नवनाथांच्या कार्य काळाचा सारांश

श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या अमृत वाणीतून प्रकट झालेल्या ‘नवनाथ बोधामृत’ ह्या ग्रंथातील नाथपंथाविषयी दिलेली माहिती खालील उताऱ्यात दिली आहे.

नवनाथ भक्तिसार हा अती श्रेष्ठ, अद्भूत, परमपावन, मनाला गुंगवून ठेवणारा एक प्रासादिक ग्रंथ आहे. हा रम्य ग्रंथ, भगवान चैतन्य मच्छिन्द्रनाथांपासून सुरू झालेल्या नवनाथंच्या अद्भुत कार्याचे वर्णन करतो. या ग्रंथात वर्णन केलेल्या घटना २२३ वर्षांपूर्वीच्या आहेत.

समाजामध्ये नाथपंथा विषयी अनेक मत मतांतर आहेत एक प्रकारची भिती देखील आहे ही भिती अनाठायी कशी आहे व जीवनामध्ये नाथ पंथाच्या तत्त्व प्रणालीचा लाभ कसा घेता येईल हे या पुस्तकांत सांगितले आहे. स्वतः ब्रह्मा, विष्णू व महेश, यांनीच या पंथाची योजना केली आहे. म्हणजे विधात्यानेच हा पंथ निर्माण केला आहे. सध्याच्या कलीयुगांत हा पंथ आपल्याला भक्तीमार्गाकडे नेऊन आपली उन्नती कशी करू शकतो हे येथे सांगितले आहे.

नाथपंथात आज सुरू असलेल्या घटनांचा उल्लेख ओघाने केला आहे. अखण्डपणे, अव्याहतपणे, आज देखील हा पंथ कार्यरत आहे. नवनाथभक्तीसार या मालूकवी रचीत पोथीत वर्णन केलेल्या घटनांचा उल्लेख कसा आणि काय आहे तसाच त्याच्या पासून कसा कोणता व काय बोध घ्यावा हे येथे सांगितले आहे.आजच्या कलियुगांत कार्यरत कसे रहावे, कलीयुगाचा दैनंदीन जीवनावर होणारा विपरीत परीणाम कसा टाळता येईल, हे या ग्रंथावरून आपल्याला कळू शकेल.

ब्रह्मा, विष्णु, महेश, भगवान दत्तात्रेय, जगन्माता देवी व इतरसर्व देवता तसेच भूतप्रेत, पिशाश्च, यक्ष, गंधर्व, डाकिणी, शंखीणी, यक्षिणी,वेताळ नागदेवता आदी सर्वच ह्या पंथाला कसे सहाय्यभूत होतात ह्याचे वर्णन येथे केले आहे. दत्तसंप्रदाय किंवा दत्तपंथ हा वेगळाअसून नाथपंथम्हणजे दत्तसंप्रदाय नाव्हे. स्वतःभगवान दत्तात्रेय या पंथाचे आराध्य दैवत राहतील. ही त्यांचीच योजना आहे. ज्यांना, पंथाचा उपदेश प्राप्त झाला आहे त्यांना, सर्व देवदेवता, सर्व प्रकारच्या चांगल्या व दुष्ट शक्ती, सदैव त्यांच्या कर्मानुसार सहाय्यभूत होत असतात व त्यांचे जीवन सुखी करण्यासाठी सहाय्यभूत होत असतात. नाथपंथाचे उद्देश काय, नाथपंथाची योजना कां, नाथपंथ स्थापने साठी नवनारायणांना द्वारकेत बोलाविले, नाथपंथ व इतर पंथातील फरक, नाथपंथ कसा व कोणी निर्माण केला, नाथपंथाचे महत्त्व व वैशिष्ट्‌य काय, नवनारायण कोण होते त्यांचा परिचय काय, नाथ महाराजांचे दैनंदीन जीवन व पुजा व उपासना पध्दती, साधकाने पुजा कशी करावी, विश्व हे हिंदुतत्त्वावर चालते, नवनाथांचे ब्रम्हांडावर प्रभुत्व अनुग्रह-पध्दती, त्याचे महात्म्य व परिणाम, धर्मबीज कसे साजरे करावे आदिंची माहिती दिली आहे.

नवनाथांच्या कार्य काळाचा सारांश, पंथाने समाजाला दिलेले मार्गदर्शन, नवनारायणांच्या नंतर पंथाची वाटचाल, विकास व कार्य पध्दती, पंथाचे आजचे गुरूकार्य, सामर्थ्य प्रदान करण्याची सहजता, पंथाने केलेले समाज कार्य, नवनाथ भक्तिसार पोथीपारायण व फलश्रुती, सामान्य पणे करावयाची उपासना या सर्वांचा उहापोह येथे केला आहे.

6 टिप्पण्या

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

mrMarathi