धर्माची स्थिती कशी बदलत जाते?

सत्ययुगामध्ये सत्य,दया,तप आणि दान हे संपूर्ण धर्माचे चार पाय असत.त्याच प्रमाणे अधर्माचेही असत्य, हिंसा,असंतोष आणि कलह हे चार पाय आहेत. सत्य युगातील लोक या चतुष्पाद धर्माचे पालन करतात. सत्ययुगातील बहुतेकलोक संतोषी, दयाळू, सर्वांशी मैत्री असणारे, शांत, इंद्रिय निग्रही, सहनशील, समदर्शी आणि आत्त्म्यात रममाण होणारे असत. त्रेतायुगामध्ये, त्यांच्या प्रभावाने. हळूहळू धर्माचे पाय चतुर्थांशाने क्षीण होत जातात.त्या युगात ब्राह्मणांचे अधिक्य असणारे चार वर्ण असतात. लोकांमध्ये हिंसा आणि स्त्रीलंपटता विषेश नसते. कर्मकांड व तपश्‍चर्या यामध्ये निष्ठा असणारे लोक धर्म, अर्थ व काम यांचे पालन करतात. अधिकांश लोक वेदांत पारंगत असतात.

व्दापर युगामध्ये अधर्माच्या हिंसा, असंतोष, खोटेपणा, आणि व्देष या पायांची वाढ झाली. तसेच यामुळे धर्माचे चार पाय असलेत्या तप, सत्य, दया आणि दान यामध्ये अर्ध्याने घट झाली. त्या युगातील लोक यशस्वी, कर्मकांडी आणि वेदांचे अध्ययन, अध्यापन करण्यामध्ये मोठे तत्पर असतात. लोक धनाढ्य, कुटुंबवत्सल आणि सुखी असत. त्या युगात क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोन वर्णांचे प्राधान्य असते.

कलियुगात अधर्माच्या चारी पायांची मोठया प्रमाणात वाढ होते आणि त्यामुळे धर्माचेचारही पाय क्षीण होऊ लागतील व त्यापैकी एकचतुर्थंाश भाग शिल्लक राहतो. शेवटी तोही नाहीसा होईल. कलियुगामध्ये लोक लोभी, दुराचारी, कठोर हृदयाचे, एकमेकांशी विनाकारण वैर धरणारे, भाग्यहीन आणि आशाळभूत असतात. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी सत्व, रज आणि तम असे तीन गुण असतात. काळाच्या प्रेरणेने ते मनात कमी जास्त होत असतात.

mrMarathi