राम नवमी


आज राम नवमी प्रभू रामचंद्राचा अवतार दिन या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला
१२लाख९६ हजार वर्षाच त्रेतायुग ज्या युगामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला
त्यानंतर द्वापार युग ज्या युगामध्ये कृष्णाचा जन्म झाला द्वापार युग हे ८ लाख 64 हजार वर्षांचं होतं म्हणजे 21 लाख 60000 वर्षांपूर्वीचं त्रेतायुग त्या युगातल्या राम कथा ह्या अलीकडच्या आहेत असं सर्वांना भासत इतकी वर्षे निघून गेले तरीही रामराज्याची माहिती सर्वांच्या मनावर राज्य करीत आहे ज्या भूमीवर आपण राहतो या भारत भूमीवर प्रभू रामचंद्र अवतरले आणि अनेक वर्ष वावरले
ज्यांची कीर्ती आणि राम नामाचा प्रभाव 21 लाख 60000 वर्षे उलटून गेली तरीही तेवढीच प्रभावी आहे जेवढे ते प्रत्यक्ष राज्य करीत असताना होती
आपण सर्वच भाग्यवान आहोत की आपल्या जीवनामध्ये ज्या भूमीवर ते वावरले त्या भूमीचा स्पर्श आपल्या देहाला झाला . त्यांच्या अवतारी शक्तीचा आपण आजही निरनिराळ्या तऱ्हेने अनुभव घेतो
केवढं प्रभावी व्यक्तिमत्त्व या भूमीवर अवतरल होतं की जे युगानुयुगं येणार्‍या लोकांच्या मनावर राज्य करीत आहे आणि त्यांना रामनामाने सन्मार्गावर ठेवून त्यांचा उद्धार करीत आहे
प्रभू रामचंद्रांना वंदन करून म्हणावेसे वाटते
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌ ।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ‌||

mrMarathi