पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 151

ब्रम्हांडामध्ये फक्त जीव सृष्टी आहे आणि जीव सृष्टीवरच नाथांच प्रभुत्व आहे ही कल्पना करणे चुकीचे आहे. नद्या पर्वत वनस्पती  चल अचल अशा अनेक गोष्टींचा समावेश ब्रम्हांडात आहे.त्या सर्वांवर नाथांच प्रभुत्व आहे. निसर्ग, ज्यामध्ये नद्या पर्वत,अचल गोष्टी येतात त्यावर देखील नाथांचे प्रभुत्व आहे हे नाथांनी आपल्या कृतींनी  दाखवले आहे. यत पिंडे तद ब्रम्हांडे हे त्यांनी दाखवून दिले आहे.

09-08-22 लघवी करुन पर्वत सुवर्णाचा केला    

माणूस मेल्यावर काही कालावधीनंतर मेलेल्या माणसाला, ज्याचे अग्निसंस्कार होऊन गेलेले आहेत, देहाची, अस्थीची रक्षा होऊन गेलेली आहे, देहाचा कोणताही मागमूस राहिला नाही, त्या जिवाला त्याच देहाने नाथांनी पुन्हा जिवंत केलं हे आपण मागील लेखात पाहिल मृत्यू पावलेल्या जीवाला पुन्हा जिवंत करणे थोड्या अवधी करता किंवा उर्वरित आयुष्य जगण्यासाठी, हे नाथांनी करून दाखवलं आहे. हे सर्व ब्रम्हांड तत्वाच्या विरोधात जाऊन प्रारब्ध पूर्वसंचित जीवन मरण सर्व काही नाथांच्या नियंत्रणाखाली आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. म्हणजे पंचतत्वाचा जो देह पृथ्वी आप तेज वायू आकाश या तत्त्वांचा देह निर्माण करून त्यात जीव प्रस्थापित करून पुन्हा त्याच  देहाने जीवन जगणे हे अशक्यप्राय, नाथांनी सहज लिहिलया करून दाखवले आहे.     ब्रम्हांडामध्ये फक्त जीव सृष्टी आहे आणि जीव सृष्टीवरच नाथांच प्रभुत्व आहे ही कल्पना करणे चुकीचे आहे. नद्या पर्वत वनस्पती  चल अचल अशा अनेक गोष्टींचा समावेश ब्रम्हांडात आहे.त्या सर्वांवर नाथांच प्रभुत्व आहे. निसर्ग, ज्यामध्ये नद्या पर्वत,अचल गोष्टी येतात त्यावर देखील नाथांचे प्रभुत्व आहे हे नाथांनी आपल्या कृतींनी  दाखवले आहे. यत पिंडे तद ब्रम्हांडे हे त्यांनी दाखवून दिले आहे. या निसर्गाचा देखील मानवी जीवनाशी अत्यंत निकटचा संबंध आहे त्यामुळे निसर्गावर देखील नाथांनी तेवढेच प्रभुत्व असल्याचे दाखवून दिले आहे.परंतु हे सर्व करत असताना गुरु आपल्या शिष्याची कसून परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेत तो गुरूंचे समाधान कसे करतो हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे.

