पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 149

ब्रम्हांडाच्या नियमाप्रमाणे एकदा जीव गेल्यावर तो  पुन्हा त्याच देहाने आणि त्याच कुटुंबात लगेचच  जन्माला येत नाही.तो आपल्या कर्म बंधनानुसार कोणत्यातरी योनीमध्ये जन्म घेऊन आपल्या जीवाचा जीवनप्रवास करीत असतो. मेल्यावर त्याच देहाने पुन्हा जीवंत करण्याचे सामर्थ्य नाथपंथात दिसून येते.
मच्छिंद्र नाथ सर्व नाथांबरोबर

07-08-22 मेल्यावर त्याच देहाने पुन्हा जीवंत

 रेवण नाथांनी पूर्वी मेलेल्या आपल्या शिष्यांच्या मुलांना मरणाच्या काही कालावधीनंतर त्याच देहानी जिवंत करून पुन्हा आणले हे केवळ अतर्क्य आहे. ब्रम्हांडाच्या नियमाप्रमाणे एकदा जीव गेल्यावर तो पुन्हा त्याच देहाने आणि त्याच कुटुंबात लगेचच जन्माला येत नाही. तो आपल्या कर्म बंधनानुसार कोणत्यातरी योनीमध्ये जन्म घेऊन आपल्या जीवाचा जीवनप्रवास करीत असतो. पुन्हा मानव योनीत जन्माला आला तरी त्याच देहाने त्याच कुटुंबात जन्माला येत नाही.

         त्याचप्रमाणे मागील लेखामध्ये आपण पाहिले की सद्गुरु व्यंकटनाथ महाराजांचे कृपेने एक वर्षापूर्वी मेलेल्या जीवाला त्याच देहानिशी प्रत्यक्ष जिवंत उभे दाखवून त्याच्या नातलगांना त्यांचे दर्शन घडवले. नाथांची ही आघाद लिला जेवढी वर्णन करावी तेवढी थोडीच आहे.

गोरक्षनाथांनी देखील असाच काही प्रकार केला. आपण कपडे धुतो तसे एका लहान मुलाला नदीच्या खडकावर आपटून आपटून धुवून काढले आणि त्याच्या कातडीची खोळ ठेवून बाकी सर्व माशांना मगरींना खाऊ घातले आणि त्या शरीराची खोळ तारेवर वाळत घातली. हे कथानक शांतपणे वाचून पहा म्हणजे दोन जीवांमधील रेष म्हणजे मृत्यू हे त्यांचे म्हणणे लक्षात येईल.

‘‘सिंहलद्वीपात इंद्र एक मोठा यज्ञ करील त्या वेळेस त्या समारंभाला विष्णु,

ब्रम्हदेव, शंकर वगैरे सर्व श्रेष्ठ देव येतील, त्यांच्या बरोबर नवनाथही येतील. तेव्हा आता शोक सोडून विमानात बसून सिंहलद्वीपात चल.’’ मैनाकिनी जाणार म्हणून सर्व स्त्रियांना फारच दुःख झाले. जातांना तिने सर्वांची समजूत घातली व दैर्भामेस व्यवस्थितरीतीने राज्य चालवून सर्वांना सांभाळण्याचा उपदेश केला. नंतर तिला सिंहलद्वीपात पोचवून उपरिक्षवसू आपल्या स्थानी गेला. अशा तर्‍हेने मैनाकिनी शापमुक्त झाली.

इकडे मच्छिंद्रनाथ हिंडत हिंडत गौडबंगाल्यात आले. तिथे त्यांची कानिफाची भेट झाली तेव्हा आपल्याला या पुण्यवान माणसामुळे गुरूची भेट झाली. असा विचार मनात येऊन गोरक्ष मीननाथाला खाली उतरवून कानिफनाथाच्या पाया पडला. भेटतांना त्यांच्या डोळयात अश्रू होते. तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्याला रडण्याचे कारण विचारले.

मग गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाला निवेदन केले. जालिंदरास गोपीचंद राजाने पुरल्याची हकिगतही सांगितली. ते ऐकून मच्छिंद्रनाथ मनातून रागावला नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीत म्हणजे हेलापट्टणास येऊन पोचले. तेव्हा गावातील बरीच मंडळी त्यांना भेटली. कानिफनाथाने जालिंदरास वर काढल्या पासून मुक्तचंद राज्यावर बसे पर्यंतची हकीकत त्यांनी मच्छिंद्रास सांगितली मग त्याने हल्ली राज्यकारभार कोण चालवतो म्हणून विचारताच तो मैनावतीच्या मार्फत चालतो, असे गावकरी सांगू लागले. गावकर्‍यांनी मैनावतीची खूपच स्तुती केली.

