पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 112

                  पंच महा भुते माणूस घडवतात

पृथ्वी आप तेज वायू या महत्त्वांचा जीवावर परिणाम

                                103 लेखामध्ये गुरूने घडवलं जगन्मातेने ,भगवान दत्तात्रेयांनी परीक्षा घेऊन, सद्गुरु व्यंकटनाथांच्या तर्फे नरेंद्रनाथांना पंथ कार्याची अनुमति दिली, याचे वर्णन केले आहे. 104 लेखामध्ये सद्गुरु योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराज यांच्या समाधी नंतर नरेंद्र नाथांची झालेली अवस्था आणि त्यांच्या गुरु कार्याला कर्क संक्रमणापासून झालेली सुरुवात याचं वर्णन केल आहे. १०५ लेखामध्ये सद्गुरु आणि संत महात्म्यांच्या व हिमालयातील साधुसंतांच्या आशीर्वादाने नाथशक्तिपीठात सुरू झालेले वेद विज्ञान चे अघटित कार्याचे वर्णन केले आहे. १०६ व १०७ लेखांमध्ये भूमी तथा सूर्याच्या माध्यमातून भूमीवरील कुठल्याही ठिकाणाचे  कार्य नागपंथात सहजतेने केले जाऊ शकते ,हे उदाहरणासह दाखवले आहे .१०८ लेखामध्ये गुरुचरित्राचा आधार घेऊन  गुरुगीता आणि गुरूंचे महत्त्व  सांगून जीवनातील स्थित्यंतर हे सद्गुरु  घडवितात हे सांगितले आहे. १०९ व ११० मध्ये गुरूंच्या कृपेने अघटित कार्य कसे घडते याचे वर्णन केले आहे आणि 111 व्या लेखा मध्ये, म्हणजे मागच्या लेखात गुरुपदी पोहोचलेले गुरु भक्त कसे असतात, भक्तांचे प्रकार कसे असतात ,गुरुपदी पोहोचलेला भक्त हा केव्हातरी एक सामान्य भक्त असतो त्या भक्तांचे प्रकार आणि निकष हे सांगितले आहेत. जशी भक्ति वाढते, साधना वाढते, त्याप्रमाणात गुरूंचे सान्निध्य, सेवा घडते व त्यांच्या कृपेचा योग येतो. आणि वाढता वाढता आत्मोन्नती होऊन आपल्याला विशेष अनुभूती येऊ लागते.

           आता ब्रह्मांडामध्ये जन्माला येणारा आणि वावरणारा प्रत्येक सामान्य माणूस कसा घडतो आणि तो सद्गुरूंच्या कृपाछत्राच्या छायेखाली येईपर्यंत स्वतःमध्ये कसे स्थित्यंतर घडवू शकतो कोणत्या माध्यमातून तो घडवू शकतो आणि जोपर्यंत सद्गुरूं कडून उपासना मिळत नाही. तोपर्यंत कशाप्रकारे उपासना आणि साधना करावी याचे वर्णन येणाऱ्या चार-पाच लेखांमध्ये करण्यात येईल.

      ब्रह्मांडामध्ये जन्माला येणारा आणि वावरणारा प्रत्येक जीव हा पृथ्वी आप तेज वायु आकाश या पंचमहाभूतांच्या परिणामातून जात असतो. पंचमहाभूते प्रत्येक जीवावर सतत आपल्या तत्वांचा परिणाम करतात.  हा परिणाम जीवाच्या शरीरावर योगावर आणि भोगांवर होत असतो.

      ब्रम्हांडामधिल कार्याची योजना ही चार युगांमध्ये विभागली आहे सत्य त्रेता द्वापार आणि कलियुग असे चार विभाग आहेत या प्रत्येक विभागाचा युगाचा परिणाम प्रत्येक जीवावर होत असतो.

