अतिसौरी महायाग २०१७

सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा व अतिसौरी महायाग २०१७

श्री नाथशक्तिपीठाधीश प.पू. सद्गुरू  श्री नरेंद्रनाथ महाराजांनी १९९३ साली सुरू केलेल्या  नाथपंथाची सिध्दता, व्यापकता, उपयुक्तता या त्रिवेणीवर आधारित कार्याचा द्वितपःपूर्ती सोहळा व  प.पू.सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराजांचा   सहस्रचंद्रदर्शन सोहळा श्रीनाथशक्तिपीठ परिवाराच्या वतीने अनुग्रहीत शिष्य, भाविक भक्त, आणि नाथशक्तिपीठाकडून ज्यांना लाभ झाला अश्या सर्वांनी मिळुन  दि.२१ जानेवारी ते  दि.२७ जानेवारी १७ दरम्यान आयोजित केला आहे. या निमित्ताने अतिसौरी महायाग, चारही वेदांंचे पारायण, विदर्भात पहिल्यादांच होणारे भाष्यपठण, कीर्तन महोत्सव, विशेषांकाचे प्रकाशन, लक्ष अन्नदानाचा संकल्प, हसत हसत संस्कृत बोलायला शिका, आरोग्यम् धनसंपदा ही व्याख्यानमाला असा भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार आहे. हे पुढिल वर्षभर चालणार्‍या कार्यक्रमांचे १ले चरण असुन या निमित्ताने या वर्षात नामस्मरण,  ग्रंथवाचन, अनुष्ठान -हवन,प्रवचन, व्याख्यानमाला, कीर्तन महोत्सव, ग्रंथ प्रकाशन, विशेषांक प्रकाशन, वृत्तपत्र पुरवणी, संत संमेलन,स्वच्छता अभियान, कीर्तन( शिबीर ) कार्यशाळा, अशा बहुविध कार्यक्रमांचे आयोजन श्री नाथशक्तिपीठ करणार आहे. या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचा श्रीगणेशा दि. २१ जानेवारी २०१७ पासून होत आहे. या निमित्ताने दि. २१ ते दि. २७ जानेवारी २०१७ पर्यंत ९ कुंडी हवन अनुष्ठानाचा कार्यक्रम होईल. तसेच दि.२१ ते दि.२५ जाने. २०१७ पर्यंत श्री नाथशक्तिपीठ येथे  रोज सायंकाळी ६ ते ९ वाजे पर्यंत नारदीय कीर्तन महोत्सव होईल. तसेच या महोत्सवाचे निमित्त साधून एका कीर्तन विशेषांकाचेही प्रकाशन होईल.

या कार्यक्रमाची दखल वृत्तपत्रांनी देखिल घेतली आहे.

mrMarathi