मच्छिंद्रनाथांचा व जालिंदरनाथांचा परस्पर काही संबंध जरी दाखविला नाही. तरी ते दोघे गुरुबंधू होते व मुळातले नवनारायण होते. या संपूर्ण कार्याची इत्थंभूत माहिती त्यांना होतीच. जरी व्यावहारिक दृष्ट्या त्यांचे कार्य वेगवेगळे होते. तरी पंथकार्याविषयी ते जागृत होते. त्यांच्या दैनंदिन आन्हिकात त्यांना सृष्टीवर कुठे काय सुरू आहे. हे अंतर्ज्ञानाने माहीतच होते. नाथपंथाच्या विभूतीला लिदीत पुरले. याचा त्यामुळे राग आला. तथापि कार्य हे स्वतंत्र असल्यामुळे त्यांनीदेखील प्रत्यक्ष ढवळाढवळ केली नाही फक्त काय आहे हे जाणून घेतले. हे ऐकून तिची भेट घेण्याच्या उद्देशाने गोरक्षनाथ व मीननाथ यांच्यासह मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेले. तेथे पोचताच मैनावतीला आपण आल्याची वर्दी देण्यास द्वारपालाला सांगितले. द्वारपाल लगेच आत गेला व कोणी योगी दोन शिष्यांबरोबर आला आहे, असे त्याने मैनावतीस सांगितले. मैनावतीने त्याचे वर्णन विचारल्यावर ते हुबेहूब जालिंदरनाथासारखे दिसत आहेत, असे द्वारपाल म्हणाले, ‘‘ते ऐकताच प्रधान व इतर मंडळींसह मैनावती त्यांना सामोरी गेली आणि त्यांना मंदिरात घेऊन आली. त्यांना सुवर्णाच्या आसनावर बसवून त्यांची षोडशेपचारे पूजा करून ती म्हणाली, ‘‘आपले पाय आज येथे लागल्याने मी अगदी धन्य झाले आहे.’’

तिच्या आदराच्या बोलण्यानंतर मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले, ‘‘मी उपरिक्षवसूचा मुलगा, मला मच्छिंद्रनाथ म्हणतात. दत्तात्रेयाने मला अनुग्रह दिला, जालिंदरनाथासही त्यांनीच उपदेश केला. जालिंदरनाथ माझा धाकटा गुरुबंधू आहे. त्याला इथे त्रास झाला हे ऐकून मी रागाने येथे आलो होतो. परंतु येथील सर्व प्रकार ग्रामस्थाकडून कळला आणि माझा राग शमला. तेव्हा तुझ्या उत्तम गुणाबद्दल तुझी तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. मला फार समाधान वाटते तू धन्यता मिळवलीस यामुळे बेचाळीस कुळे उद्धरलीस धन्य आहेस तू.’’

अशाप्रकारे नाथ बोलत असताना मैनावती त्यांच्या पाया पडली व म्हणाली, ‘‘महाराज हे सर्व आपल्या कृपादृष्टीनेच झाले आहे. चांगले किंवा वाईट जशी इच्छा करावी तसे फळ मिळते परिसाने लोखंडाचे सुवर्ण होते पण या पेक्षा तुमचे औदार्य हे अधिक आहे.’’

हेलापट्टणाहून निघाल्यावर गोरक्षनाथ व मीननाथ यांच्यासह मच्छिंद्रनाथ गावोगाव फिरत, जगन्नाथपुरीस गेले. तेथेही ते तीन रात्री राहिले. तीर्थविधी केला व पुढे निघाले मग ते फिरत फिरत सौराष्ट् गावी वस्तीला राहिले. दुसर्‍या दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेसाठी गावात गेला तेव्हा मीननाथ अजून निजला होता. तो उठल्यावर मच्छिंद्रनाथाने त्याला शौचास बसविले. इतक्यात गोरक्षनाथ भिक्षा मागून परत आला. तो आलेला पाहताच मच्छिंद्राने त्याला मीननाथास धुऊन आणायला सांगितले. मीननाथ लहान असल्याने त्याचे सगळे हात पाय भरून गेलेले पाहून गोरक्षनाथास घाण वाटली. त्याच्या मनात आले की आपल्यासारख्या संन्याशाला हा खटाटोप कशाला हवा.

त्या रागाच्या आवेशात गोरक्षनाथ मीननाथाला घेऊन नदीवर गेला व तेथे एका दगडावर त्याला आपटून त्याने त्याचा प्राण घेतला. नंतर त्याचे प्रेत पाण्यात नेऊन हाडे, मांस मगरी व माशांना खायला टाकले व कातडे मात्र स्वच्छ धुऊन घरी नेऊन वाळत घातले. त्यावेळी मच्छिंद्रनाथ तेथे नव्हते. ते परत आल्यावर त्यांनी मीननाथाची चौकशी केली. तेव्हा ‘‘त्याला सुकत ठेवला आहे’’, असे गोरक्षाने सांगितले. पण त्याला गोरक्षाचे म्हणणे कळलेच नाही. तेव्हा बाहेर नेऊन वाळत घातलेले मीननाथाचे कातडे गोरक्षनाथाने दाखवले ते पाहून मच्छिंद्रनाथ धाडकन जमिनीवर कोसळला गडबडा लोळून मोठ मोठ्याने विलाप करु लागला, डोके आपटू लागला त्याचे कातडे हाती घेऊन त्याच्या गुणाचे वर्णन करू लागला.