       त्याच प्रमाणे पृथ्वी आप तेज वायु आणि आकाश यांचाही परिणाम होत असतो. यापैकी आकाश तत्वाचा प्रत्येक युगात आणि प्रत्येक जीवावर, प्रत्येक  घटकांवर एकसारखा सामान्य परिणाम होत असतो त्यामुळे आपले योग, चार युग आणि पृथ्वी आप तेज वायू या चार तत्त्वांचा मिळून होणारा परिणाम हा प्रत्येक जीवाला एक दिशा देत असतो.

       जीव जन्माला आला की तो दिवसाच्या ज्या वेळेला जन्माला येईल ती वेळ आधार भूत धरून तो कोणत्या नक्षत्रावर कोणत्या चरणावर जन्माला आला हे पाहून त्याच्या नावाचे  आद्याक्षर काढले जाते व त्याचे नाव ठरवले जाते त्याच प्रमाणे हे नक्षत्र व जन्मवेळ लक्षात घेऊन त्यावेळी आकाशात ग्रहमंडल कसे होते हे पाहून पंचांगाच्या आधारावर त्याची जन्मपत्रिका तयार केली जाते व त्यानुसार तो कोणत्या राशीचा आहे हे निश्चित होते.

        ब्रम्हांडातील सर्व माणसे ही फक्त बारा राशी तच मोडली जातात.या  १२ राशींचे विभाजन चार महा तत्त्वांमध्ये केले आहे.

भूमितत्त्वात      : वृषभ, मकर व कन्या ह्या राशींचा समावेश आहे. जलतत्त्वात       : मीन, वृश्चिक व कर्क ह्या राशींचा समावेश आहे. अग्नितत्त्वात     : मेष, सिंह व धनू ह्या राशींचा समावेश आहे. वायुतत्त्वात       : मिथुन, तूळ व कुंभ ह्या राशींचा समावेश आहे. आकाश तत्व      याचा प्रत्येकयुगात आणि प्रत्येक जीवावर, घटकांवर, एकसारखा परिणाम होत असतो. त्याचा स्वतंत्र विचार करू.

            कृतयुगातील बहुतांश माणसे ही सामान्यतः भू तत्त्वाची होती. ते सर्व लोक सत्य वचनी व सत्य प्रीय होते त्यांचे आराध्य दैवत देवी भगवती होती. ह्या युगांत वृषभ,मकर व कन्या ह्या राशिच्या लोकांचे व त्या राशिच्या गुणधर्माचे वर्चस्व होते.

त्रेता युगातील बहुतांश माणसे ही अग्नि तत्त्वाची होती. बहुतांश लोक हे आपल शील जपणारे होते शीलाला अतीशय महत्त्व होत म्हणुनच तर सितेला अग्नि परिक्षा द्यावी लागली. ह्या युगांतल्या लोकांचे दैवत प्रभु रामचंद्र किंवा भगवान दत्तात्रेय होते.ह्या युगांत मेष, सिंह व धनु ह्या राशिच्या लोकांचे व त्या राशिच्या गुणधर्माचे वर्चस्व होते

द्वापारयुगातील बहुतांश माणसे ही आप तत्त्वाची होती. बहुतांश  लोक हे आपला विवेक जपणारे होते विवेकाला अतीशय महत्त्व होते म्हणूनच तर पांडव हे कृष्णाच्या सल्याप्रमाणे चालत असत. विवेकच महाभारताला कारणीभूत ठरला आहे. ह्या युगांतल्या लोकांचे दैवत विष्णु किंवा गणपती होते. ह्या युगांत मीन, वृश्चिक व कर्क ह्या राशिच्या लोकांचे व त्या राशिच्या गुणधर्माचे वर्चस्व होते

