आध्यात्म म्हणजे काय?
श्रीनाथशक्तिपीठाधीश प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणतात की, “मनुष्याने स्वानंदाने जीवन जगण्याची पध्दती म्हणजेच खरे अध्यात्म होय”. स्वानंदाच्या व तेजाच्या अनुभूतीतून मनुष्याचे षड्चक्र जागृत होऊन मनुष्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. मनुष्याला सृष्टीतील अनाकलनीय गोष्टींचे आकलन सहजतेने होऊ लागते. तो ‘अहं ब्रह्मास्मि’ या वचनाचा अनुभव घेऊ लागतो व पूर्णज्ञान स्वरुपी होतो. अध्यात्मतून ईश्वरप्राप्ती होऊ शकते परंतु केवळ ईश्वरप्राप्ती म्हणजे अध्यात्म नव्हे.
अध्यात्माची प्रत्येकालाच गरज!
प्राप्त परिस्थितीत जीवन व्यतीत करत असताना मनुष्याच्या मनावर होणार्या प्रचंड नकारात्मक आघातांमुळे तो मनःशांती हरवून बसतो. मनुष्य स्वतः स्वतःचा सुख व शांतीचे उगमकेंद्र आहे याचा त्याला विसर पडू लगतो. अशा परिस्थितीत मनःशांतीची पुनर्स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक जीवन पध्दतीची गरज पडते.
अध्यात्म ही मूलतः एक जीवन शैली आहे .ज्याने मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो. आत्मिक विकासाचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या संसारिक व व्यावहारिक जीवनातही पडतो व त्यायोगे श्रीनाथशक्तिपीठातून व्यक्ति व्यक्ति करीत समाज परिवर्तन घडवल्या जाते.
अध्यात्म ही कल्पना नव्हे! मानवाच्या इन्द्रियांना व जीवन पद्धतीला विशिष्ट शिकवणूक देणे गरजेचे आहे. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्माची प्रत्येकाला असलेली गरज? अध्यात्म कसे अंगीकारावे? अध्यात्मातून आत्मिक उन्नती, अध्यात्माचा संसार, व्यवहार यांच्याशी असलेला संबंध, व अध्यात्मातूनच स्वत:ला निर्भय, बलशाली, विवेकी कसे बनवावे? या संबंधीचे संपूर्ण मार्गदर्शन श्रीनाथशक्तिपीठ अकोला येथून प.पू. श्री नरेन्द्रनाथ महाराज सततच करत असतात. श्रीनाथशक्तिपीठातून समाजाच्या पुनरुत्थानाचे हे कार्य सातत्याने चालू आहे.
आध्यात्मातून आत्मिक उन्नती
दैनंदिन जीवनक्रम तसेच दैनंदिन व्यवहार वा दैनंदिन आर्थिक व्यवहार बाजूला ठेवून अध्यात्म कराव ही चूकीची समजूत आहे. जे जसे असतील, व जसे करीत असतील, तसे करीत असतांनाच अध्यात्म कसे साधावे ह्याचे मार्गदर्शन श्रीनाथशक्तिपीठातून केले जाते.
आध्यात्मिक उन्नती ही उपासनेच्या माध्यामातून होणारी एक प्रक्रिया आहे. ती प्रत्येकाने यांत्रिकपणे करतच रहावी. मला देव भेटेल की नाही, देव आहे की नाही, असे अनेक विचलीत करणार्या मुद्यांना महत्त्व न देता सांगीतलेली उपासना प्राप्त परिस्थितीत सुरु ठेवल्यास आध्यात्मिक उन्नती सहज साध्य होते.
आध्यात्मिक जीवन पध्दतीच्या अवलंबनाने मनुष्य सतेज, बलशाली, निर्भय व विवेकी बनून पूर्णतः सकारात्मकतेच्या मार्गने चालु लगतो. असा मनुष्य संकटकाळी प्रतिकूलतेने विचलीत होत नाही. या योगे मनुष्य स्वानंदाचा अनुभव घेऊ लागतो.
संसार व व्यवहार यांचा अध्यात्माशी संबंध
उद्वेगात अडकलेल्या मनुष्याच्या जीवनामध्ये नाथशक्तिपीठातून मार्गदर्शनाव्दारे अध्यात्माचे बीज रुजवल्या जाते. सातत्यपूर्ण अभ्यासाने त्याच्या प्रारब्धात व स्वभावात बदल घडवून आणण्यात येतो. त्याला स्वानंदाची प्रचिती देत असतानाच त्याची भौतिक व पारमार्थिक उन्न्ती साधून त्याचे परस्परांशी असलेले संबंध सुधारुन त्याला निरंतर प्रगतीच्या मार्गावर आणल्या जाते. हाच खरा अध्यात्माचा मानवी जीवनाशी असलेला परस्पर संबंध आहे. यातुन हळूहळू सुदृढ समाजाची निर्मिती होते.