    गुरु-शिष्यांचा एकमेकावरचा विश्वास वाढून आढळ श्रद्धा दाखवणे आणि मानव जातीला, देवादिकांना तो एक धडा देखील होऊ शकेल असं कार्य नाथांनी केल आहे. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांच्या मोहाची लोभाची परीक्षा कशी घेतली हे समजून घेण्यासारखे आहे. गोरक्षनाथांनी गुरूंच्या मनातला हेतू लक्षात घेऊन त्यांना गोरक्षनाथ मोहातीत कसे आहेत हे त्यांच्यावरील नितांत भावानेने आणि श्रद्धेने करून दाखविले. जो कुबेर धनाचा स्वामी आहे जो कोणालाही हवे तेवढे धन देऊ शकतो त्या कुबेराला नाथांनी सोन्याचा पहाड दान दिला हे केवळ नाथच करू शकतात. सौराष्ट् गावाहून मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ फिरत फिरत तेलंगणात गेले. तेथे गेल्यावर त्यांनी गोदावरीच्या संगमावर स्नान करून आत्मलिंग शिवाची पूजा केली. तेथून ते औंढा नागनाथ, परळी वैजनाथ वगैर सर्व तीर्थे उरकून गर्भगिरी पर्वतावर वाल्मीकीऋषींचे स्थान आहे. तेथे ते अरण्य फार घनदाट होते अशा त्या घनघोर व भयाण अरण्यातून प्रवास करण्याची वेळ येताच मच्छिंद्रनाथ दचकला. त्याला एवढे घाबरण्याचे कारण म्हणजे स्त्रीराज्यातून निघतांना मैनाकिनीने त्याच्या झोळीत टाकलेली सोन्याची वीट होती. ती वीट वाटेत चोर नेतील. या भीतीने त्याच्या जिवाची घालमेल झाली होती. गोरक्षनाथाच्या लोभाची परीक्षा पाहण्यासाठीच ही सर्व भीती होती. मच्छिंद्राला भीती कशाची असणार तरी तो गोरक्षाला जवळ घेऊन एक सारखा विचारी काय रे त्या अरण्यात चोरांची भीती नाही ना. हे ऐकून गुरूला चोराच भय कशासाठी वाटते असा विचार गोरक्षाच्या मनात आला.

