कलियुगांत नाथपंथाला वेगळे महत्त्व का?

धर्मकार्यात पाखंडी लोकांचे वर्चस्व राहिल. राजे चोरासारखे लोकांना लुबाडतील. चोरी, खोटे बोलणे, विनाकारण हिंसा इत्यादी अनेक प्रकारची वाईट कर्मे करुन लोक उपजीवीका चालवितील. परंतु काळ एवढा बदलेल की धर्म, सत्य,पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य बळ आणि स्मरणशक्ति यांचा लोप होत जाईल. कलियुगामध्ये ज्याच्याकडे धन-संपत्ती असेल त्यालाच लोक कुलीन, सदाचारी आणि सदगुणी मानतील.धर्म आणि न्याय यांच्या बाबतीत शक्ति प्रभावी ठरेल. विवाह संबंध एकमेकांच्या आवडीने ठरतील.व्यवहारात कपटालाच जास्त महत्त्व असेल. स्त्री आणि पुरूषाचे श्रेष्ठत्त्व त्यांच्या रती कौशल्या वरूनच ठरेल. ब्राह्मण्याची ओळख फक्त ‘जानवे’ एवढीच राहील. बाह्य वेषावरून आश्रम ठरेल आणि बाह्य वेषावरूनच दुसर्‍या आश्रमात प्रवेश करणे असे असेल, पैशाशिवाय न्याय मिळू शकणार नाही. बोलण्यातील चातुर्य हेच पांडित्य समजले जाईल. गरिबी हेच दुर्जनत्त्वाचे लक्षण मानले जाईल आणि दांभिक पणा हे साधुत्त्वाचे लक्षण मानले जाईल. प्रसाधनालाच स्नान समजले जाईल. डोक्यावर केस राखणे हे सौंदर्याचे लक्षण समजले जाईल.

आपले पोट भरणे हा मोठा पुरुषार्थ असेल आणि ठासून बोलण्यालाच सत्य मानले जाईल.राजे लुटारू, लोभी व क्रूर असतील ते प्रजेचे धन व बायका पळवितील.कधी कोरडा दुष्काळ पडेल तर कधी निरनिराळे कर लादले जातील. कधी कडक थंडी पडेल तर कधी हिमवर्षाव होईल, कधी तुफान होईल तर कधी उष्णता वाढेल तर कधी पूर येतील, असे उत्पात वारंवार होत राहतील.

या युगाची स्थिती अत्यंत दारुण व विषम असते.या युगात भूकंप,उल्कापात, अनावृष्टी इत्यादि दैवी उत्पात होत राहतील.पारंपारिक संघर्ष वाढीस लागेल. वेदशास्त्राची प्रामाणिकता समाप्त होईल.लोक अकाल मृत्यूला सामोरे जातील.कोणी गर्भातच तर कोणी बालपणी,कोणी यौवनात तर कोणी वृद्धावस्थेत पूर्ण आयुष्य न भोगताच काळाच्या स्वाधीन होतील.प्रजा गुणहीन बनते. वेदशास्त्राच्या अध्ययनाची परंपरा, अध्यापनाची परंपरा उच्छिन्न होईल. शूद्र ब्राह्मणत्वाचा स्वीकार करतील, ब्राह्मण शूद्र बनतील. राजे चांडाळा सारखे आचरण करतील. पुरुष आचारहीन होतात, स्त्रिया असत्य भाषणी व मद्यमांस सेवन करणार्‍या होतील. सर्ववर्णाचे स्त्री-पुरूष धनाचा लोभ करणारे असतील. धर्माचा विक्रय होईल. चोरी, डाका, हत्या, द्रोह, अग्निसंकट हे सतत होतील. कलीयुगाची ही परिस्थिती ब्रह्मदेव अथवा अन्य कोणीही बदलू शकत नाही. म्हणून नाथपंथाची निर्मिती करावी लागली.

3 टिप्पण्या

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

mrMarathi