महाशिवरात्री सोहळा

पहिला दिवस

नाथ शक्तीपीठामध्ये दिनांक 26|02|2014 रोजी, महारुद्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महारुद्र पाठांची वेळ सकाळी 10am ते दुपारी 02pm पर्यंत आहे.  

दुसरा दिवस

महारुद्राचे हवन दिनांक 27|02|2014 रोजी, सकाळी 10am ते दुपारी 02pm ह्या वेळात होईल. तसेच सायंकाळी सूर्यास्तानंतर ‘महाशिवरात्री’ पूजनाला सुरुवात होईल.

[list style=”arrow”]

  • ह्या मध्ये प्रत्येक प्रहराला शिवमहिम्न स्तोत्र पठण होईल.
  • तसेच नाथ संप्रदायाचे भजन होईल.
  • आणि महानिशिथ काळात पाठांचे हवन होईल.
  • भजनाचा कार्यक्रम सूर्योदयापर्यंत सातत्याने सुरु राहील.
  • महिम्न अभिषेक प्रत्येक प्रहरी सुरु होईल आणि त्या दरम्यान श्री शंकराला बिल्वपत्रे वाहण्यात येतील.

[/list]

तृतीय दिवस

दिनांक 28|02|2014 रोजी, पूर्णाहुती चा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि त्यानंतर लगेचच उपस्थित भक्तगणांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाईल.

तरी सर्व भक्तगणांनी ह्या तीनही दिवशी उपस्थित राहून, आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

एक टिप्पणी

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

mrMarathi