नाथ शक्ति पीठात आपले स्वागत आहे.
नाथ शक्ति पीठ, अकोला हे नव नाथ पंथ मालिकेतील महत्वाचे स्थान असुन येथे नाथ पंथाच्या अखंड गुरु परंपरेची व अखंड उपासनेची शक्ति एकवटली आहे.
ह्या नाथ पंथाची उत्पत्ती प्रत्यक्ष श्री भगवन शंकर ह्यांच्या पासून श्री दत्तात्रयां मार्फत झालेली आहे. हा पंथ कलीयुगाच्या प्रारंभा पासून अवीरतपणे, अखंडणे, समाजोथानाचे, ज्ञानदानाचे, अध्यात्मीक व धार्मीक कार्य करत आहे.
नाथ शक्ति पीठाची स्थापना ११ वर्षां पूर्वी झालेली आहे. ह्या ठिकाणी नवग्रह, श्री दत्तात्रेय, भगवान शंकर, शाबरी देवी, श्री पंचमुखी वीर हनुमान, श्री गणेश यांच्या सह श्री व्यंकटनाथ महाराज ह्यांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा केली असून येथे सतत वेदोक्त व नाथपंथी मंत्रांचे पठण अखंडपणे चालू असते.
या ठिकाणी भारतीय परंपरा, संस्कृती व धर्म शास्र यांचे शात्रोक्त शिक्षण देण्यासाठी वेद शाळेची स्थापना १९९६ ला केली गेली. ही वेद शाळा गुरुकुृल पद्धतीने नि:शुल्क शिक्षण देते.
नाथ शक्ति पीठ ही एक सामाजीक, सांस्कृतीक, धार्मीक व अध्यात्मीक कार्य करणारी एकमेवात द्वितीय संस्था असून ही ॐ एजुकेशन सोसाइटी ह्या नावाने Public Charitable Trust म्हणून पंजीकृत आहे.
याच ठिकाणाहुन श्री व्यंकटनाथ महाराज, देवगावरंगारी यांचे उत्तराधिकारी श्री नरेंद्रनाथ महाराज यांनी नाथ पंथाचे गुरू कार्य अखंडपणे सुरु ठेवले आहे.
दिनांक ३१/७/१५ रोजी गुरू पौर्णिमा आहे. या प्रसंगी नाथ शक्ति पीठात गुरुपुजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
कार्यक्रम वेळ
१.काकड आरती स. ५
२.सद्गुरुंचे मंगलस्नान स.६:३०
३. आन्हीक स. ७:३०
४.गुरुपूजन स. ९:३०
५.आरती—महाप्रसाद दु. २
६.नरेंद्रनाथ महाराजांचे आशिर्वचन सायं. ४:३०
७.सांप्रदायीक भजन सायं. ७
आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती.