
(४) संकल्प-विकल्पांना मनात थारा देऊ नये. कारण ते क्वचितच सिद्ध होतात. आपली आशा मात्र उगीचच वाढते व मनस्तापास कारणीभूत होते.
(५) जगाबद्दल उदासीन रहावे.
(६) राग, द्वेष यांसारखे दुर्गुण गेले म्हणजे मन शुद्ध होते. मगच तेथे देवाचा वास होतो
(७) सर्वांशी नम्रतेने रहावे. अर्थात लांगूलचालन नको.
(८) सर्वाभूती दया असावी.
(९) प्रारब्ध भोगूनच संपवावे लागते. म्हणूनच संकटामधे धैर्याने तोंड द्यावे. (१०) जे करायला अवघड असते ते प्रथम हातावेगळे केले तर मग दुसन्या गोष्टी सहज होऊन जातात. ( ११ ) संसाराची आसक्ती कमी कमी करायची.
( १२ ) आपण मोठे पंडित, ज्ञानी हा टेंभा नको. कारण ब्राह्मीस्थितीत ज्ञानही नसते व अज्ञानही नसते. ( १३ ) साधकाने निर्व्यसनी असावे. म्हणजे बुद्धी तल्लख रहाते व आत्मविचार करणे शक्य होते.
(१४) नेहमी सात्त्विक आहार घ्यावा, कारण जसे अन्न खाऊ तसे आपले मन होत असते. सात्विक मन इंश्वरोपासनेस योग्य असते. ( १५ ) ईश्वरी संकल्पाने प्राप्त झालेले भोग किंवा दुःखे आपण टाकू शकत नाही. तेव्हा त्यांना सामोरे जाणेच श्रेयस्कर असते. ( १६ ) धन, संपत्ती. वैभव हे सर्व ईश्वराचे देणे, हे शेवटी सोडून जायचे आहे ही भावना सदैव जागृत ठेवावी.
(१७) जितके कमी बोलाल तितके मन शांत व शक्तिशाली बनते. तेव्हा कमी बोलणे हेही मौनच आहे.
(१८) शक्य तितका जास्त एकांत साधा यामुळे आपल्यास दिव्य अनुभव येत असतात; ते जाणणे शक्य होते.
(१९) परधन, परस्त्रीची अभिलाषा नको.
( २० ) सर्व देव एकच. तत्त्व एकच. आपल्या भावनेत फरक असतो. म्हणून सर्वांबद्दल आदर दाखवावा. आपल्या देवाबद्दल फार तर जास्त आपुलकी दाखवावी इतकेच. भांडू नये.
(२१) लोकांच्या आनंदात, वैभवात सुख मानावे, दु:खरहित सुख हे फक्त जीवन्मुक्तांनाच प्राप्त होते.
(२२) जोपर्यंत तुम्ही याचक नाही, तोपर्यंत भिण्याचे कारण नाही. सर्वच परमेश्वरूप आहोत, तर भ्यायचे कोणाला ?
( २३ ) दुसऱ्यावर उपकार करा. अनेक लोकांचे आशीर्वाद ही एक बलवान शक्ती आहे. दानधर्मात अहंकार नको. कारण जे देता ते सर्व ईश्वराचेच असते. तुम्ही फक्त निमित्तमात्र.
(२४) कोणालाही खोटे आश्वासन देऊ नका. खोटे पण बोलू नका. यामुळे आपण सत्यापासून दूर जातो. अध्यात्मात ते योग्य नाही.
( २५ ) दुसऱ्यांच्या दोषांत किंवा व्यंगात आनंद मानू नये.
( २६ ) आनंदी व स्वस्थ मनाने केलेली उपासना प्रभावी असते. मारून मुटकून बसण्यात ओलावा नसतो. भाव पण नसतो. मग फलद्रुप कशी होणार ?
(२७) चमत्कारावर भुलू नका.
(२८) आई, वडील, गुरू यांस पूज्य मानावे.
(२९) अंतर्मुख व्हावे. याने शांती मिळते.
(३०) साधकांनी समाजात फारसे मिसळू नये. नाना विकार उत्पन्न करणारे नाटक, सिनेमा, तमाशे पहाणे टाळावे.
(३१) नुसती माळ घेऊन “राम राम ” म्हणण्यापेक्षा सर्वांत “राम ” मधून त्यांच्याशी तसे वागणे जास्त फाययाचे ठरते. ही नाथांची जीव-ब्रह्मसेवाच होते.
(३२) संकटकाळी धैर्य सोडू नये. उलट सामोरे जावे. मार्ग ईश्वरकृपेने सापडतो व ढगाप्रमाणे ती  उडून जातात.
(३३) लोटा जसा रोज घासून स्वच्छ ठेवावा लागतो त्याप्रमाणेच साधनाही रोज करायलाच पाहिजे. आळस उपयोगी नाही.
(३४) पाऊस आला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतोच. तसे प्रगती दिसली नाही तरी साधना चालूच ठेवावी लागते.
(३५) आपण चिरंजीव नाही. तेव्हा परस्परात भांडण्यात वेळ न घालवता तो अहर्निश चितन, मननात खर्च करावा.
( ३६ ) साक्षात्कारी संतचि ग्रंथ वाचावेत. नुसत्याच प्रकांड पंडितांचे वाचून उपयोग नाही.
(३७) श्रीमंत व नास्तिक लोकांपासून दूर रहावे. नाहीतर उगीच भोगांची इच्छा वाढते व ईश्वर विसरला जातो.
(३८) जग ही ईश्वरी लीला. या नाटकात आपण नट. जे काम वाट्याला आले. ते बरोबर चठवले पाहिजे काम झाले की पडद्याआड जायचे व हे नाटक कला-ईश्वर व तो..
(३९) मृत्यू हा सर्वांस अटळ आहे; तेव्हा भिण्यात अर्थ नाही.
(४०) दुष्टांपासून चार हात लांब रहावे. वादविवाद टाळावे. कोणालाही चावा फार तर घेऊ नये. पण जरूर तेव्हा फुत्कारायला हरकत नाही. मिळते-जुळते घेण्याची प्रवृत्ती, प्रेमाची वागणूक ठेवली व आपले आध्यात्मिक बळ वाढलेले असले तर त्याचा प्रभाव समोरच्या माणसावर नक्कीच पडतो. मग शत्रू राहू नये. सगळे मित्रच.
(४१) पुढे पुढे तर सगे सोयरे, घरातील मंडळी यांचा संबंध फक्त जरूर तेव्हा व तेवढाच ठेवायचा. तोही अगदी कमी कमी करीत आणायचा व जास्तीत जास्त एकांतात राहून मौन पाळायचे. सलग अलग वहा रहा

                        नुसते डोक्याला हात लावून प्रारब्धाला शिव्या देऊ नका. सारखा प्रयत्न, त्याची पराकाष्ठा हवी. सदैव आपले चित्त प्रसन्न ठेवावे. आपण या जगात आनंदाने आलो. जायचेही आहे आनंदातच. मग मधल्या काळातदेखील आनंदच वाटेल अशी कर्मे करीत रहावे, हे उचित नाही का ?

अलिप्तपणे राहून बुद्धीचे खेळ कसकसे चालत असतात ते पहाणे फार फाय द्याचे ठरते. आत्मनिरीक्षण-आत्मोन्नती न करता सदेव प्रयत्न, साधनेचा अभ्यास सारखा हवा. निराशा, न्यूनगड झुरळासारखा झटकून टाका. नत्राचा पाढा नको. हे सदा प्रगतीच्या आड येतात.एक टिप्पणी

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

mrMarathi