कलियुगातील बहुतांश माणसे ही वायु तत्त्वाची असतात. बहुतांश लोक हे दया व समता प्रीय असतात. दया व समतेला अतीशय महत्त्व असत म्हणुनच तर इतर सर्व तत्त्वे बाजुला ठेवून सामान्य बुद्धिला ह्या तत्त्वांनी जसे योग्य बाटते तसे व्यवहार होतात. धर्माच्या अधःपतनाला ह्या तत्त्वामुळेच खतपाणी घातले जात आहे. स्वार्थीबुद्धि अप्रामाणीकपणा ह्या मुळेच वाढला आहे.ह्या युगांतल्या लोकांचे दैवत शिव किंवा मारूती आहेत.ह्या युगांत मिथुन, तूळ व कुंभ ह्या राशिच्या लोकांचे व त्या राशिच्या गुणधर्माचे वर्चस्व असते.

भौगोलिक दृष्टीने विचार केला तर असे लक्षात येते, की भारतामध्ये ह्या पाच तत्त्वांची शिवलिंगे निरनिराळ्या ठिकाणी आहेत. कांचीपूरमचे लिंग हे पृथ्वीतत्त्वाचे आहे, तर आपतत्त्वाचे शिवलिंग तिरुवाणैकावल (त्रिचनापल्ली) येथे आहे.तिरुअण्णामलाई येथील लिंग हे तेजतत्त्वाचे असून, आंध्रमधील कालाहस्ती (तिरुपतीजवळ) येथे वायुतत्त्वाचे शिवलिंग आहे. तामिळनाडूतील चिदंबरम येथे आकाशतत्त्वाचे लिंग आहे.

अशाप्रमाणे भूतलावरच्या सर्व व्यक्तींवर पंचमहाभूतांचा खोलवर परिणाम झाला असून, सर्व लोकांचे वर्गीकरण हे पंचमहाभूतांच्या तत्त्वांनुसार १२ राशींत केले आहे. राशी म्हणजे त्या त्या महातत्त्वाचे जे निजतत्त्व, जे निजगुण (पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे) तेच त्या त्या राशींच्या लोकांमध्ये राहतील. म्हणजे प्रामुख्याने तोच स्वभाव त्या त्या राशीच्या लोकांचे राहतील. म्हणजे त्या त्या लोकांची वासनादेखील त्यांच्या राशीप्रमाणेच राहणार. म्हणजे एकाच रशीतल्या सर्व लोकांचे स्वभाव व वासना हे एकसारखे असतात. योग आणि भोग हे राशीतल्या सर्व लोकांचे एकसारखे नसतात.

नंतरच्या लेखामध्ये आकाश तत्व आणि नवग्रहांचा प्रत्येक जीवनावर होणारा परिणाम सांगून जन्मताच प्रत्येकाचा स्वभाव कसा घडतो याचा ऊहापोह होईल

बारा राशी पृथ्वी आप तेज वायू या चार गटा मध्ये  विभागल्या असून त्या राशींच्या लोकांचे जीवनमान  व त्यांची साधना यावर प्रकाश टाकला जाईल. आपल्या राशी प्रमाणे आपण या ज्ञानाचा उपयोग करू शकता. वैयक्तिक साधनेच्या दृष्टीने आपल्या चित्त वृत्ती प्रवृत्ती व योग या मध्ये चांगलाच परिणाम दिसून येईल.

       वस्तुतः पाहिल तर युगाचा जिवावर परिणाम , पंचमहाभुतांचा जिवावर परिणाम हे जीवाचे प्रारबद्ध संचित नोंदवितात व ते जन्मतःच माणसात दिसतात. हे त्याच्या जन्मपत्रिकेवरून समजू शकतात. माणसाच्या जीवनाची दिशा तेच ठरवितात. हे खरे असले तरी आपले भाग्य हवे तसे बनवण्याचे प्रयत्न कर्माच्या माध्यमातून प्रत्येक जण सहज करू शकतो.

     कर्मेण हरते व्याधि: ।      कर्मेण हरते भय: ।      कर्मेण हरते चिन्ता।      कर्मेऽस्तु जय मङ्गलम् ।।

Leave a Reply