गुरू जवळ काही तरी मौल्यवान असले पाहिजे त्यामुळे अशी भीती त्यांना वाटत असेल. असा गोरक्षाने तर्क केला. या भितीच्या निवारणाचा विचार करीत तो मुकाट्याने चालत होता. इतक्यात एका ठिकाणी पाणी दिसले तिथे मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला जरा थांबावयास सांगितले व आपली झोळी त्याच्याजवळ देऊन तो शौचास गेला. गोरक्षाला झोळी जड लागली त्यामुळे त्याने झोळीत काय आहे हे पाहिले तो त्याला सोन्याची वीट दिली ती पाहून हेच गुरूच्या भीतीचे कारण आहे. हे समजून त्याने ती वीट फेकून देऊन विटेच्या आकाराचा वजनाचा एक दगड त्यात ठेवला आणि आपण पुढे चालू लागला मच्छिंद्रनाथही शौचाहून आल्यावर चालू लागला. गुरू मागून येत आहे असे पाहून गोरक्ष त्याची वाट पाहत एका झाडाखाली विश्रांती घेत बसला. इतक्यात एक विहीर दिसली तेथे त्याने स्नान उरकले मीननाथालाही स्नान घातले व नित्यकर्म उरकून घेत असतानाच मच्छिंद्रनाथ तेथे येऊन पोचला. पुढे काही भीती नाही ना असे पूर्वीप्रमाणेच विचारू लागला. गोरक्षनाथ म्हणाला, ‘‘भीती सगळी मागेच राहिली आता अजिताब काळजी न करता स्वस्थ राहावे. गोरक्षनाथाचे उत्तर ऐकून मच्छिंद्रनाथाला आश्‍चर्य वाटले. त्याने त्याला मिळालेल्या विटेची गोष्ट सांगितली व त्यामुळे वाटणारी भीतीही पुन्हा एकदा बोलून दाखविली. ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाला, ‘‘आता आपल्याला डर नाही.’’ हे ऐकून मच्छिंद्रनाथ वीट पाहण्यासाठी तळमळू लागला. परंतु गोरक्षाने मच्छिंद्रनाथाचा हात धरला होता आणि दोघेही आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्यास निघाले. निघण्यापूर्वी मच्छिंद्राने झोळी तपासली. त्यावेळी झोळीत कनकवीट, सोन्याची वीट नाही हे त्याच्या लक्षात आले. तो गोरक्षाला पुष्कळ रागावला व मोहाने त्याने रडून एकच गोंधळ माजवला. त्या दुःखाने तो इतका वेडा पिसा झाला, की तो गडबडा लोळू लागला व वेड्यासारखा नाचू लागला. तो गोरक्षावर खूप संतापला. मच्छिंद्रनाथाचे हे जिव्हारी लागणारे बोलणे ऐकूनही गोरक्षनाथ गप्पच राहिला शांत राहिला. त्याने गुरूचा हात धरून त्याला पर्वत शिखरावर नेले. जाताना गोरक्षाने पर्वतावर सिद्धयोग मंत्र जपून लघवी केली. त्यामुळे सर्व पर्वत लगेच सुवर्णाचा झाला. मग लागेल तेवढे सोने घेण्यास त्याने गुरूला विनंती केली. ते अघटित कृत्य पाहून गुरूने गोरक्षाची वाहवा केली. त्याला आलिंगन देऊन पोटाशी धरून म्हणाला, ‘‘बाळा गोरक्षा तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन मी काय करू.’’                                          मच्छिंद्रनाथ म्हणाला, ‘‘माझ्या मनात असा हेतू होता की, आपल्या देशात गेल्यावर साधुसंताची पूजा करावी भंडारा घालावा.’’ गुरूची ही इच्छा पूर्ण करण्याचे अश्‍वासन गोरक्षाने दिले मग त्या प्रमाणे गोरक्षनाथाने गंधर्वास्त्र मंत्र योजून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेकली. त्या बरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाथाला वंदन करुन काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला. तेव्हा गोरक्षाने सांगितले आणखी काही गंधर्वास बोलाव आणि त्यांना चारही दिशांना पाठवून बैरागी, संन्याशी, जपी तपी, साधुसंत, देव, गंधर्व, दानव व किन्नर या सर्वांना येथे आणावे कारण आम्हाला येथे अन्नदान घालायचे आहे. हे ऐकून चित्रसेनाने शंभर गंधर्व आणून सर्वांकडे पाठविले ते गंधर्व पुष्कळांना आमंत्रण करून त्यांना घेऊन आले. जपी तपी योगी याशिवाय शुक्राचार्य, दत्तात्रेय, याज्ञवाल्क्य, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, नारद, वाल्मीकी वगैरे सर्व मुनिगण तेथे थोडयाच वेळात येऊन पोचले. हे सर्व झाल्यावर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला नम्रपणे म्हणाला, ‘‘जेवणावळीस पुष्कळ मंडळी जमली आहेत तेव्हा मागे वाटेत टाकून दिलेली तुमची सोन्याची वीट मी आणून देतो ती घेऊनच हा समारंभ साजरा करावा. यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, ‘‘तुझ्यासारखा उत्तम शिष्य माझ्या जवळ असल्यावर मला सोन्याच्या विटेची काय चिंता आहे.’’ नंतर तो अन्नदानाच्या कामाला लागला. त्याने अष्टसिद्धींना बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन अनेक चांगली पक्वान्ने तयार करण्याची आज्ञा केली. नंतर त्याने इतरही सर्व व्यवस्था नीट ठेवून काहीही उणे पडू न देण्याची काळजी घेतली अशा तर्‍हेने गोरक्षाने समारंभाची व्यवस्था केली. तेव्हा सर्वांना अतिशय आनंद झाला. कुबेर म्हणाला, ‘‘तुमचा सोन्याचा पर्वत इथेच राहू दे. या सर्वांना मी वस्त्रे, भूषणे देतो त्याप्रमाणे कुबेराने सर्वांना दिल्यावर गोरक्ष नाथांनी कुबेराला सोन्याचा पर्वत दिला. कुबेराने पुष्कळ वस्त्रे व हर तर्‍हेचे पुष्कळ अलंकार आणून सर्वांना दिले. सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठ्या सन्मानाने निरोप घेतला.

आशा प्रकारे गोरक्ष नाथांनी निर्जीव वस्तूवर प्रभाव करून पर्वत सोन्याचा केला व तो कुबेराला दान दिला.  

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

mrMarathi