दोन जीवनाच्या मधली रेष म्हणजे मृत्यू अशा विचारांचे गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ होते. संपूर्ण ब्रह्मांडावरच त्यांची सत्ता होती. त्यामुळे जीवन मरण याला आपण जे महत्त्व देतो ते त्यांच्या दृष्टीने गौण होत. त्याचे गुरू भगवान दत्तात्रेयदेखील असेच होते. मनुष्य देह पाहिजे त्या वयोगटातला घेत असत व जेंव्हा तो नको असेल तेव्हा तो पंचतत्त्वात तत्काळ विलीन करीत असत. पंच तत्त्वांचा देह पंच तत्त्वातून हवा तसा घ्यायचा व तो पाहिजे तेंव्हा त्याच पंचतत्त्वात सहजतेने विलीन करायचा हेच तर गुरू दत्तात्रेयांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपण मीन नाथाला मारून टाकतो आहे त्याच जीवन संपवितो आहे ही गोरक्षनाथांची भूमिकाच नव्हती. गुरू व शिष्य एकमेकांची परीक्षा पाहत होते असेच म्हणावे लागेल.

ते पाहून गोरक्षनाथ मनात म्हणाला, ‘‘गुरूची भ्रंाती अजून गेली नाही. मग तो त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला, ‘‘गुरुराज तुम्ही अशा तर्‍हेने अज्ञानात का शिरता ? तुम्ही कोण, मुलगा कोणाचा आणि असे रडता काय, कोण मेला आहे याचा विचार करा, अशाश्वताचा नाश होतो. शाश्वतास मरण नाही, तुमचा मीननाथ कधीही मरायचा नाही शस्त्राने, अग्नीने, वार्‍याने, पाण्याने किंवा कोणत्याही प्रकारानेही त्याचा नाश होणार नाही कारण तो शाश्वत आहे.

गोरक्षाने पुष्कळ सांगून पाहिले. परंतु मच्छिंद्रनाथाचा शोक कमी होईना. मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा उपयोग करून भस्माची चिमूट मीननाथाच्या कातड्यावर टाकली. लगेच मीननाथ उठून उभा राहिला आणि तो मच्छिंद्राच्या गळयात पडला. मीननाथांच्या कातड्याशिवाय, हाडे, मांस इत्यादी काहीच नव्हते. तरी पण गोरक्षाने केवळ त्या शरीराच्या खोळीच्या आधाराने मीननाथाला पुन्हा जीवंत केले. आजच्या सायन्सलादेखील हे शक्य होणार नाही. येवढे हे शास्त्र गहन आहे. आपले ऋषी-मुनी, अवतारी पुरुषांच्या तुलनेत विज्ञान कोठेच बसत नाही व वैज्ञानिकदेखील तोकडे पडतील.

मच्छिंद्रनाथाने त्याला प्रेमभराने मिठी मारली. त्याचे मुके घतले व त्याच्याशी लडिवाळपणे बोलू लागला. मग त्या दिवशी ते तेथेच राहिले. दुसर्‍या दिवशी ते निघाले, तेव्हा गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाला विचारले, ‘‘तुम्ही निर्जीवाला सजीव कराल अशी तुमची शक्ती आहे. असे असतानाही आपण रडण्याचे कारण काय? तुम्हाला अशा तर्‍हेने रडताना पाहून मला फार आश्‍चर्य वाटले.’’

हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, ‘‘त्याला तू का मारलेस ते मला सांग. तेव्हा तो गुरुला म्हणाला मी तुमचा लोभ पाहण्यासाठी त्याला मारले. तुम्ही स्वतःला विरक्त म्हणवता आणि मीननाथावर इतके प्रेम आहे तर तुमचा स्थाई भाव कितपत खरा आहे हे मला पाहावयाचे होते. पण तुम्ही सर्व जाणून असून, कां रडलात हे मला समजून घ्यायचे होते.’’

हे ऐकून मच्छिंद्रनाथ त्याला म्हणाला आशा, तृष्णा, क्रोध वगैरे तुझ्या अंगी कितपत आहेत हे मला तपासून पाहायचे होते म्हणून मुद्दामच मी हे नाटक केले. शाश्वत, अशाश्वत हे तुला कळले आहे की नाही या बद्दल मला शंका होती.  या प्रसंगाने माझी खात्री झाली आहे की तू मला पाहिजे तसा घडला आहे. आता मला तुझी काही काळजी नाही.

मेल्यावर त्याच देहाने पुन्हा जीवंत करण्याचे सामर्थ्य नाथपंथात दिसून येते.

आशा प्रकारे गुरु शिष्यांनी एकमेकांची खात्री करून घेतली आणि कार्याला लागले. 

Leave a Reply