दोष व उपाय

भाग्याचे परिर्वतन करण्यासाठी उपाय

विविध कर्माच्या माध्यमातून कर्म सिद्धांताच्या आधारे कर्म करवून जीवनातील प्रश्न सोडविण्याचे कार्य येथून होते. विविध समस्यांचा विचार करुन अपेक्षित फलश्रृती कशी मिळेल, नेमके कर्म कसे करावे याचे नियोजन येथे केले जाते. श्रीनाथशक्तिपीठ हे नाथ पंथाच्या आध्यात्मिक शक्तिंचे केन्द्र स्थान आहे. नाथ पंथाची संपुर्ण सत्ता मानवी जीवन, त्रिवीध ताप, जन्म-म्रुत्यू, व चरा-चरांवर आहे त्यामुळे हे कर्म फक्त नाथशक्तिपीठ, अकोला येथेच होतात व अन्यत्र होत नाहीत. कर्माला लागणारे विधान, मंत्रसमुच्चय, कारिका संकल्प आदी पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाख़ाली श्रीनाथशक्तिपीठानेच तयार केले आहे. हे तयार करतांना विविध समस्यांचा विचार करुन मंत्रांची योजना केली आहे. असंख्य लोकांचे सुख, दुःख, पीडा, लक्षात घेउन या कर्माचे विधान केले आहे. ह्या योजनेला नाथपंथाचे परंपरागत आशीर्वाद प्राप्त आहेत.

mrMarathi